सातारा: अनेक तरुण-तरुणी ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जाऊन व्यसनाच्या आहारी जातात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस आणि परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्या मार्फत ‘चला व्यसन बदनाम करूया’ मोहिमेचे आयोजन केले आहे. ‘दारू नको दूध प्या!’ हा उपक्रम सर्वत्र राबवला जाणार आहे, अशी माहिती डॉ. हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मागील पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र अंनिस आणि परिवर्तन व्यसन मुक्ती संस्था डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ‘चला व्यसन बदनाम करूया’ ही मोहीम राबवते. सध्या समाजात व्यसनाचे उदात्तीकरण होताना दिसते आहे. यामुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. महाराष्ट्र शासन मात्र महसूल वाढवण्यासाठी समाजात व्यसन वाढवण्याला प्रोत्साहन देताना दिसते. मद्यविक्री वाढवून शासनाचा महसूल वाढवण्याचे शासनाने नुकतेच सूतोवाच केले आहे. एका बाजूला लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आणि भावाला मात्र व्यसनाच्या तोंडी द्यायचे असे हे धोरण आहे. त्यामुळे याला आमचा विरोध आहे. त्यामुळेच व्यसनाची प्रतिष्ठा तोडण्याबरोबरच शासनाने समग्र व्यसन विरोधी नीती जाहीर करावी यासाठी देखील या साप्ताहादरम्यान पाठपुरावा केला जाणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.
या साप्ताहाअंतर्गत राज्यभरात व्यसनविरोधी युवा निर्धार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्त व्यक्तीच्या हस्ते दारूच्या बाटलीला जोडे मारून मेळाव्याचे उद्घाटन केले जाणार आहे. या मेळाव्यामध्ये तरुणांना व्यसनमुक्ती दूत म्हणून काम करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. व्यसनमुक्ती दूताचे प्रशिक्षण घेतलेले युवक युवती पुढील आठवड्यामध्ये समाजात व्यसनाच्या विरोधी पोस्टर प्रदर्शन, व्यसनविरोधी फिल्म शाळा कॉलेजमध्ये दाखवणे, गावामध्ये व्यसनविरोधी फेरीचे आयोजन करणे, शाळा कॉलेजमध्ये व्यसनाविषयी भाषण देणे, दारूच्या बाटलीला जोडे मारा आंदोलन, व्यसनविरोधी प्रतिज्ञा असलेल्या फ्लेक्सवर नागरिकांच्या सह्या घेणे तसेच समाज माध्यमातून व्यसन विरोधी संदेश प्रसारित करणे, असे कार्यक्रम ठिकठिकाणी करणार आहेत, अशी देखील माहिती देण्यात आली.
३१ डिसेंबरला लोकांनी दारू प्यावी म्हणून दारू दुकाने उशिरापर्यंत चालू ठेवण्याची परवानगी शासन देते हे व्यसनाला प्रोत्साहन देणारे धोरण शासनाने थांबवावे म्हणून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना ठिकठिकाणी निवेदन देण्यात येणार असल्याचेदेखील पत्रकात नमूद केलेले आहे. ३१ डिसेंबरला ‘दारू नको दूध प्या’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून दारू ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.