प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर, नाट्य दिग्दर्शक सुनील शानबाग, लोककलेचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे आणि तबलावादक योगेश सामसी या महाराष्ट्रातील कलाकारांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉ. संध्या पुरेचा यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत कार्यरत संगीत नाटक अकादमी दरवर्षी संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांना सन्मानित करते. याच परंपरेत बुधवारी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या एका शानदार कार्यक्रमात महाराष्ट्रातील 4 कलाकारांसह देशभरातील 42 कलाकारांना वर्ष 2017 चे नाट्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नाट्य क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिद्ध नाट्यलेखक अभिराम भडकमकर यांना सन्मानित करण्यात आलं. अभिराम भडकमकर यांनी गेली दोन दशकं नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात अभिनेता व दिग्दर्शक म्हणून उत्तम कार्य केले आहे. तर नाट्य दिग्दर्शनातील योगदानासाठी सुनील शानबाग यांना सन्मानित करण्यात आलं. सुनील शानबाग यांची नाट्य दिग्दर्शक म्हणून ख्याती आहे. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्यासोबत त्यांनी 1974 ते 1984 अशी सलग दहा वर्ष 25 कलाकृतींमध्ये कलाकार व सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली. शानबाग यांनी विजय तेंडुलकर लिखीत ‘सायकल वाला’, महेश एलकुंचवार लिखीत ‘प्रतिबिंब’ आणि ‘शफत खान यांचे किस्से’, सयाजी शिंदे लिखीत ‘तुंबुरा’ आणि रामु रामनाथन यांच्या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.

प्रसिद्ध तबलावादक पंडित योगेश सामसी यांना संगीत क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. यासोबत लोककलांचे अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना लोककलेतील योगदानासाठी गौरविण्यात आलं. 1 लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 1952 पासून संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

डॉ. संध्या पुरेचा यांना अकादमीची फेलोशिप
ललित कलेतील योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या डॉ. संध्या पुरेचा यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीची मानाची फेलोशिप बहाल करण्यात आली. प्रसिद्ध भरतनाट्यम् नृत्यांगणा असलेल्या डॉ. पुरेचा या मुंबईस्थित कला परिचय संस्थेच्या संचालिका तसेच सरफोजीराजे भोसले भरतनाट्यम प्रशिक्षण व संशोधन संस्थेच्या सचिव आहेत. आचार्य पार्वती कुमार यांच्याकडून डॉ. पुरेचा यांनी भरतनाट्यमचे धडे घेतले. त्यांनी ‘नाटय शास्त्र’ विषयावर संशोधनही केले आहे. त्यांना या कार्यक्रमात फेलोशिप 3 लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आलं.