Maharashtra Vidhan Sabha Election विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे लवकरच महाराष्ट्रात प्रचारासाठी सक्रिय होणार आहेत. तसेच प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारकही जोरदारपणे प्रचाराच्या कामाला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या बंडखोरांना शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र अनेकजण अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाने ४० बंडखोरांवर कारवाई केली असून त्यांची हकालपट्टी केली आहे. प्रचारामध्ये कोणते नवीन मुद्दे येणार? ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढविली जाणार की राजकारणाच्या मुद्द्यावर? हे या प्रचारातून दिसेल.
Maharashtra Breaking News Live Today, 06 November 2024 | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यामध्ये वंचित बहुजन पक्षाने आघाडी घेतली आहे. या जाहीरनाम्याला ‘जोशाबा समतापत्र’ (जोतिबा, शाहू, बाबासाहेब) असे नाव देण्यात आले आहे. सविस्तर वाचा…
सातारा : महायुती सरकारने फक्त अडीच वर्षांत राज्यात जलसिंचन, शेतकरी विकास, औद्योगिक क्षेत्रात वाढ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक योजना सुरू केल्या. महायुती सरकारने राज्यात मोठा विकास केला आहे. त्यामुळे महायुतीला मोठ्या मतांनी विजयी करा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरेगाव येथे केले. यावेळी काँग्रेसकडे गहाण ठेवलेला बाळासाहेबांचा धनुष्यबाण सोडवला, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.आमदार महेश शिंदे यांच्या प्रचारसभेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरेगावमधील सभेत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीने राज्यातील अनेक विकासकामे बंद पाडली. अडीच वर्षांत मविआने केवळ ४ योजनाचे आदेश दिले. महायुतीने दोन वर्षांत सिंचनाच्या १२४ योजनांचे आदेश काढले. यामुळे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणली, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लाडक्या बहिणींचे प्रेम पाहून विरोधकांच्या पोटात दुखायला लागले. सुरुवातीला त्यांनी या योजनेबाबत अपप्रचार केला. मात्र आम्ही बहिणींच्या खात्यात पाच हप्ते भरले. आचारसंहितेपूर्वी नोव्हेंबरचे पैसे दिले, असे ते म्हणाले. २३ नोव्हेंबरला निकाल लागला की डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात देणार असे ते म्हणाले.
लोकसभेवेळी दादांच्या वारसांचा प्रचार केला का ? जयश्री पाटील यांचा हल्लाबोल
सांगली : वसंतदादांच्या समाधीवर शपथ घेणारे लोकसभा निवडणुकीवेळी दादांच्या वारसाच्या प्रचाराला खुलेपणाने का समोर आले नाहीत, असा सवाल करत अपक्ष उमेदवार जयश्री पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी पृथ्वीराज पाटील यांचे नावे न घेता केला. आमची लढाई भाजपच्या विरोधात असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले
सातारा: पुणे बंगळूर महामार्गावर शेंद्रेजवळील सोनगाव तर्फे सातारा गावच्या हद्दीत तालुका पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे ९५ लाख रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम वाशी (नवी मुंबई) येथून हुबळी (कर्नाटक) येथे गाडीतून (क्रमांक एम एच ४८ सिटी ५२३९) नेण्यात येत होती. या प्रकरणी मनोज गोयल आणि दीपू चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडे कसून तपास सुरू आहे. त्यांच्याकडे ही रक्कम वाशी टोल प्लाझावर एकाने दिल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. ती एका व्यापाऱ्याची असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समजले आहे. जप्त केलेल्या रकमेचा स्रोत व उद्देश शोधण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रीकरण आणि पंचनामा संयुक्तपणे सातारा पोलीस, एफ एस टी, आयकर विभाग आणि इतर विभाग करीत आहेत. प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार नागेश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अणि पोलीस यांच्या भरारी पथकाकडून ही संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक समीर शेख आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या भरारी पथकाचे अभिनंदन केले.
काँग्रेसकडून दादा घराण्याची सातत्याने फसवणूक, खासदार विशाल पाटलांकडून काँग्रेसवर टीकास्त्र
सांगली : वसंतदादांच्या पाठीमागे काँग्रेस पक्षाकडून दादा घराण्याची सातत्याने फसवणूक केली जात आहे. आम्ही कधी काँग्रेसच्या विचाराशी गद्दारी केली नाही, निष्ठा कमी पडली नाही. तरीही आमचे काय चुकले, या प्रश्नाचे उत्तर अजून मिळत नाही. पूर्वी डावलले जायचेच, आता तर लोकसभेपासून सरळ आमची फसवणूक सुरू झाली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही मैदानात उतरत असताना पक्षाकडून मिळणारी ही वागणूक अन्याय करणारी आहे, अशा शब्दांत खा. विशाल पाटील यांनी मंगळवारी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंब्र्यात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारा. पण आम्ही पाकिस्तान जाऊनही मंदिर उभारू. मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा किती मोठा पुतळा आहे हे माहितेय का? मुंब्र्याच्या प्रवेशद्वारातच हा पुतळा आहे. कधी गेलात का मुंब्र्यात? मुंब्र्याच्या प्रवेशद्वाराजवळ महाराजांचा पुतळा मंदिरासारखाच आहे. या देशातील मुस्लिमांना बदनाम करताय. तुम्ही शिवाजी महाराजांचा गैरवापर करताय. तुमचे पूर्वज मोगलांचे चाकरी आणि महाराष्ट्राची गद्दारी करत होते, तुमचा इतिहास बघा.
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. (फोटो – लोकसत्ता टीम)