Maharashtra Political Updates Updates, 28 February 2023: सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी चालू असल्यामुळे त्यावरून राज्यातलं राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालं आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने उभे ठाकले आहेत. सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधक सज्ज असताना विरोधकांचा सामना करण्यासाठी सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनीही तयारी केली आहे.
या राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra Budget Session 2023-2024 Live, 28 February 2023: ठाकरे विरुद्ध शिंदे वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
अरविंद सावंत म्हणतात, “राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेनं १२४ जागा लढवल्या. त्यातल्या ५५-५६ आम्ही जिंकल्या. मग पराभूत उमेदवारांची मतं कुणाची? त्यांचा कुणी बाप नाही का? फक्त आमदार…!”
दिल्लीमधील कथित उत्पादन शुल्क घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना रविवारी अटक केली होती. त्यांच्या अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. दिल्ली मुंबईसह अनेक ठिकाणी आपकडून आंदोलनं करण्यात येत आहेत. अशात भाजपा नेते आशिष शेलार यांनी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने राबवलेल्या मद्यधोरणावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी बाजू मांडल्यानंतर आज शिंदे गटाचे वकील आपली त्यांची बाजू मांडतील. तत्पूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
सरकारला फक्त ४० आमदारांची पडलेली आहे, जनतेला वाऱ्यावर सोडण्यात आलं आहे – रोहित पवार
विरोधी पक्षांनी विधानभवनाच्या बाहेर पायऱ्यांवर कांदा आणि कापसाला भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी विरोधकांकडून घोषणाबाजी केली जात आहे.
आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर आधी अभिषेक मनू सिंघवी यांचा राहिलेला युक्तिवाद सुरू होईल. त्यानंतर ठाकरे गटाचे तिसरे वकील कामत यांचा युक्तिवाद होईल.
A Constitution Bench of the Supreme Court to hear today the cases related to rift in #ShivSena.
— Live Law (@LiveLawIndia) February 28, 2023
A bench led by CJI DY Chandrachud will hear the matter. Follow this thread for live-updates.#UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourtOfIndia #SupremeCourt #ShivSenaCrisis pic.twitter.com/WKRo95yRt1
आज शिंदे गटाचे वकील बाजू मांडायला सुरुवात करतील. महेश जेठमलानी, तुषार मेहता हे आज बाजू मांडतील. गुरुवारपर्यंत हा युक्तिवाद चालण्याची शक्यता आहे.

३-४ रुपये किलो दराने शेतकऱ्यांचा कांदा खपत असेल, तर शेतकऱ्यांनी काय करावं. या सरकारला कांद्याचा हार घालायला आम्ही आलोय. लाखो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. सरकारनं पावलं उचलली नाहीत तर आम्ही सरकारला कांद्यासारखं सोलून काढू – अमोल मिटकरी
आशिष शेलारांनी हवेत बार उडवण्याची टोळी निर्माण केली आहे. तुम्ही गेल्या ६ महिन्यातलं बोला. नगरविकास खात्याबाबत तुम्ही याचिका दाखल केली आहे. त्यात काय म्हटलंय त्यांनी? तो कुणाचा घोटाळा आहे. त्या घोटाळेबाजांच्या नेतृत्वाखाली तुम्ही महाराष्ट्रात काम करत आहात. एनआयटी घोटाळा काय आहे हे आशिष शेलारांनी सांगावं – संजय राऊत
भास्कर जाधव शिंदे गटात येण्यास इच्छुक होते यात तथ्य आहे. पण आता मोहित कम्बोज आणि नरेश म्हस्के यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते. तेव्हा भास्कर जाधव आणि मुख्यमंत्र्यांचं संभाषण चालू असायचं. ते आम्हालाही माहिती होतं. पण आता काय झालंय कल्पना नाही. त्यांना पटलं तर आम्ही त्याचा विचार करू. आमचा त्यांना विरोध नव्हता. आम्हाला उलट संख्याबळ वाढवायचं होतं. कुणी तसं सांगत असेल तर ते चुकीचं आहे. त्यांना जर यायचं असेल, तर आमचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले आहेत.
दोन तासांसाठी सीबीआय किंवा ईडी कुणाकडेही आली, तर तो देशाचा बादशाह होईल. पण हे लोकशाहीला धरून नाही. आजही अलोकशाही पद्धतीने हा देश चालतोय. फक्त विरोधी पक्ष आहेत म्हणून त्यांना त्रास दिला जातोय. तुमच्या पक्षात फक्त संत-महात्मे बसलेत का की जे दररोज हिमालयातून मंत्रालयात अप-डाऊन करतायत?
हा सत्तासंघर्ष नसून चोरांशी लढाई आहे. चोर, डाकू, सरदार यांच्याविरोधातला हा संघर्ष आहे. तो चालूच राहील. अंतिम विजय खऱ्या शिवसेनेचा होईल – संजय राऊत
मी आजपासून शिवगर्जना मोहिमेसाठी निघालो आहे. निवडणूक आयोगाच्या बदमाशीमुळे आमच्याकडचं शिवसेना हे नाव गेलंय. पण जनता आमच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. या जनतेला अभिवादन करण्यासाठी आणि शिवसैनिकांना पाठबळ देण्यासाठी शिवगर्जना मोहीम सुरू आहे – संजय राऊत
विरोधकांनी कांद्याला रास्त भाव मिळण्याची मागणी करत विधानभवनात अनोखं आंदोलन केलं. यावेळी विरोधी पक्षाचे आमदार डोक्यावर कांद्याच्या पाट्या घेऊन भवनात दाखल झाले. कांद्याला रास्त भाव मिळालाच पाहिजे, अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या.
मी नीलम गोऱ्हेंना पत्र दिलंय. वरच्या सभागृहात ही सुरुवात झाली आहे. बजोरिया यांना हे पद दिल्यामुळे पुढच्या घडामोडी पाहाता येतील. काल आम्ही गोऱ्हेंना पत्र दिलं आहे. शिवसेना पक्षाची मान्यता आम्हाला मिळाली आहे.त्यामुळे व्हीप किंवा इतर गोष्टी आमच्या चालतील. त्यामुळे आमच्या अर्जावर वर विचार केला जाईल. – भरत गोगावले
विधानसभा प्रतोदपदाचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आता विधानपरिषद प्रतोदपदाचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. शिंदे गटाकडून विप्लव बजोरिया तर ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांची नावं प्रतोद पदासाठी विधानपरिषद सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत.