महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन आणि मातृभूमी फौंडेशन यांनी सैलानी बाबाच्या दर्ग्यावर येणाऱ्या मनोरुग्णांसाठी ‘दवा आणि दुवा’ उपक्रम सुरू केला आहे. “‘दवा आणि दुवा’ उपक्रम सैलानी बाबा परिसरात येणाऱ्या मानसिक रुग्णांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या परिसरासाठी तो पथदर्शी प्रकल्प ठरेल,” असा विश्वास बुलढाणा जिल्हाधिकारी आर. राममूर्ती यांनी व्यक्त केला. ते गुरुवारी (१ सप्टेंबर) बुलडाण्यात या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.

सैलानी बाबा ट्रस्ट च्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ होते. यावेळी माजी आमदार राहुल बोंद्रे, सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष समद चांद, अॅड. वानखेडे, दर्ग्यावरील मुजावर समुदायाचे प्रतिनिधी चांद मुजावर आणि गार्गी सपकाळ उपस्थित होते.

ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Need for expansion of palliative care services in state
राज्यात ‘पॅलिएटिव्ह केअर’ सेवेच्या विस्ताराची गरज!
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
pune municipal corporation
पुणे: प्रशासनाच्या बेपर्वा धोरणामुळे पालिकेची तिजोरी ‘ साफ ‘, ‘डायलिसिस’ दर निश्चितीचा प्रस्ताव धूळखात

“दवा- दुवा प्रकल्प सैलानीबाबा दर्गा परीसरासाठी पथदर्शी ठरेल”

जिल्हाधिकारी राममूर्ती म्हणाले, “सैलानी बाबा दर्गा परिसारत देशभरातून मानसिक आजारी रुग्ण येतात. त्यांच्या उपचारासाठी सुविधा असणे अत्यंत आवश्यक आहे. शासनामार्फत याला आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. स्थानिक मनोविकार तज्ज्ञ आणि मानसिक आजाराच्यावर औषधे उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक राहील. दवा- दुवा प्रकल्प सैलानीबाबा दर्गा परीसरासाठी पथदर्शी ठरेल.”

“दर्गा परिसरात मानसिक उपचार चालू व्हावेत यासाठी आपण गेली अनेक वर्ष शासकीय पातळीवर प्रयत्नशील होतो,” असं म्हणत स्थानिक माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने सुरू होत असलेल्या या प्रकल्पाला सदिच्छा दिल्या. सैलानी बाबा ट्रस्टचे अध्यक्ष समद चांद आणि दर्ग्याचे मुजावर चांद मुजावर यांनी दवा-दुवा प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

‘दवा आणि दुवा’ उपक्रम कशासाठी?

हा प्रकल्प सुरू करण्यामागची पार्श्वभूमी सांगताना मानसोपचारतज्ज्ञ आणि अंनिस कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, “आपल्या देशात खूप मोठ्या लोकसंख्येसाठी फार थोडे मनोविकार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. समुपदेशन आणि समाजात पुन्हा मानसिक आजारी रुग्णाला पुनर्वसन करण्याच्या सुविधा अत्यंत कमी आहेत. त्यामधून दर्ग्यासारख्या ठिकाणी लोक उपचार घ्यायला येतात. त्यांच्या श्रद्धेचा सन्मान ठेवून रुग्ण आणि नातेवाईक यांना मानसिक आजाराचे शास्त्रीय उपचार उपलब्ध करून दिले तर त्याच्या परिस्थित झपाट्याने सुधारणा होते आणि ते परत आपापल्या गावी जावून सन्मानाने आयुष्य जगू शकतात.”

“या प्रकल्पासाठी पंचवीस मानस मित्र आणि मैत्रीणीचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्याच्या माध्यमातून आणि शासनाच्या मदतीने सैलानी बाबा दर्गा परिसरात या सुविधा आपण सुरू करत आहोत. या केंद्रावर मनोरुग्णावर मोफत औषधोपचार केला जाणार आहेत,” असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी जाहीर केले.

माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी अध्यक्षीय समारोप करताना दवा-दुवा प्रकल्प हा केवळ महाराष्ट्राचा नाही तर देशाचा पथदर्शी प्रकल्प होईल अशी आशा व्यक्त केली. डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या स्वप्नातील एक प्रकल्प मार्गी लागत असल्याचे एक समाधान असल्याचे त्यांनी नमूद केले.

सकपाळ पुढे म्हणाले, “महाराष्ट्रील संत आणि सुधारकांच्या खांद्यावर उभे राहून या स्वरूपाचे उपक्रम आपण करत आहोत याचे नम्र भान आपण सर्वांनी ठेवायला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध हा कुठल्याही देवा आणि धर्माला नसून ती सर्व धर्मातील अंधश्रद्धा विरोधात जोमाने काम करते हे या प्रकल्पातून अधोरेखित होते.”

हेही वाचा : “दाभोलकर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार पकडा, धर्मांध संघटनेवर बंदी आणा”, अंनिसची मागणी

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प समन्वय गार्गी सपकाळ यांनी केले, तर आभार मैत्रियी लांजेवार हिने मानले. दर्गा परिसरातील अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक तसेच नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. अनेक रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दर्गा परिसरात मानसिक उपचार सुविधा उपलब्ध असणे फायद्याचे होईल, असे मत व्यक्त केले.