Maharashtra Budget Session 2025 Highlights, 05 March 2025 : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार आहे असं सीआयडीने सांगितल्यानंतर आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचं क्रौर्य दाखवणारे फोटो व्हायरल झाल्यानंतर मागील तीन महिन्यांपासून जी मागणी होत होती ती प्रत्यक्षात उतरली आहे. ४ मार्चला धनंजय मुंडे यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. महायुतीला २३७ जागा मिळाल्या, इतक्या प्रचंड बहुमताचं सरकार राज्यात आहे. मात्र अवघ्या तीन महिन्यांत धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडावं लागलं आहे. आजही धनंजय मुंडे यांचा विधानभवन परिसरात निषेध नोंदवण्यात आला. संजय राऊत यांनीही धनंजय मुंडेंना शपथच का दिली असा सवाल केला आहे. त्याचप्रमाणे सामनाच्या अग्रलेखातूनही धनंजय मुंडे प्रकरणावरुन सरकावर टीका करण्यात आली आहे. आज अधिवेशनाच तिसरा दिवस आहे. आज काय घडतं ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा