Maharashtra Breaking News Updates, 08 March 2023 : होळीच्या सुट्टीनंतर आज (८ मार्च) पुन्हा महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरलं जात आहे. बारावी प्रश्नपत्रिका परीक्षेच्या आधीच फुटल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनातच सरकारवर हल्ला चढवला. त्यातच आता शेतकरी प्रश्नावरही विरोधक आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे आज जागतिक महिला दिन असल्याने सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी महिला दिनाचे कार्यक्रम होत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकारणासह महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Latest News Updates : राजकारणासह महाराष्ट्रातील सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा…
“तक्रारदाराने धाडस दाखवून तक्रार केली. त्यामुळे त्याला संरक्षण दिलं पाहिजे. त्याच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल झाले आहेत, हे पोलीसही मान्य करतात. त्यामुळे त्याला पूर्ण संरक्षण दिलं पाहिजे. हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करणाऱ्याला योग्य प्रायश्चित देणं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टाळतील, असं मला वाटत नाही. जो गुन्हेगार असेल त्याचा पिच्छा पुरवण्याचं काम ते करतील का? किती महिन्यात गुन्हेगारांना अटक होईल? आणि राज्य सरकार किती दिवसात हडप केलेल्या हिंदू देवस्थानच्या जमिनी परत देवस्थांनांना मिळवून देईल?
– जयंत पाटील
हे प्रकरण फार गंभीर आहे. या प्रकरणात पोलीस, भ्रष्टाचार विरोधी विभाग वेळकाढूपणा करत आहे. हे प्रकरण पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर एसीबीने बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशी केली आहे का? आरोपींविरोधात तपास अधिकाऱ्यांनी कोणती कारवाई केली?
– जयंत पाटील
सरकार बदलल्यावर तक्रारदाराचं निशुल्क संरक्षण काढून टाकण्यात आलं. तसेच तक्रारदारावर अहमदनगरमध्ये पॉक्सोअंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे तक्रारदाराला संरक्षण देण्याचं राहिलं, त्याचं संरक्षण काढण्यात आलं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातून तक्रारदाराला नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला.
– जयंत पाटील
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत मे २००८ नंतर रूजू झालेल्या असंख्य अधिकारी, कर्मचारी, कामगारांसाठी नवीन निवृत्ती योजना लागू करण्यात आली असून जुन्या निवृत्ती योजनेतील अनेक लाभांपासून ही मंडळी आजही वंचित आहेत. गेली १५ वर्षे या संदर्भात धोरण आखण्यात आलेले नाही.
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पिंपळेश्वर महादेव देवस्थान, विठोबा देवस्थान, रामचंद्र देवस्थान अशा हिंदू देवांच्या मंदिराच्या ट्रस्टची जमीन हडप करण्याचा मोठा प्रकार झाला आहे. हिंदू देवस्थानाच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण सहन करणार नाही याची मला खात्री आहे. पिंपळेश्वर महादेव ट्रस्टमध्ये एका दुधसंघाच्या कर्मचाऱ्याच्या नावाने ५०-६० एकर जमीन आहे. विठोबा देवस्थानाची जमीन मनोज रत्नपारखे या व्यक्तीच्या नावावर आहे. रामचंद्र देवस्थानची जमीन रोहित जोशी यांच्या नावावर वर्ग झाली.
– जयंत पाटील
शेतकऱ्यांच्या पिकांची राखरांगोळी झाली आहे. त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. यापेक्षा मोठं काय होऊ शकतं? हे सगळं कामकाज बंद केलं पाहिजे. आज सरकारची शेतकऱ्यांबाबत भूमिका काय आहे? मागील आठवड्यातही कांदा-कापूस शेतकऱ्यांच्या प्रश्न समोर आला होता – नाना पटोले
वर्धा : बैलगाडा शर्यतींवर लावण्यात आलेली बंदी उठल्यानंतर लगेच गावगाड्यात उत्साह संचारला. माजी आमदार अमर काळे यांनी पुढाकार घेत तळेगावला शंकरपटाचे आयोजन केले.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी, अजित पवार, छगन भुजबळ, अंबादास दानवे, बंटी पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित
सोमवारी आणि मंगळवारी शहरात झालेल्या पावसानंतर आजही शहरात काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
इंदापूर परिसरातील माळवाडीत दरोडा घालून पसार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून पावणे नऊ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणी सागर अरुण राऊत (रा. टेंभुर्णी), दादा बळी शेंडगे (रा. इंदापूर) यांना अटक करण्यात आली आहे. सविस्तर वाचा…
नागपूर : तुर्कमेनिस्तान देशातून नुकत्याच एका सुंदर सापाच्या प्रजातीला त्याचे अस्तित्व मिळवून देण्याचे काम वन्यजीव संशोधकांनी केले आहे. या संशोधनामध्ये ११ देशांमधील विविध संशोधकांचा समावेश आसून, भारतामधून अमीत सैय्यद, विवेक शर्मा, एस. आर. गणेश, तसेच एच. टी. लारेमसंगा यांचा मोलाचा वाटा आहे.
वैद्यकीय उपकरणे निर्मिती क्षेत्रातील ऐरॉक्स टेक्नॉलॉजीने ७५० कोटी रुपयांची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) योजना गुंडाळत असल्याचे नुकतेच जाहीर केले.
नामिबिया येथून आणलेल्या पहिल्या तुकडीतील तीन चित्त्यांना मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात कुनो राष्ट्रीय उद्यानाच्या खुल्या जंगलात सोडण्यात येणार आहे. यात दोन मादी आणि एका नर चित्त्याचा समावेश आहे. त्यादृष्टीने मध्यप्रदेश वन्यजीव मुख्यालयाची तयारी सुरू झाली आहे.
भंडारा : धूलिवंदनाच्या दिवशी गावाशेजारील तलावावर पोहायला गेलेल्या १६ वर्षीय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील लाखोरी गावात घडली. चैतन्य राजेश मुटकुरे, असे मृत मुलाचे नाव आहे. ऐन सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.
६ ते ९ मार्च या कालावधीत हवामान बदलणार आहे आणि वादळवारा, अवकाळी पाऊस येईल हे सांगितलं गेलं होतं. ते महाराष्ट्रात घडलं आणि शेतकरी राजाचं, बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. आंब्याचा मोहोर, हरभरा, गहू मका, ज्वारी पिक, भाजीपाला, द्राक्षं अशी अनेक पिकं यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकरी खचून गेला आहे. त्या खचलेल्या बळीराजाला मदत करा असं आवाहन आम्ही सरकारला करणार आहोत असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं.
Women’s Day 2023 : पारंपारिक मासेमारी व्यवसायाला फाटा देत तिने लहानपणापासूनच आकाशात उंच उडण्याचे स्वप्न उरी बाळगले होते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने आपले स्वप्न प्रत्यक्षात साकारले. अनेक अडचणींवर मात करत तिने आज एक यशस्वी वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आज अलिबाग तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलींसाठी कॅप्टन कृतज्ञा खऱ्या अर्थाने प्रेरणा स्त्रोत बनली आहे.
अजित पवार म्हणतात, “मी तर अनेकदा जाहीर सभांमधून आणि माध्यमांतही या गोष्टीचा उल्लेख केला आहे. सभागृहातही बोललो आहे. पण काय अडचण आहे हे कळायला मार्ग नाही.”
बावनकुळे म्हणतात, ” मी सहा महिन्यांपूर्वी राज्याचा प्रदेशाध्यक्ष म्हणून कारभार स्वीकारला. त्यानंतर पुनर्रचना करण्याचा विचार होताच. पण…!”
डॉ. प्रमोद साळवे यांना गडचिरोली- चातगाव बोदली गावाजवळ गाडी अडवून अपहरण, मारहाण व शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मोठे भाऊ विनोद पटोले यांच्यासह पाच व्यक्तींवर गडचिरोली पोलिस स्टेशनमध्ये सोमवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले आहेत. सविस्तर वाचा…
ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी एका ट्विटर कर्मचाऱ्यावर अपंगत्वाला ढाल केल्याचा आरोप केला. यानंतर या कर्मचाऱ्याने मस्क यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. तसेच त्याला नेमकं कशामुळे अपंगत्व आलं आहे याची सविस्तर माहिती देणारी ट्वीट्सची मालिकाच पोस्ट केली. मस्क यांनी कर्मचाऱ्यावर त्याच्या अपंगत्वावरून टीका केल्याने ट्विटर वापरकर्त्यांनीही मस्क यांच्यावर जोरदार टीका केली.
मुंबई : शहर आणि पूर्व उपनगरांत गुरुवारपासून दोन दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. ९ मार्च सकाळी १० वाजल्यापासून ११ मार्च सकाळी १० वाजेपर्यंत ही पाणीकपात राहणार आहे.
मुंबई : भविष्यात २०२७ नंतर मुंबईत येणाऱ्या वाहनांकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून टोलवसुली (पथकर वसुली) केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईच्या प्रदेशद्वारावरील पाच टोलनाक्यांवरील (पथकर नाके) पथकर वसुलीचे सध्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) असलेले अधिकार २०२७ मध्ये संपुष्टात येणार आहे. त्यानंतर हे अधिकार आपल्याला द्यावेत, अशी मागणी एमएमआरडीएकडून करण्यात आली आहे. या मागणीसंबंधीचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.