Maharashtra Budget Session 2025 Highlights, 05 March 2025 : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे असं सीआयडीने सांगितल्यानंतर आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचं क्रौर्य दाखवणारे फोटो व्हायरल झाल्यानंतर मागील तीन महिन्यांपासून जी मागणी होत होती ती प्रत्यक्षात उतरली आहे. ४ मार्चला धनंजय मुंडे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. महायुतीला २३७ जागा मिळाल्या, इतक्या प्रचंड बहुमताचं सरकार राज्यात आहे. मात्र अवघ्या तीन महिन्यांत धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडावं लागलं आहे. आजही धनंजय मुंडे यांचा विधानभवन परिसरात निषेध नोंदवण्यात आला. संजय राऊत यांनीही धनंजय मुंडेंना शपथच का दिली असा सवाल केला आहे. त्याचप्रमाणे सामनाच्या अग्रलेखातूनही धनंजय मुंडे प्रकरणावरुन सरकावर टीका करण्यात आली आहे. आज अधिवेशनाच तिसरा दिवस आहे. आज काय घडतं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
Maharashtra Budget Session 2025 Live, Day 3 | विधानसभेच्या पायऱ्यांवर पुन्हा एकदा विरोधकांचं आंदोलन, यासह महत्त्वाच्या बातम्या
अबू आझमींविरोधात शिवसेनेचं खालापूर या ठिकाणी आंदोलन
खालापूर तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसेच अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवत खालापूर तहसीलदार आणि खालापूर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा खालापूर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने घोषणाबाजी करत घटनेचा निषेध करण्यात आला आहे.
धनंजय मुंडेंच्या विरोधात बार्शीमध्ये आंदोलन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनामधील मुख्य सूत्रधार ओळखा,अशी मागणी करीत मराठा समाजाच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलय. संतोष देशमुख यांचा खून खटला फास्टट्रॅकमध्ये चालवावा, त्यामुळे राजकीय वरदहस्त असणाऱ्या सर्व गुंडांना कायद्याचा धाक बसेल आणि महाराष्ट्रातील गुंड प्रवृत्तीदेखील थांबेल,आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल. यासाठी हा खून खटला फास्टट्रॅक कोर्टामध्ये पाठविला जावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आलीय. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी, स्वारगेट बसस्थानकामधील बलात्कार प्रकरण यामुळे राज्याची कायदा - सुव्यवस्था प्रचंड ढासळली. याला सरकार जबाबदार आहे, अशी टीका यावेळी करण्यात आलीय.
अबू आझमींना वाचवण्याचं महाविकास आघाडीचं षडयंत्र-उदय सामंत
अबू आझमींना वाचवण्याचं षडयंत्र मविआ ची लोक करतायत असं चित्र निर्माण झालं आहे असा आरोप मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी अबू आझमी भाजपाचा माणूस आहे असा आरोप केला होता. त्यावर उदय सामंत यांनी हे उत्तर दिलं आहे.
सरकार आल्यापासून छत्रपती शिवरायांचा अपमान-अंबादास दानवे
हे सरकार आल्यापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय आणि त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. सगळ्यात आधी तर सुरुवात या राज्याचे राज्यपाल होते कोश्यारी त्यांनी सुरुवात केली होती. आता ज्या पद्धतीने कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवराय यांच्याविषयी वक्तव्य वापरले होते हा अपमान आहे आणि एकीकडे अबू आझमी यांचा विरोध सत्ताधारी करतात आणि आम्हीही केलेला आहे. एकीकडे सोलापूरकर आणि कोरटकर यांना सरकार पाठीशी घालते, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही, त्यांना अटक केली नाही. त्यांना संरक्षण देत आहे, हे सरकार दुतोंडी सरकार आहे
धनंजय मुंडे यांचा राजीनामा<br />(संग्रहित छायाचित्र)
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे असं सीआयडीने सांगितल्यानंतर आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचं क्रौर्य दाखवणारे फोटो व्हायरल झाल्यानंतर मागील तीन महिन्यांपासून जी मागणी होत होती ती प्रत्यक्षात उतरली आहे. ४ मार्चला धनंजय मुंडे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.