Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 Updates : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन महाविकासआघाडी सरकारने भाजपा नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर राज्यातील राजकारणाचा पारा चढला आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी हे आरोप झाल्याने याचे पडसाद अधिवेशनातही पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनासह राज्यातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एकाच क्लिकवर…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Budget Session 2023-2024 Updates, 27 February 2023 : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेसनासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींच्या अपडेट्स एका क्लिकवर…

11:35 (IST) 27 Feb 2023
अधिवेशनासाठी राज्यपाल रमेश बैस यांना पोलीस पथकाकडून मानवंदना

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी राज्यपाल रमेश बैस यांचे विधानभवनात आगमन झाल्यावर पोलीस पथकाने त्यांना मानवंदना दिली.

11:22 (IST) 27 Feb 2023
राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे आणि मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली पाटील ठोंबरे आणि मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, धंगेकरांवर उपोषण करत आचार संहिता उल्लंघनाचा आरोप, तर रुपाली ठोंबरेंवर गोपनियतेचा भंग केल्याचा आरोप, दरम्यान, भाजपाचे उमेदवार रासनेंवरही भाजपाचं निवडणूक चिन्ह कमळाचं उपरणं घालून मतदान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

11:14 (IST) 27 Feb 2023
शिंदे-फडणवीसांकडून विधिमंडळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन

विधिमंडळाच्या सन २०२३-२४ चं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन, यावेळी मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री आदी मान्यवरही उपस्थित

11:10 (IST) 27 Feb 2023
फडणवीसांनी स्वतःच्या सरकारमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना राजकारणातून संपवलं – भास्कर जाधव

देवेंद्र फडणवीसांवर कोणाचाही विश्वास नाही. महाराष्ट्राचं अतिशय सुसंस्कृत, वैचारिक राजकारण देवेंद्र फडणवीसांना खराब केलं. फडणवीसांनी स्वतःच्या सरकारमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांना राजकारणातून संपवलं. त्यांनी आपल्याच सरकारला पाठिंबा देणाऱ्यांचं फोन टॅपिंग केलं. त्यामुळे फडणवीसांच्या काळात महाराष्ट्राची उच्च परंपरा डागाळली गेली, महाराष्ट्राची वैचारिक बैठक विस्कळीत झाली. त्यामुळे त्यांनी कितीही उसणं अवसान आणून वक्तव्ये केली, तरी महाराष्ट्र फडणवीसांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यांचा पक्षही त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही.

– भास्कर जाधव (आमदार, ठाकरे गट)

11:05 (IST) 27 Feb 2023
“त्यांच्या व्हिपला भीक घालत नाही”, भास्कर जाधव आक्रमक, फडणवीसांचं नाव घेत म्हणाले…

शिंदे गटाच्या व्हिपला भीक घालत नाही. मुख्यमंत्रीपद गेलं, ४० आमदार गेले, १३ खासदार गेले, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला, आमची सुरक्षा व्यवस्था काढली तरी आम्ही घाबरलो नाही. या व्हिपचं काय घेऊन बसला. असे अनेक व्हिप आम्ही बघितले, ते आले आणि गेले – भास्कर जाधव

10:48 (IST) 27 Feb 2023
विरोधी पक्षनेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला

विरोधी पक्षनेते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला, अजित पवार, अंबादास दानवेंसह अनेक नेते उपस्थित, विधिमंडळात ठाकरे गटाला कार्यालय देण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने व्हिपबाबत दिलेल्या निर्देशांवरही चर्चा

10:44 (IST) 27 Feb 2023
शिवसेना नाव आणि चिन्ह मिळताच ठाण्यात शिंदेगटाकडून शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात, लोकमान्यनगर शाखेच्या वादातून राडा

ठाणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी रात्री शिंदे गटाने लोकमान्यनगर येथील शाखेतील उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र काढल्याचे कळते आहे.

सविस्तर वाचा…

10:43 (IST) 27 Feb 2023
ठाण्यातील तलावात मृतदेह आढळल्याने खळबळ

ठाणे : ठाणे येथील कारागृहाजवळील तलावात सोमवारी सकाळी ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला असून त्याची अद्याप ओळख पटली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

सविस्तर वाचा…

10:43 (IST) 27 Feb 2023
“अजित पवारांनी चहापाण्याचा खर्च काढून चूक केली”, शिंदेंनीही उद्धव ठाकरेंच्या काळातला हिशेब मांडला; म्हणाले, “फेसबुकवर बसून…”

“वर्षा गेले अडीच वर्ष बंद होतं. सहा सात महिन्यांपासून लोक वर्षावर येत आहेत. वर्षावर आल्यानंतर लोकांना चहा-पाणी द्यायचं नाही का? आम्ही त्यांना बिर्याणी खाऊ घालत नाही. पण चहापाणी देऊ शकत नाही का? आज अजित पवार यांनी चहापाण्याचा हिशेब काढला. मग आम्हाला सांगा तुम्ही ७० हजार कोटी सिंचनासाठी पाण्यात घातले. तरीही शून्य पॉईंट जमीन सिंचनाखाली आली नाही. हे मी म्हणत नाही, तर पृथ्वीराज चव्हाण आणि कॅगनेच म्हटले आहे. शेवटी त्याचाही हिशेब द्यावा लागेल. कुठे घसरता याचा विचार करा? सात महिन्यात महिन्याला चाळीस लाखांचा खर्च झाला. ज्यावेळी फेसबुक लाईव्ह सुरु होतं, तेव्हा वर्षा बंगल्याचा महिन्याचा खर्च तीस ते पस्तीस लाख होता. ही माहिती अजित पवारांनी घ्यायला हवी होती. आता तर प्रत्यक्ष फिल्डवर काम करत आहोत. याचे साक्षीदार माध्यमातील लोक आहेत, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांवर टीका केली.

सविस्तर वाचा…

10:42 (IST) 27 Feb 2023
गणेश बिडकर यांच्यावर अदखलपात्र गुन्हा, कसबा पोटनिवडणुकीत पैसे वाटपाच्या आरोपावरून गुन्हा दाखल झालेले भाजपचे दुसरे माजी नगरसेवक

पुणे : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

सविस्तर वाचा..

10:42 (IST) 27 Feb 2023
“राष्ट्रद्रोह्यांबरोबर चहा पिण्याची वेळ टळली”, म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून ( २७ फेब्रुवारी ) सुरुवात झाली. करोनानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक काळ महिनाभर हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला. चहापानाला गेलो असतो, तर महाराष्ट्रद्रोह झाला असता, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर केली होती.

सविस्तर वाचा…

10:42 (IST) 27 Feb 2023
शिंदे गटानं शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना बजावला व्हीप; ठाकरे गट काय भूमिका घेणार?

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमुळे शिवसेनेचा व्हीप चर्चेचा विषय ठरला होता. एकीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यामुळे व्हीपचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना दुसरीकडे त्याच व्हीपच्या आधारावर शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. मात्र, आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असताना या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा व्हीपचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा…

महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३-२०२४ लाइव्ह