Maharashtra Assembly Budget Session 3rd March 2025 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांनंतर देवेंद्र फडणवीस सरकार पहिल्यांदा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सामोरं जात आहे. निवडणुकांनंतरचा पहिला अर्थसंकल्प फडणवीस सरकारकडून मांडला जाईल. त्याचवेळी धनंजय मुंडे व माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून लावून धरली जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली.
Mah Assembly Budget Session : राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात
Maharashtra Assembly Budget Session Live Updates:
महाराष्ट्र इलेक्ट्रिकल वाहन धोरणाची १ एप्रिलपासून अंमलवबजावणी केली जाईल. यात इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान व जुनी वाहनं निकाली काढण्यास प्रोत्साहन देण्याचा समावेश आहे - राज्यपाल
Maharashtra Assembly Budget Session Live Updates:
आपल्या सरकारने १ एप्रिल २०२५ पासून राज्यातल्या सर्व टोल नाक्यांवर फास्टटॅगच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने टोल वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे - राज्यपाल
Maharashtra Assembly Budget Session Live Updates:
२०२४-२५ वर्षासाठी सरकारनं १० लाख युवकांना प्रशिक्षित करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यासाठी ५५०० कोटी रुपयांची तरतूद केली होती - राज्यपाल
Maharashtra Assembly Budget Session Live Updates:
१५ लाख ७२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार महाराष्ट्र सरकारने ६३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी दावोस येथे केले आहेत. यातून १५ लाखांहून जास्त रोजगार निर्माण होईल - राज्यपाल
Maharashtra Assembly Budget Session Live Updates:
आमचं सरकार महाराष्ट्र - कर्नाटक सीमा वाद सोडवण्यासाठी बांधील आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयासमोर महाराष्ट्राची बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ वकिलांची नेमणूक सरकारने केली आहे. सरकार सीमाभागातील मराठीजणांसाठी शिक्षण, आरोग्य व इतर योजना राबवत आहे - राज्यपाल
Maharashtra Assembly Budget Session Live Updates: राज्यपालांची मराठीत अभिभाषणाला सुरुवात
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मराठीत केली अभिभाषणाला सुरुवात...
Maharashtra Assembly Budget Session Live Updates: देवेंद्र फडणवीस सरकारचं निवडणुकीनंतर पहिलं अर्थसंकल्पीय अधिवेशन
निवडणूक निकालांनंतर देवेंद्र फडणवीस सरकारचं हे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.
Maharashtra Assembly Budget Session Live Updates: राज्यपालांच्या अभिभाषणाला सुरुवात
विधिमंडळातील मुख्य हॉलमध्ये राज्यपालांचं अभिभाषण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस<br />file photo
Maharashtra assembly budgets session, 3 march 2025 live updates: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर