Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 Updates : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन महाविकासआघाडी सरकारने भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी हे आरोप झाल्याने याचे पडसाद अधिवेशनातही पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनासह राज्यातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Budget Session 2023-2024 Updates, 27 February 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेसनासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…
गिरीश महाजन म्हणाले, “माझ्यावर आजही मोक्का लागलेला आहे. न्यायालयाने मला सवलत दिली आहे म्हणून मी तुरुंगाबाहेर आहे. तीन वर्षे १२ दिवसांपूर्वी एक घटना घडली आणि गिरीश महाजन यांनी तू माझ्या नादी लागू नको अशी कोणाला तरी धमकी दिल्याचा आरोप करून माझ्यावर मोक्का लावण्यात आला. मी सहा टर्म आमदार आहे, मागे मंत्री होतो. माझ्याविरोधात कोणाला शिवी दिल्याची किंवा चापट मारण्याची राज्यात एकही तक्रार दाखल नाही. असं असूनही माझ्यावर थेट मोक्का लावण्यात आला.”
निवडणुक आयोग बोगस! त्याला चुना लावणारा आयोग म्हणायला हवे. सगळं भाजपाच्या सोयीने सुरु आहे. आता सगळ्यांना पटायला लागलंय की, २०२४ ची निवडणूक कदाचित शेवटची निवडणूक असेल. कपिल सिब्बल जे म्हणाले ते योग्य आहे. घटना स्पष्ट आणि स्वच्छ आहे. मध्येच निवडणुक आयोगाने चोमडेपणा करण्याची गरज नव्हती.
– उद्धव ठाकरे
आई वडील जे संस्कार देतात ते झाले नाहीत, की मग दुसऱ्यांची गोष्ट चोरण्याची वेळ येते. त्यामुळे मी चोरांवर जास्त बोलणार नाही. त्यांना लाज-लज्जा नसेल, पण दिवारमध्ये जसा हातावर शिक्का होता, तसाच हे जेव्हा छातीवर धनुष्यबाण लावतील तेव्हा त्यांच्या कपाळावर शिक्का असेल की, तू स्वतः चोर आहेस. हे चोरलेलं धनुष्यबाण आहे.
– उद्धव ठाकरे
चोरीचा मामला, जोरजोरात बोंबला, अशी शिंदे गटाची अवस्था; सर्वकाही चोराल, पण ठाकरे कसे चोराल, ठाकरे म्हणजे मी एकटा नाही, माझ्यासमोर असलेली जनता म्हणजे ठाकरे, काहीही चोरता येतं, पण संस्कार चोरता येत नाहीत, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
मी आणीबाणीचा काळही पाहिला आहे. त्यावेळी देशात बेधुंदी माजेल की काय अशी परिस्थिती होती. म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. मात्र, याचा अर्थ नंतर आणीबाणीत जे झालं त्याला शिवसेनाप्रमुखांचा पाठिंबा होता असं नाही. आणीबाणीत मार्मिकवरही बंधनं होती. मार्मिक छापण्यासाठी बंदी नाही, मात्र मार्मिकच्या छापखान्यावर बंदी अशी विचित्र बंदी असायची. इतर कोणी छापून द्यायला तयार व्हायचे नाही.
– उद्धव ठाकरे
कोल्हापूर : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अटके विरोधात सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी निदर्शने केली.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने कथित मद्य घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. या अटकेचे पडसाद कोल्हापुरात सायंकाळी उमटले. छ. शिवाजी चौक येथे आपने निदर्शने केली.
सिसोदिया अटकेचा धिक्कार असो अशा घोषणा देण्यात आल्या. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. खोट्या आरोपांमध्ये अडकवून तुरुंगामध्ये टाकण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांनी केला. जिल्हाध्यक्ष निलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजीत कांबळे, सुरज सुर्वे, अमरजा पाटील यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिरोळ तालुक्यात निदर्शने
जयसिंगपूर मध्ये क्रांती चौकात मागणी पक्षाच्यावतीने याच प्रश्नावर आपने निदर्शने केली. केंद्रीय यंत्रणा व मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तालुका संघटक शंकर जाधव, आदम मुजावर, सुदर्शन कदम, जयंतीलाल पटेल यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
व्हिप न बजावण्याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नव्हतं, तर त्यांच्या वकिलांनी तसं आश्वासित केलं होतं. याचा अर्थ ते कोर्टाला जुमानत नाहीत. त्यांना वाटतं निवडणूक आयोगाप्रमाणे कोर्टही आम्ही खिशात घेऊन फिरू शकतो. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल.
– संजय राऊत
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, बनगाव, किडंगीपार, माल्ही, पदमपुर, कुंभारटोली, बिरसी, रिसामा या आठ गावांनी मध्यप्रदेशात विलीनीकरणाची मागणी केली आहे.
नाशिक – जातपंचायतीच्या सर्वच घटनांमध्ये महिलांवर अन्याय, अत्याचार झाल्याचे दिसून येत आहे. महिलांच्या इतर प्रश्नांसह जातपंचायतीकडून झालेल्या अन्यायाच्या व्यथा आता संयुक्त राष्ट्रसंघ पुरस्कृत आंतरराष्ट्रीय महिला आयोगात मांडल्या जाणार आहेत.
पुणे : महाराष्ट्र वैद्यक परिषदेकडे नोंदणी न करता होमिओपॅथी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या लोहगाव परिसरातील बाेगस डॉक्टरवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी (२५ फेब्रुवारी) कारवाई केली. या प्रकरणी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
ठाणे : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आरोपांमुळे वादग्रस्त ठरलेले ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याकडे असलेला स्थावर मालमत्ता विभागाचा पदभार पालिका प्रशासनाने काढून घेतला असून, हा पदभार लोकमान्य-सावकरनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पुणे : शहरातील उच्चभ्रू भागातील महिलांचे मोबाइल क्रमांक मिळवून त्यांच्याशी अश्लील संभाषण करणाऱ्या दिल्लीतील एकासह महिलेला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली.
ठाणे : तुम्ही काचेच्या घरात राहत असल्यामुळे दुसऱ्यांच्या घरावर दगड मारण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा तुम्ही उद्ध्वस्त व्हाल. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला महाराष्ट्रात फिरताना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.
आमचं हे प्रकरण जनतेसमोर आहे. देवेंद्र फडणवीस आणि आम्ही जेव्हा पेन ड्राईव्हच्या स्वरुपात हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांना सांगितलं तेव्हा ते संपूर्ण राज्याने पाहिलं. प्रविण चव्हाण हे 'स्पेशल पीपी' आहेत. मविआ सरकारच्या काळात त्यांच्याकडे सर्व महत्त्वाच्या केसेस देण्यात आल्या होत्या. त्यामागे कोणाचा काय हेतू होता हे मला माहिती नाही. परंतु, प्रविण चव्हाण यांच्यावर एक कोटी रुपयांची खंडणी घेतल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे सर्व पुरावे देण्यात आले आहेत.
– गिरीश महाजन (एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया)
आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. आज पहिल्या दिवशी जवळपास सर्वच आमदारांनी अधिवेशनाला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यादेखील आपल्या लहान बाळाला घेऊन विधिमंडळात दाखल झाल्या होत्या. मात्र, बाळाला ठेवण्यासाठी हिरकणी कक्षात सोयी-सुविधा नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांना अश्रूही अनावर झाले होते. दरम्यान, हिरकणी कक्षाच्या या दुरावस्थेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारवर टीकास्र सोडलं आहे. विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. सविस्तर वाचा
गडचिरोली : एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याबद्दल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माहिती होती. म्हणूनच बंडखोरीच्या महिन्याभरापूर्वी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना बोलावून घेतले व तुला मुख्यमंत्री व्हायचे आहे काय, अशी विचारणा केली होती.
ठाणे : गेले चार दिवस सुरू असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करत पालिका प्रशासनाने शहराचा पाणी पुरवठा सुरळीत केला असला तरी, ठाणे, घोडबंदर, कोपरी, वागळे इस्टेट भागातून पाणी टंचाईच्या तक्रारी पालिकेकडे येत आहेत.
काय ते राज्यपालांचं लांबलचक भाषण, त्यांचं भाषण सुरू असताना भाजपा नेते आशिष शेलार झोपले होते. इतकं लांबलचक आणि कंटाळवाणं राज्यपालांचं भाषण होतं. या भाषणात केवळ विकासाच्या गप्पा होत्या.
– अमोल मिटकर (आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या अटकेविरोधात आपचं मुंबईत आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात, देशभरात ठिकठिकाणी आपचे कार्यकर्ते रस्त्यावर
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, यासंदर्भात बोलताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
गडचिरोली : भाजपाला देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपवायचे आहे. यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह स्वतः उपग्रहाच्या माध्यमातून ‘ईव्हीएम’ नियंत्रित करत आहेत. त्यांनी या कामासाठी माणसे ठेवली असून त्यातीलच एकाने मला ही गोपनीय माहिती दिली, असा खळबळजनक आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
नेरूळ येथून ५० हजार रुपयांची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. एक महिला पाण्याच्या पाच लिटरच्या दोन बाटल्यांत गावठी दारू विकताना आढळून आली. तिला विचारणा केली असता तिने ही गुळाने बनवलेले गावठी दारू असल्याची कबुली दिली.
कल्याण – ऑक्टोबरपासून खरीप हंगामात लागवड केलेल्या हरभरा, भेंडी, वाल, गवार, वांगी, टोमॅटो, तूर अशी अनेक पिके नीलगायींचे कळप फस्त आणि नासाडी करत असल्याने ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर, भिवंडी तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे.
महाराष्ट्राच्या २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. यात मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असतानाच सत्ताधारी भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी 'पॉईंट ऑफ प्रोसिजर'च्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेत भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकी देत असल्याचा आरोप केला. ते सोमवारी (२७ फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.
शोकसभेनंतर विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित, उद्या सकाळी ११ वाजल्यानंतर सभागृह सुरू होणार, विधानपरिषदेचंही कामकाज स्थगित, उद्या दुपारी १२ वाजेनंतर सभागृह सुरू होणार
#मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.#मराठी_राजभाषा_गौरव_दिन pic.twitter.com/DVY55AyzBJ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 27, 2023
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेवून त्यांना त्याबाबत विनंती करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.
भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. तसेच काय चाललं आहे असा प्रश्न विचारला.
यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. ते म्हणाले, “भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही. हे योग्य नाही. सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल.”
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाती पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली ठोंबरे यांच्याविरुद्ध आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी तक्रारी करण्यात आल्या. या तक्रारीची दखल घेत निवडणूक निर्णय अधिकार्यांनी कारवाई सुरू केली आहे.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवडे ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप बजावू नये, असे निर्देश दिले होते. मात्र, तरीही आज प्रतोद भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना व्हीप बजावल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडलं आहे. विधिमंडळाच्या बाहेर पत्राकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
माझ्या सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार डिप्लोमा आणि इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून अभ्यास करण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी मराठीतून अभ्यासक्रमही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
– रमेश बैस (राज्यपाल, महाराष्ट्र)