Maharashtra Political News, 03 March 2023: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झालेला असताना त्यांच्याविरोधात विधानसभेत हक्कभंगाचा ठराव आणण्यात आला आहे. त्यावर अध्यक्षांनी सर्वपक्षीय समिती नेमली असून त्यातील सदस्यांवरूनही वाद चालू आहे. त्यात आज राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उत्तराच्या रुपात पुन्हा एकदा राजकीय टोलेबाजी विधानसभेत होण्याची शक्यता आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Assembly Budget Session 2023-2024 Live Day 5 Updates
कुणावर हल्ला झाला हे मला माहिती नाही, मी काही पाहिलं नाही. अलिकडे अनेकांना अशा धमक्या दिल्या जात आहेत, हल्ले होत आहेत. पण राज्याचे गृहमंत्री या हल्यांना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. अशा लहान-सहान किरकोळ गोष्टींमध्ये शिवसेना कधी पडत नाही. आता कुणाला सनसनाटी निर्माण करायची असेल, तर काही लोक स्वत: हल्ले करून घेतात अशी माझी माहिती आहे. होऊ शकतं असं. पण जर कुणावर मुंबईत हल्ला झाला असेल आणि तो राजकीय कार्यकर्ता असेल तर पोलिसांनी ती बाब गांभीर्यानं घ्यायला हवी. आमची नावं घेऊन काय होणार? – संजय राऊत
मी कोणत्याही जाती-धर्मावर टीका-टिप्पणी करणार नाही. पण उद्या कोथरूडमधून चंद्रकांत पाटील निवडणूक लढणार आहेत का हे त्यांना विचारा. कारण पुण्याची हवा बदललीये. चंद्रकांत पाटील अपनी टोपी संभालो – संजय राऊत
कसबा भाजपाचा बालेकिल्ला राहिला. त्यांना वाटलं तो त्यांचाच बालेकिल्ला आहे. पण तुमचा विजय शिवसेनेच्या मदतीने होतो हे कालच्या निकालानं स्पष्ट झालं. त्या मतदारसंघात शिवसेनेचं मोठं योगदान आहे. ४०-५० हजार शिवसेनेची मतं भाजपाला पडत होती. ज्यांना चिन्ह आणि पक्ष दिलंय, त्या गटाकडे शिवसेनेची मतं असती, तर भाजपाचा तिथला उमेदवार जिंकला असता. – संजय राऊत
मी सांगलीत प्रवेश केला, तिथून इथपर्यंत लोक रस्त्यावर, सभागृहात, चौकात जे स्वागत मिळालं.. हे शिवसेनेचं स्वागत आहे. लोक वाट पाहात होते. हे उद्धव ठाकरेंचं स्वागत आहे. सांगलीत शिवसेनेचं महत्त्व असताना इतकी वर्षं आम्ही भाजपाला हा भाग जणू आंदण दिला होता. जे काल कसब्यात झालं, तेच २०२४ला सांगलीत आणि मिरजेत होईल. इथे शिवसेना लढेल. जनता आमच्याबरोबर आहे. सांगली-कोल्हापूरचे सर्व जातीधर्माचे लोक आमच्याबरोबर आहेत – संजय राऊत
यवतमाळ- घाटंजी तालुक्यातील उंबरझरा (झंझाळा) येथे प्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती संस्थान आहे. या संस्थानचे कामकाज पाहणाऱ्या महाराजांच्या वृद्धत्वाचा फायदा घेत मंदिराच्या विश्वतांनीच मंदिराची मालमत्ता लुटल्याचा प्रकार घडला आहे. सविस्तर वाचा…
देशात जानेवारी व फेब्रुवारी या दोन महिन्यात तब्बल ३४ वाघांचा मृत्यू झाला आहे. यात ८ वाघांचा मृत्यू हा महाराष्ट्रात झाला असून ६ वाघ हे एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. वाघाचे वाढते मृत्यू चिंतानजक असल्याने यावर तातडीने उपाययोजना होणे गरजेचे झाले आहे.
पुणे : ‘कॅशबॅक’च्या लाभापोटी एका युवकाने पावणेदोन लाख गमावले. पैसे तर मिळाले नाहीच, पण त्याच्या बँक खात्यातून एक लाख ८८ हजार रुपये सायबर चोरट्यांनी लंपास केले.
संक्रमण शिबिरांमध्ये पुरेसे निवासी गाळे उपलब्ध नसल्यामुळे म्हाडाच्या मुंबई मंडळाने बीडीडी चाळींतील रहिवाशांना आता ११ महिन्यांचे घरभाडे एकत्रित देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्ताव मंडळाने राज्य सरकारला पाठविला आहे. सविस्तर वाचा…
देशभरात मध्य रेल्वेची माल वाहतूक सेवा सुरू असून अनेक अत्यावश्यक वस्तूंची जलदगतीने वाहतूक करण्यात येते. या माल वाहतुकीतून मध्य रेल्वेच्या तिजोरीत भर पडत आहे. एप्रिल २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मध्य रेल्वेने ७३.१६ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली आहे. सविस्तर वाचा…
Apple ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. ही कंपनीचे मुख्य कार्यालय हे यूएसमध्ये आहे. Apple चा भारतातील प्राथमिक पुरवठादार फॉक्सकॉन भारतात गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील मोठी कंपनी असलेल्या Foxconn (फॉक्सकॉन) तेलंगणा राज्यामध्ये गुंतवणूक करणार आहे. Foxconn ने इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सेटअप उभारण्यासाठी तेलंगणा सरकारसोबत करार केला आहे. वाचा सविस्तर बातमी
पुणे : शहरातील विविध भागांत जबरदस्तीने मोबाइल हिसकावणाऱ्या कर्नाटकातील चोरट्याला वानवडी पोलिसानी अटक केली. शरद मंजुनाथ (वय २२, रा. शिमोगा, कर्नाटक) असे त्याचे नाव आहे. तर त्याचे साथीदार फरार झाले असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
पुणे : राज्य मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाज माध्यमात पसरल्याचे निदर्शनास आले. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच हा प्रकार झाल्याची माहिती असून, या प्रकाराची राज्य मंडळाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पुणे : राखीव वनात दुचाकी घेऊन गेल्याने हटकले म्हणून वनरक्षकास शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या दोघांना न्यायालयाने तीन महिने कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी हा निकाल दिला.
मध्य रेल्वेच्या खारकोपर स्थानकानजीक २८ फेब्रुवारी रोजी लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले होते. मध्य रेल्वेच्या संबंधित विभागाने युद्धपातळीवर लोकलचे तीन डबे रुळावर आणून तब्बल ११ तासांनी लोकल सेवा पूर्ववत केली. या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सविस्तर वाचा…
बहुचर्चित सूरजागड लोहखाणीतील वाढीव उत्खननाला केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाने अनेक अटींसह मंजुरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या या खाणीतून वर्षाकाठी ३० लाख टन इतक्या लोहखनिज उत्खननाला परवानगी होती. आता ती वाढून १ कोटी टन इतकी होणार आहे. सविस्तर वाचा…
गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा होत असल्याची माहिती कळताच दामिनी पथक, महिला व बालविकास विभागाचे जिल्हा बाल सरंक्षण कक्ष आणि गोंदिया ग्रामीण पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी दाखल होत १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे होत असलेले लग्न थांबवले. सविस्तर वाचा…
बंडखोर राहुल कलाटे यांचे चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत डिपॉझिट जप्त झाले आहे. राहुल कलाटे यांनी निवडणुकीपूर्वी १ लाख १२ हजारांचे जणमत माझ्या पाठीशी आहे, मी जनतेच्या मनातील आमदार आहे. असा दावा करणाऱ्या राहुल कलाटेंना डिपॉझिटही राखता आले नाही.
नागपूरमध्ये २१ आणि २२ मार्च दरम्यान जी-२० देशांच्या प्रतिनिधी मंडळाची बैठक होत असून यानिमित्ताने नागपूरचे ‘ टायगर कॅपिटल ऑफ इंडिया’ असे ब्रॅण्डिंग केले जात आहे. वास्तविक नागपूरची ओळख ही या परिसरात उत्पादित होत असलेल्या व चवीमुळे देशविदेशात प्रसिद्ध पावलेल्या संत्र्यामुळे संत्रानगरी अशी आहे. सविस्तर वाचा…
OpenAI च्या chatgpt या चॅटबॉटची प्रसिद्धी जगभर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वत्र टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये AI चॅटबॉटची चर्चा सुरु आहे. याला प्रत्येकजण टेक्नॉलॉजी क्षेत्रातले भविष्य समजत आहे. पण हा चॅटबॉट नोकरी करणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका असल्याचे अनेकांचे मत आहे. दरम्यान Infosys चे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी AI आणि ChatGPT च्या भवितव्याबद्दल आपले विचार व्यक्त केले आहेत. वाचा सविस्तर बातमी
मतदारसंघाच्या निमिर्तीपासून पहिल्यांदाच ‘घड्याळ’ चिन्हावर लाखभर मते मिळाल्याने राष्ट्रवादीचा आत्मविश्वास उंचावला आहे. त्यामुळे भाजपला एकतर्फी वाटणारी आगामी महापालिका निवडणूक जिंकणे सोपे राहणार नाही.
धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा पराभव केल्यानंतर त्यांनी मागील अनेक महिन्यांपासून आजारी असलेल्या खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
विरोधी पक्षनेत्यांनी गंभीर मुद्दा उपस्थित केलाय. काही विशिष्ट भागात एक रॅकेट सर्रासपणे चालू आहे. राज्यसरकारनं कॉपीमुक्त अभियान या परीक्षेच्या निमित्ताने सुरू केलं होतं. तरी हे प्रकरण गंभीर आहे. तात्काळ त्या विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशीच्या सूचना देऊ. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत यावर निवेदन सादर करण्याची कार्यवाही करू. – विखे पाटील
“मीच अर्थमंत्री आहे, त्यामुळे नागपूरच्या विकासाला निधी कमी पडणार नाही” असे पालकमंत्री म्हणून नागपूरकरांना आश्वस्त करणारे देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्रीही आहेत. त्यामुळे ते सादर करणार असलेल्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात नागपूर-विदर्भासाठी काय घोषणा करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांत भाजपला बालेकिल्ल्यांमध्येच पराभवाचे धक्के सहन करावे लागले आहेत. नव्याने कसबा पेठ मतदारसंघाचा समावेश त्यात झाला आहे.
उदय सामंत वगैरे सगळे सभागृहात आहेत. आत्ता सिंदखेडराजा परिसरात बारावीचा गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच साडेदहा वाजता फुटला. तो सगळीकडे प्रसिद्ध झालाय. ते रॅकेट आहे की काय आहे? अभ्यास करणाऱ्या मुलांचं किती वाटोळं आहे. सरकार काय करतंय मला काही कळत नाही. सरकार झोपलंय की काय? मग पुन्हा तुम्हा म्हणता दादा बोलतात, दादा बोलतात. हे बारावीच्या मुलांचं नुकसान आहे. मध्येही एका पेपरचं तसंच झालं – अजित पवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
नवी मुंबई – जगभरात निर्माण झालेल्या करोनाच्या स्थितीनंतर, तसेच नवी मुंबई महापालिकेत पालिका आयुक्तांचा प्रशासकाचा कारभार सुरू झाल्यापासून अनावश्यक कामे तात्काळ वेगाने काढण्याचा सपाटाच पालिका प्रशासनाच्यावतीने लावला जात असल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर या निकालाने पुण्यातील पक्षीय राजकारणामध्ये आगामी काळात उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपमधील अंतर्गत धूसफूस यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्याने भविष्यातील महापालिका निवडणुकीत त्याचे पडसाद उमटणार आहेत. सविस्तर वाचा
कल्याण-कल्याण ते टिटवाला रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गुरुवारी दुपारी एका प्रवाशाने धावत्या लोकलमध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला माल वाहतूक डब्यात बेदम मारहाण केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे. सविस्तर वाचा
संजय राऊतांविरोधात हक्कभंग ठराव विधानसभेत आल्यानंतर आता त्यावर हक्कभंग समितीची स्थापना करण्यात आली आहे. या हक्कभंग समितीची बैठक सुरू झाली आहे.
कल्याण- येथील शिवगर्जना मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अर्वाच्च भाषेत शेरेबाजी करत त्यांना अर्वाच्च भाषेत भाषणातून शिवीगाळ करणाऱ्या मुंबई महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) महिला मुंबई संघटक राजुल पटेल यांच्या विरुध्द शिंदे गटाच्या समर्थक छाया वाघमारे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार केली आहे. सविस्तर वाचा…