NCP Ajit Pawar Rebel Candidates Result: शरद पवार म्हणाले त्यांना ‘पाडा, पाडा’, अजित पवारांच्या बंडात साथ देणाऱ्या किती उमेदवारांचा पराभव झाला?

Wining Candidate List of NCP Ajit Pawar: अजित पवारांच्या बंडात साथ दिलेल्या किती उमेदवारांचा पराभव झाला?

Sharad Pawar vs Ajit Pawar
शरद पवार विरुद्ध अजित पवार

Maharashtra Assembly Election Results NCP Ajit Pawar Group Winner Candidate List: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून फारकत घेत स्वतःचा वेगळा गट केला. तब्बल ४१ आमदारांनी अजित पवारांना या बंडात साथ दिली होती. तसेच आपला गटच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचे सांगितले. पुढे विधीमंडळ आणि सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या दाव्याला पाठबळ देणारे निर्णय दिले. दुसरीकडे शरद पवार आणि त्यांच्या इतर नेत्यांनी पक्षफुटीवर भर देऊन जनतेमध्ये जाऊन प्रचार केला. तरी निकालावरून शरद पवारा गटाला फारसे यश मिळाले नाही असे दिसत आहे. शरद पवारांनी अजित पवारांच्या उमेदवारांना ‘पाडा, पाडा’ असे सांगूनही अजित पवारांचे ४१ उमेदवार निवडून आले आहेत.

शरद पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्मरावबाबा अत्राम, मकरंद आबा पाटील, धनंजय मुंडे आणि इतर आमदारांना पाडण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही या उमेदवारांचा विजय झाला आहे.

कोणत्या उमेदवारांचा पराभव

अजित पवार यांच्या एकूण १३ उमेदवारांचा पराभव झाला आहे. यामध्ये नुकतेच पक्षात आलेल्या झिशान सिद्दीकी यांचाही पराभव झाला आहे. तर २०१९ चे अपक्ष उमेदवार देवेंद्र भुयार यांनी अजित पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविली होती, त्यांचाही पराभव झाला आहे. इस्लामपूरमधून निशिकांत पाटील आणि तासगाव कवठे महांकाळ मधून संजयकाका पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचाही पराभव झालेला आहे.

विधानसभा मतदारसंघउमेदवारनिकाल
नवापूरभरत गावितपराभूत
मोर्शीदेवेंद्र भुयारपराभूत
वांद्रे पूर्वझिशान सिद्दिकीपराभूत
वडगाव शेरीसुनील टिंगरेपराभूत
श्रीरामपूरलहू कानडेपराभूत
इस्लामपूरनिशिकांत पाटीलपराभूत
तासगाव कवठे महाकाळसंजयकाका पाटीलपराभूत
खेड आळंदीदिलीप मोहितेपराभूत
जुन्ररअतुले बेनकेपराभूत
१०मोहोळयशवंत मानेपराभूत
११चंदगडराजेश पाटीलपराभूत
१२मुंब्रा कळवानजीब मुल्लापराभूत
१३मानखूर्द शिवाजीनगरनवाब मलिकपराभूत

संयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार यांच्यासह आलेल्या भरत गावित, सुनील टिंगरे, लहू कानडे, दिलीप मोहिते, अतुल बेनके, यशवंत माने, राजेश पाटील, नजीब मुल्ला आणि नवाब मलिक यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

विधानसभा मतदारसंघउमेदवारनिकाल
अमळनेरअनिल पाटीलविजयी
अमरावतीसुलभा खोडकेविजयी
अहेरीधर्मरावबाबा अत्रामविजयी
लोहाप्रताप चिखलीकरविजयी
सिन्नरमाणिकराव कोकाटेविजयी
निफाडदिलीप बनकरविजयी
दिंडोरीनरहरी झिरवाळविजयी
देवळालीसरोज अहिरेविजयी
शहापूरदौलत दरोडाविजयी
१०अनुशक्ती नगरसना मलिकविजयी
११श्रीवर्धनआदिती तटकरेविजयी
१२शिरूरज्ञानेश्वर कटकेविजयी
१३बारामतीअजित पवारविजयी
१४भोरशंकर मंडेकरविजयी
१५मावळसुनील शेळकेविजयी
१६पिंपरीआण्णा बनसोडेविजयी
१७पारनेरकाशिनाथ दातेविजयी
१८गेवराईविजयसिंह पंडितविजयी
१९परळीधनंजय मुंडेविजयी
२०उदगीरसंजय बनसोडेविजयी
२१फलटणसचिन पाटीलविजयी
२२येवलाछगन भुजबळविजयी
२३आंबेगावदिलीप वळसे पाटीलविजयी
२४कागलहसन मुश्रीफविजयी
२५अर्जुनी मोरगावराजकुमार बडोलेविजयी
२६माजलगावप्रकाश सोळंकेविजयी
२७वाईमकरंद पाटीलविजयी
२८अहिल्यानगर शहर (अहमदनगर)संग्राम जगतापविजयी
२९इंदापूरदत्तात्रय भरणेविजयी
३०अहमदपूरबाबासाहेब पाटीलविजयी
३१कळवणनितीन पवारविजयी
३२कोपरगावआशुतोष काळेविजयी
३३अकोलेकिरण लहामटेविजयी
३४वसमतचंद्रकांत नवघरेविजयी
३५चिपळूणशेखर निकमविजयी
३६पाथरीराजेश उत्तमराव विटेकरविजयी
३७हडपसरचेतन तुपेविजयी
३८इगतपुरीहिरामण खोसकरविजयी
३९तुमसरराजू कारेमोरेविजयी
४०पुसदइंद्रनील नाईकविजयी
४१सिंदखेडराजामनोज कायंदेविजयी

अजित पवार यांचे ४१ आमदार निवडून आलेले असून त्यांनी बंडाच्या वेळी आपल्याबरोबर असलेल्या आमदारांचा आकडा कायम ठेवला आहे. मात्र अजित पवार गटाला ९.०१ टक्के मतदान मिळाले असून शरद पवार यांच्या गटापेक्षा हे मतदान कमी आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ११.२८ टक्के मतदान मिळाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra assembly 2024 ncp ajit pawar winners and losers get here all list of ncp ajit pawar in marathi kvg

First published on: 24-11-2024 at 14:50 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या