Vidhan Sabha Monsoon Session, Maharashtra Budget 2024: अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारीदेखील सुरू केली आहे. लोकसभा निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील भाजपा, शिवसेना व अजित पवार गट या तिन्ही पक्षांनी कंबर कसून कामाला लागण्याचे निर्देश आपल्या राज्यातील पक्षसंघटनेला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या अर्थसंकल्पाची जोरदार चर्चा पाहायला मिळाली.

इथे पाहा विधानसभा कामकाज

त्याचवेळी राज्यातील मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही या अधिवेशनात वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

Live Updates

Maharashtra Budget 2024-2025 Today, 28 June 2024: महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचे सर्व अपडेट्स

11:21 (IST) 28 Jun 2024
नाशिक: ३० कुटुंबांचे घराचे स्वप्न अधांतरी; बांधकाम व्यावसायिकाकडून सव्वा तीन कोटींना गंडा, संशयित फरार

एका बांधकाम व्यावसायिकाने ३० गुंतवणूकदारांना सव्वा तीन कोटी रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

सविस्तर वाचा…

11:19 (IST) 28 Jun 2024
डॉ. बाबा आढाव यांचा राज्य सरकारला इशारा : म्हणाले, “माथाडी कायद्याची अंमलबजावणी करा, नाहीतर…”

महामंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी डॉ. आढाव बोलत होते.

सविस्तर वाचा…

11:18 (IST) 28 Jun 2024
अकरावी प्रवेशात नामांकित महाविद्यालयांना ‘दुसरी पसंती’? होतेय काय?

विद्यार्थी आता ‘हमखास यश’ मिळवून देणाऱ्या, पण फारशा प्रसिद्ध नसलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांशी जोडून घेतलेल्या शिकवणी वर्गांकडे वळत असल्याचे चित्र आहे.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 28 Jun 2024
घोडबंदरच्या भरवस्तीतील आरएमसी प्रकल्प सुरूच, आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भीतीने नागरिक चिंताग्रस्त; संबंधित यंत्रणेचे होतेय दुर्लक्ष

स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या सुचनेनंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प संबंधित ठेकेदाराने पुन्हा सुरू केला असून या प्रकल्पामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भितीने नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:17 (IST) 28 Jun 2024
भंडाऱ्यात महायुतीत धुसफूस!

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.

सविस्तर वाचा…

11:16 (IST) 28 Jun 2024
जिवघेण्या वर्षा सहली आणि धोक्यात येणारे पर्यटन, रायगड जिल्ह्यात महिन्याभरात अकरा जणांचा मृत्यू

जिल्ह्यात धरणांवर आणि धबधब्यांवर वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. दरवर्षी हजारो पर्यटक वर्षासहलींसाठी रायगड जिल्ह्यात दाखल होत असतात.

सविस्तर वाचा…

11:12 (IST) 28 Jun 2024
वर्धा : भाच्याची समजूत काढणे पडले महागात, एकाच ठोश्यात मामा…

वर्धा : मामा म्हणजे जिव्हाळ्याचं स्थान. हक्काचे नाते. पण याच नात्यात संतापी व दारुबाज भाच्याने काळिमा फासल्याची ही घटना आहे. पुलगाव येथील टिळक नगरात ती घडली. येथील एका घरी पती पत्नीत भांडण लागले होते. ते सोडविण्यासाठी मामा पोहचला

सविस्तर वाचा…

11:11 (IST) 28 Jun 2024
नागपूरसह संपूर्ण विदर्भात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाला सुरुवात

नागपूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना विदर्भात सर्वदूर खऱ्या अर्थाने मोसमी पावसाचे आगमन झाले. पश्चिम विदर्भात दाखल झालेल्या पावसाने पूर्व विदर्भाला पावसाची प्रतीक्षा करायला लावली.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 28 Jun 2024
Vidhan Sabha Monsoon Session: “… तर मी अजित पवारांचाच धिक्कार करतो”

मनुस्मृतीचे ४ श्लोक विचाराधीन आहेत असं जर अजित पवार म्हणत असतील तर मी त्यांचा धिक्कार करतो. तुम्ही मनुस्मृती विचाराधीन कशी घेऊ शकता? जर हे स्वत: अजित पवार म्हणत असतील तर मी अजित पवारांचाच धिक्कार करतो – जितेंद्र आव्हाड</p>

10:51 (IST) 28 Jun 2024
Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live Updates: विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचंही आंदोलन

विधिमंडळ अधिवेशनाचं आजचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांनी “एक मोदी, सब पे भारी” अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. काही वेळाने तिथे विरोधक दाखल झाल्यानंतर त्यांनीही राज्यातील महायुती सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत आंदोलन सुरू केलं.

10:18 (IST) 28 Jun 2024
Maharashtra state budget live updates: महायुती सरकार कोणत्या घोषणा करणार?

विधानसभा निवडणुकांआधीचा हा शेवटचा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे या अर्थसंकल्पात राज्यातील महायुती सरकारकडून मोठ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडूनदेखील सरकारला घेरण्याची तयारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

10:17 (IST) 28 Jun 2024
Maharashtra Assembly Budget 2024-2025 Live Updates: अर्थमंत्री अजित पवार सादर करणार राज्याचा अर्थसंकल्प

अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प आज सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकांआधी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. मात्र, यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांआधीचा हा या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल.

10:15 (IST) 28 Jun 2024
Maharashtra state budget live updates: आज दुपारी २ वाजता सादर होणार अर्थसंकल्प

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज दुपारी २ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्व संध्येला सरकारकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले होते ( फोटो – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोशल मीडिया खाते )

Maharashtra Budget 2024-2025 Today, 28 June 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा