Maharashtra News Updates, 02 March 2023: ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी विधानसभेत बोलत असताना सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. मी राजकारणातून निवृत्ती घेऊन मुलाला तिकीट द्या, असे शरद पवार यांना सांगितले होते. पण शरद पवार यांनीच मला निवृत्तीपासून परावृत्त केले. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका नेत्याने मला तुरुंगात टाकण्याचे वक्तव्य केले. मला तुरुंगात टाकले तरी मी घाबरणार नाही. पण त्या नेत्याने माझ्या मुलांचे नाव घेऊन चुकीचा उल्लेख केला. तुम्ही जर कुटुंबावर येणार असाल तर नियती तुम्हाला माफ करणार नाही, जे व्हायचे असेल ते होईल, पण मी गुडघे टेकणार नाही, अशी भूमिका भास्कर जाधव यांनी विधानसभेत मांडली.
महाराष्ट्र विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सुरु आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील सर्व घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर
Maharashtra Budget Session 2023-2024 Live, Supreme Court Hearing Live | 02 March 2023: राज्य विधिमंडळाचं अधिवेशन ते सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे अपडेट्स!
बीड जिल्ह्यातील बारा हजार शेतकऱ्यांचे बँक खाते बजाज आलियांज या विमा कंपनीने चुकीचा पीक विमा जमा झाल्याचे कारण देत गोठवले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास झाला तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या सिबिलवरही झाला. अशा प्रकारे शेतकऱ्यांचे बँक खाते बँकेला कळवून गोठवणे हे बेकायदेशीर असून संबंधित कंपनीवर शासनाने गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली.
ठाकरे गटाचे नेते अनिल पराब यांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांच्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मनात प्रतिकूल मत होते, मात्र त्यांना निर्णय घेण्यास अडचण होती, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर देत असताना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी जोरदार टीका केली. अडीच वर्ष महाविकास आघाडीसोबत सत्ता उपभोगत असताना शिंदे यांना मलिक देशद्रोही वाटले नाहीत का? त्याआधी देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते, तेव्हाही मलिक देशद्रोही असल्याचे त्यांना कळले नाही का? अशी जोरदार टीका अनिल परब यांनी केली.
शिंदे गटाचे वकील हरिश साळवे हे सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करताना म्हणाले की, दहाव्या परिशिष्टात बदल करावा लागेल. त्याच्यात कमतरता आहेत. सर्वात मोठे उदाहरण म्हणजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे.
Salve: The tenth schedule needs to be fixed, yes, it has leaks. Biggest example is criminalization of politicians. But these problems are beyond.#SupremeCourt #ShivSenaCrisis #SupremeCourtOfIndia
— Live Law (@LiveLawIndia) March 2, 2023
शिंदे गटाचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु केला असून उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले नाहीत, त्यावर जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला समोर गेले असते तर काय माहीत त्यांच्या आघाडीतील एखाध्या पक्षाने त्यांची साथ सोडली असती, काहीही होऊ शकले असते?
Salve: How do you know who would have supported whom? What if one of his coalition partners said sorry we don't want to support you? We don't know! And it's not for us to decide as lawyers.#SupremeCourt #ShivSenaCrisis #SupremeCourtOfIndia

विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात घोषणाबाजी
"शेतकऱ्यांची वीज तोडणाऱ्या खोके सरकारचा धिक्कार असो…", अशी घोषणाबाजी विरोधकांच्यावतीने विधीमंडळाच्या पायऱ्यांवर देण्यात येत आहे. #Maharashtra #Pune pic.twitter.com/NqbYSzbkDx
— LoksattaLive (@LoksattaLive) March 2, 2023
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. आज राज्यपालांच्यावतीने सॉलिसिटर जनरल हरिश साळवे युक्तिवाद करणार आहेत.