Maharashtra News Updates, 01 March 2023: एकीकडे राज्यात अधिवेशनामुळे वातावरण तापलेलं असतानाच दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयातल्या सुनावणीमुळेही राजकीय वर्तुळात मोठी चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. पक्षाचे प्रतोद, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचं कार्यक्षेत्र अशा अनेक मुद्द्यांवर नीरज कौल शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करत असून त्यांच्यानंतर मनिंदर सिंग हेही युक्तिवाद करणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आज न्यायालयात सुनावणीचा पाचवा दिवस असून शिंदे गटाचे वकील बाजू मांडत आहेत. उद्या सकाळी राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल हरिश साळवे युक्तिवाद करणार आहेत.
Maharashtra Budget Session 2023-2024 Live, 01 March 2023: राज्य विधिमंडळाचं अधिवेशन ते सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे अपडेट्स!
पक्षात मतभेद निर्माण होणे किंवा व्यक्त करणे म्हणजे तुम्ही पक्षविरोधी भूमिका घेत नाही असं सर्वोच्च न्यायालयानंच येडियुरप्पा प्रकरणात म्हटलं होतं, अशी भूमिका नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवादादरम्यान मांडली आहे.
Kaul: Your lordships in Yedurappa held that merely because a dissent is expressed within the party doesn't mean that you're acting against the party and you do not incur the wrath of Art 2(1)(a)#SupremeCourtOfIndia #SupremeCourt #ShivSenaCrisis
— Live Law (@LiveLawIndia) March 1, 2023
शिंदे गट शिवसेनेतून फुटून निघाल्याचं कधीच म्हणाला नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच तेच खरी शिवसेना असल्याचं म्हटलं आहे. आता तेच खरी शिवसेना असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
Kaul: I never argued that we split under the party or we merged. We said we represent the Shivsena and now we are recognised as Shivsena in this matter.#SupremeCourtOfIndia #SupremeCourt #ShivSenaCrisis

सर्वोच्च न्यायालयात आजच्या सुनावणीला सुरुवात झाली असून शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांनी शिवराजसिंह चौहान प्रकरणाचा दाखला दिला आहे.
Kaul: My submission is that these two submissions aren't being made for the first time- that trust vote should not be taken if the government is formed and not when disqualifications are pending. These were made in Shivraj Chouhan and rejected too.#ShivSenaCrisis

विधिमंडळात चोरमंडळ गेलंय असं मी म्हणालो. ते खरं आहे. ते चोरच आहेत. करू द्या हक्कभंग दाखल, पाहू आपण – संजय राऊत
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढल्याने निवडणुकीत विजयी होण्यासाठी किमान ६५ हजारांहून अधिक मतांची आवश्यकता असल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे ६५ हजारांहून जास्त मते घेणाऱ्या उमेदवाराच्या गळ्यात विजयाची माळ पडण्याची शक्यता आहे.
कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला, व्यक्तीला, नागरिकाला अशा प्रकारे चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. टीव्हीवर मी ती बातमी बघितली. मी आशिष शेलारांच्या मताशी सहमत आहे. राजकारण बाजूला ठेवून याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे. प्रत्येकानं शिस्त पाळायला हवी. संविधानानं प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. पण कुणी काहीही बोलायला नको. त्या बातमीत तथ्य आहे का हेही तपासून बघायला हवं. त्याची शहानिशा करून त्यावर योग्य तो निर्णय विधिमंडळानं घ्यायला हवा – अजित पवार</p>
संजय राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांच्याकडे काहीही राहिलेलं नाही. ते रोज पुस्तकातून नवीन शब्द शोधून काढतात. काहीतरी भडकाऊ बोलल्याशिवाय त्यांच्या बातम्याच होत नाहीत. कारण लोक आता कंटाळले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीभेला करवंदीचा काटा टोचायला हवा. म्हणजे त्यांच्या जीभेला आवर घातला जाईल. संजय राऊतांवर आम्ही हक्कभंग दाखल करत आहोत. – भरत गोगावले
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या मेट्रो रेल्वेला पुरेसे प्रवासी मिळावे म्हणून मेट्रोच्या मार्गावरील शहर बससेवा बंद करावी ही महामेट्रोने केलेली विनंती नागपूर महापालिकेने अमान्य केली आहे. मेट्रोच्या स्थापनेपासून मेट्रोने मागितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता करणाऱ्या महापालिकेने प्रथमच थेट नकार कळवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातून ग्रामीण भागातील शेतीसाठी पहिल्या उन्हाळी आवर्तनाला बुधवारपासून (१ मार्च) सुरुवात होणार आहे. नवीन मुठा उजवा कालव्यातून हे आवर्तन देण्यात येणार आहे. १ मार्चपासून पुढील ५५ दिवस सतत कालव्यातून पाणी दिले जाणार असून, तब्बल पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.
पुणे : पुण्यातील फ्लेक्सबाजीचे लोण आता थेट पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग आणि पिंपरी- चिंचवड शहरात येऊन पोहोचले आहे. अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा, अशा आशयाचे फलक लागले आहे.
शिंदे-भाजपा सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवगर्जना यात्रेच्या निमित्ताने संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीकास्र सोडलं.
न्यायालयात न्यायाधीश वकिलांना प्रश्न विचारताना वस्तुस्थितीची तपासणी करत असतात. न्यायालयातील न्यायाधीशांचं तोंडी वक्तव्यावरून कोणताही अर्थ आपण काढू शकत नाही. कालच्या सुनावणीत न्यायाधीशांनी विचारलेले प्रश्न प्रामुख्याने राज्यपालांनी बहुमताची चाचणी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे घ्यायचे आदेश दिले यासंदर्भात होते. दुसरा मुद्दा व्हीपचा होता. – उज्ज्वल निकम
बच्चू कडू यांना काल एका शेतकऱ्याने अडवून “तुम्ही गद्दार आहात, गद्दारी करून एका डाकूबरोबर तुम्ही गेलात”, अशा शब्दांत सुनावल्यानंतर त्यावरून संजय राऊतांनी ट्विटरवर शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
तुमने बेवफाई की वफ़ा का नाम लेकर।
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 1, 2023
हम वफादार बने रहे बेवफा का इल्ज़ाम सेह कर।
तुम आंखे नहीं मिला सकते हमारा सबकुछ छीनकर।
हम सर उठाकर चल सकते है सब कुछ छोड़ कर । https://t.co/bWMbbJA8DZ
उद्या आमचे वकील रिजॉइंडर देतील. तोपर्यंत शिंदे गटाचे वकील युक्तिवाद चालू ठेवतील. मात्र, उद्या संध्याकाळपर्यंत दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद संपतील.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली असून भातसा प्रकल्पग्रस्तांना न्यायाची मागणी करत विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.
मराठा क्रांती मोर्चातील गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून दुपारपर्यंत मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.
कसब्याची जागा मुळात आमच्याकडे नव्हतीच. ती जागा ३०-३५ वर्ष भाजपाकडे होती. ती भाजपाकडून जातेय. पिंपरीची जागा कोण जिंकतंय हे सांगता येत नाही हाही भाजपाचा पराभव आहे – संजय राऊत
कसबा आणि पिंपरीतल्या निवडणुका आपण हरतोय हे लक्षात आल्यानंतर तिथे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी पोलिसी यंत्रणेचा गैरवापर सुरू केला – संजय राऊत
बच्चू कडूंना शेतकऱ्यांनी जाब विचारला की तुम्ही चोर-डाकूंबरोबर जाऊन गद्दारी केली. तो विचार महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी आम्ही शिवगर्जना यात्रा करतोय – संजय राऊत

“विकासाचे मुद्दे अथवा गेल्या आठ-नऊ वर्षांत सत्तेवर आल्यापासून काय काम केले याची जंत्री जनतेसमोर ठेवून मते मागण्याची भीती सत्तापक्षाला का वाटावी?”
गेल्या अधिवेशनामध्ये विधासभा अध्यक्षांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर आज पहिल्यांदाच जयंत पाटील पुन्हा एकदा सभागृहात दाखल होणार आहेत..
अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. यात अधिवेशनातील कामकाजासंदर्भात रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावर आज मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता