वाई:कुंडली पाहून  फुटबॉल संघ निवड प्रकरणी राष्ट्रीय फुटबॉल कोच इगोर स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा आणि ह्या कामी ज्योतिषाला दिलेल्या पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई फुटबॉल प्रशिक्षक आणि भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष यांच्याकडून वसूल करून घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “घोडा मैदान समोर आहे, कोण…”, बच्चू कडूंचा रवी राणांना सूचक इशारा

भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक इगोर स्टीमक यांनी आशिया कप पात्रता फेरीच्या सामन्याच्या दोन दिवस आधी भारतीय फुटबॉल संघाची संपूर्ण माहिती भूपेश  शर्मा नावाच्या ज्योतिषाला दिली होती. प्रत्येक खेळाडूंच्या ग्रह स्थिती नुसार भूपेश शर्माने दिलेल्या सल्ल्या नुसार अंतिम संघात कोण खेळणार किंवा नाही हे ठरवले गेले होते. नुकतेच त्या वेळीचे  एआयएफएफचे पदाधिकारी कुशल दास यांनी ज्योतिषाची  मदत घेतली गेली होती आणि त्या साठी बारा ते पंधरा लाख रुपये खर्च केला गेला असे मान्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस मार्फत डॉ हमीद दाभोलकर , मिलिंद देशमुख नंदिनी जाधव यांनी ही मागणी केली आहे.

ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही.ते एक छद्म विज्ञान आहे.हे माहित असूनही तसे अनेक तज्ञांनी सिद्ध केल्यानंतरही त्यांनी ज्योतिषाची मदत घेतल्याने त्यांना बडतर्फ करावे असे अंनिस ने पत्रकात म्हंटले आहे.

हेही वाचा >>> गणेशोत्सवामुळे पुणे-सातारा महामार्गावर वाहनांची गर्दी

ग्रह-गोल-ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ असे म्हणतात  आणि खगोल शास्त्राच्या उपलब्ध अभ्यास नुसार ग्रह-गोल-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टी राष्ट्रीय संघ निवडताना वापर करणे हे अत्यंत चुकीचे असून  जीवापाड मेहनत करणाऱ्या खेळाडूंच्या कर्तुत्वावर अविश्वास ठेवणारे आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद केले आहे कि, डॉ.जयंत नारळीकर ह्यांच्या पासून अनेक जेष्ठ खगोल वैज्ञानिकांनी ज्योतिषाला विविध  चाचण्यांच्या माध्यमातून तपासून ते फोल असल्याचे सिद्ध केले आहे. जेष्ठ वैज्ञानिक जेम्स रेन्डी ह्यांनी जगाच्या अंताच्या विषयी केलेल्या पंचेचाळीस दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपण सिद्ध केला होता. तसेच भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही. वेन्कटरामन ह्यांनी देखील ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे,  ह्याची देखील आठवण ह्या निमित्ताने करू देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra anis demand to dismiss coach igor stimac for taking astrologer help for football match zws