Maharashtra Vidhan Sabha Election Live Updates Today : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वेगवेगळ्या पक्षांनी, उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, सोमवारी (४ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न चालू होते. त्यात सर्वच पक्षांना काही प्रमाणात यश मिळालं आहे. तर, काही बंडखोऱांची समजूत काढण्यात नेते अपयशी ठरले आहेत. आता पुढचे काही दिवस राज्यभर केवळ प्रचार, राजकीय टिका-टिप्पण्या पाहायला मिळतील. सोमवारी सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जंगी सभेपासून त्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसंबंधीच्या अशा सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

हे वाचा >> “शरद पवार राजकारणातले भीष्म पितामह, त्यांनी निवृत्ती…”, संजय राऊतांचे आवाहन

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने त्यांचा वचननामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी १० प्रमुख आश्वासनं दिली आहेत.

  1. लाडक्या बहिणींना ₹2100
    प्रत्येक महिन्याला ₹ 1500 वरून ₹2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन !
  2. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला ₹15,000
    प्रत्येक वर्षाला ₹12,000 वरून ₹15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन !
  3. प्रत्येकास अन्न आणि निवारा
    प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन !
  4. वृद्ध पेन्शनधारकांना ₹2100
    महिन्याला ₹1500 वरून ₹2100 देण्याचे वचन !
  5. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर
    राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन !
  6. 25 लाख रोजगारनिर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000
    प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000 विद्यावेतन देण्याचे वचन !
  7. 45,000 गावांत पांदण रस्ते बांधणार
    राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन !
  8. अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹15,000 आणि सुरक्षा कवच
    महिन्याला ₹15,000 वेतन आणि विमा संरक्षण देण्याचे वचन !
  9. वीज बिलात 30% कपात करून
    सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन !
  10. सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र @ 2029’
    100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 05 November 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या

18:07 (IST) 5 Nov 2024
माजी आमदार राजू पारवेंचे पक्षबदल, लोकसभेत शिवसेनेत, विधानसभेत भाजपमध्ये!

नागपूर : विधानसभा निवडणुकीत उमरेड मतदार संघातून माघार घेतल्यानंतर माजी आमदार राजू पारवे यांनी मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सविस्तर वाचा...

18:06 (IST) 5 Nov 2024
आघाडीस धक्का! ' आप 'चा दोन ठिकाणी आघाडीस तर दोन ठिकाणी अपक्षास पाठिंबा.

वर्धा : लोकसभा निवडणुकीत इंडिया अलायन्ससोबत काम करीत अमर काळे यांच्या विजयास हातभार लावणाऱ्या आम आदमी पार्टीने या विधानसभा निवडणुकीत उमेदवारनिहाय भूमिका घेतली आहे.

सविस्तर वाचा....

18:06 (IST) 5 Nov 2024

शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता ?

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अचानकपणे मागे घेतल्यावर कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराज यांच्याकडे करड्या शब्दात विचारणा केली होती. यावरून आता शाहू महाराज आणि सतेज पाटील यांच्यातील संबंध दुरावणार का अशी चर्चा होत आहे.

वाचा सविस्तर...

16:55 (IST) 5 Nov 2024
आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

16:55 (IST) 5 Nov 2024
असा असेल उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

असा असेल उद्धव ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

16:31 (IST) 5 Nov 2024
मंदा म्हात्रे यांच्या सोयीसाठी ऐरोलीचे बंड ?

शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आणि पुढे शिवसेना हा पक्ष येताच त्यांनी नवी मुंबईत पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद चौगुले यांच्याकडे सोपविले.

सविस्तर वाचा...

16:30 (IST) 5 Nov 2024
बेलापूरमध्ये अन्य पक्षातील नेत्यांना गळाला लावण्यावर भाजपचा भर

ऐन दिवाळीच्या धामधुमीत काँग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशीक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 5 Nov 2024
बुलढाणा जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत थेट, दोन जागी ‘बहुरंगी’ लढत

उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत, सोमवारी जिल्ह्यातील सात मतदारसंघातील प्रमुख आणि विविध पक्षीय बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

सविस्तर वाचा...

16:27 (IST) 5 Nov 2024
दोन सख्खे बंधू परस्परांच्या विरोधात, एक भाजपकडून तर दुसरा …

नागपूर :महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय घराण्यात फूट पडली, वडिलांच्या विरुद्ध मुलीने बंड केले, भावाच्या विरुद्ध भाऊ रिंगणात उतरला.

सविस्तर वाचा...

16:13 (IST) 5 Nov 2024
अमित ठाकरेंनंतर मिलिंद देवरांचा नंबर! ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं प्रकरण काय?

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार अनिल देसाई यांनी शिवसेनेचे (शिंदे) वरळी विधानसभेचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. वरळी येथील शोभायात्रेत देवरा यांनी प्रत्येकी ५०० रुपये देऊन लोकांना जमवलं होतं असा आरोप देसाई यांनी केला आहे. देसाई यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की या शोभायात्रेला गेलेल्या लोकांनी ही गोष्ट कबूल केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने देवरांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी देखील देसाई यांनी केली आहे. देवरांनी आचारसंहितेचा भंग केल्याचं देसाई यांचं म्हणणं आहे.

अनिल देसाई यांनी पत्रात म्हटलं आहे की वरळीतील शोभायात्रेचे चित्रीकरण करणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी या शोभायात्रेत सहभागी लोकांना विचारले असता त्यांनी आपल्याला प्रत्येकी ५०० रुपये देऊन शोभायात्रेत सहभागी होण्यास सांगितल्याचे कॅमेऱ्यासमोर कबूल केले आहे. ज्याचे असंख्य व्हिडिओज समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. या पत्रासह व्हिडीओदेखील पाठवत आहोत. निवडणूक आदर्श आचारसंहितेसंदर्भातील भारतीय राज्यघटनेच्या कलमानुसार पैशाचे आमिष दाखविणे हा गंभीर गुन्हा आहे. (Bribery as defined in clause (1) of section 123 of the Representation of the people Act, 1951 (43 of 1951). Under influence as defined in clause (2) of the said section.) त्यामुळे देवरा यांच्याविरोधात कारवाई करायला हवी.

15:43 (IST) 5 Nov 2024
‘मोदींची सभा नको रे बाप्पा!’ भाजप उमेदवारांना धडकी

मोदी यांची सभा माझ्या मतदारसंघात व्हावी, असा लकडा भाजप नेते लावतात. मात्र, हेच नेते आता नको, असे म्हणायला लागल्याचे दिसून आले आहे.

सविस्तर वाचा...

14:48 (IST) 5 Nov 2024
संजय कुमार वर्मा महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक होणार

संजय कुमार वर्मा महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक होणार

https://twitter.com/ANI/status/1853715982419677334

14:45 (IST) 5 Nov 2024
बंडखोरांमुळे मतविभाजनाचा धोका; भंडारा, तुमसर, साकोलीत तिरंगी लढत

जिल्ह्यातील तीनही मतदारसंघांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सविस्तर वाचा...

13:03 (IST) 5 Nov 2024
उरण विधानसभेची तिरंगी लढत निश्चित, भाजपा, शिवसेना, शेकाप यांच्यात चुरस

ही विधानसभा निवडणुकही २०१९ प्रमाणेच भाजपा, शिवसेना(ठाकरे) व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात तिरंगी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपा, शिवसेना (उद्धव ठाकरे) व शेकाप यांच्यात चुरशीच्या लढतीचे चित्र आहे.

सविस्तर वाचा...

12:54 (IST) 5 Nov 2024
नवी मुंबईत शिंदे शिवसेनेचे बंड कायम; ऐरोलीत विजय चौगुले, तर बेलापूरमध्ये विजय नहाटा रिंगणात

नवी मुंबई ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात महायुतीत झालेली बंडखोरी रोखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपयश आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.

सविस्तर वाचा...

12:53 (IST) 5 Nov 2024
बेलापूरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीत बंड; अनिल कौशिक, राजू शिंदे यांचा भाजप प्रवेश

कौशिक यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेस पक्षाला कोणताही धक्का बसलेला नाही असे म्हणत पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाशीतील काँग्रेस भवनाबाहेर एकत्र येत रस्त्यावर फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

12:53 (IST) 5 Nov 2024
परस्पर पाठिंबा जाहीर करणाऱ्यांना तंबी, मनसेचा पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा

विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवित असतानाही मनसेकडून स्थानिक पातळीवर काही अपक्ष आणि अन्य पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यात आल्याचे पुढे आले आहे.

सविस्तर वाचा...

12:25 (IST) 5 Nov 2024
देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताईंची बदली झाली; संजय राऊतांचा चिमटा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. पदरचनेतील शुक्ला यांच्या नंतरच्या सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. यानंतर मुख्य सचिवांनीदेखील तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनलला नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, "बऱ्याच गोष्टी करून घेतल्या आहेत, सरकार बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्यांनी अनेक नेमणुका सुद्धा बेकायदेशीरपणे करून घेतल्या आहेत".

राऊत म्हणाले, "जो अधिकारी तुरुंगात जाण्याच्या तयारीत होता, ज्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत त्याला सरकार बदलताच त्या अधिकाऱ्यावरील गुन्हे काढून त्यांना थेट राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचे बक्षीस देण्यात आले. त्यांच्याकडून अनेक राजकीय गैर कृत्ये करून घेतली. ती व्यक्ती भाजपाच्या जवळची आहे. अखेर पापाचा घडा भरला आणि निवडणूक आयोगालाच लाज वाटली असेल. हे जर फार काळ टिकवलं तर निवडणूक आयोगाची उरली सुरली इज्जतसुद्धा धुळीस मिळेल म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताईंना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आले. गृहमंत्र्यांना प्रशासन कळत नाही, राज्य व्यवस्था कळत नाही आणि नैतिकता कळत नाही. आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत. उशीर का होईना त्यांनी शहानपणाचा निर्णय घेतला.

12:24 (IST) 5 Nov 2024
शरद पवार यांचे बारामतीकडे विशेष लक्ष, आज बारामतीत सहा सभा

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बारामती मतदारसंघाकडे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी विशेष लक्ष दिले आहे.

सविस्तर वाचा...

12:24 (IST) 5 Nov 2024
Rebellion in Maha Vikas Aghadi Gadchiroli: बंडखोरीमुळे तिन्ही जागांवर महाविकास आघाडीची कोंडी, तर अहेरीत महायुतीपुढे आव्हान?

Gadchiroli Vidhan Sabha Constituency Election 2024 बंड शमवण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नानंतरही जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तिन्ही विधानसभा क्षेत्रात बंडखोरी कायम राहिल्याने महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे.

सविस्तर वाचा...

12:18 (IST) 5 Nov 2024
कल्याण-डोंबिवलीत निवडणूक भरारी, पथकांकडून वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र

कल्याण : कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील चार विधानसभा हद्दींमध्ये निवडणूक आयोगाची भरारी पथके आणि स्थिर सर्वेक्षण विभागाकडून तीन पाळ्यांमध्ये कल्याण, डोंबिवलीत शहराबाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

सविस्तर वाचा...

11:49 (IST) 5 Nov 2024
वर्धा : 'माझी लढत देवेंद्र फडणवीस यांच्याशीच' या खासदारांच्या वक्तव्याने…

वर्धा : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया आटोपली आहे. आरोप प्रत्यारोप तसेच खुलासे सूरू झाले आहेत. सर्वाधिक लक्षवेधी चर्चा आजवर आर्वी मतदारसंघात भाजप उमेदवारीवरून झाली.

सविस्तर वाचा...

11:48 (IST) 5 Nov 2024
ऐरोलीतील बंडाला नाईक विरोधकांची साथ, उमेदवारासह नेतेही नॉट रिचेबल

चौगुले यांच्यावर उमेदवार माघारीसाठी दबाव येऊ नये यासाठी गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारासह शिंदेसेनेचे ऐरोलीतील प्रमुख प्रभावी नेते ‘नाॅट रिचेबल’ झाल्याचे पहायला मिळाले.

सविस्तर वाचा...

11:47 (IST) 5 Nov 2024
Maha Vikas Aghadi in Raigad: रायगडमध्ये चार मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार समोरासमोर

Raigad Vidhan Sabha Constituency Election 2024: रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षात असलेला समन्वयाचा आभाव उघड झाला आहे.

सविस्तर वाचा...

11:23 (IST) 5 Nov 2024
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासमोरील अडचणी वाढल्या ! आप्पासाहेब जगदाळे यांनी दिला आमदार दत्तात्रय भरणेंना पाठिंबा

पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

सविस्तर वाचा...

11:23 (IST) 5 Nov 2024
Rebellion in Vidarbha: विदर्भातील १८ मतदार संघांत बंडखोरी! युती, आघाडीची कसोटी

Maharashtra Assembly Election 2024: विदर्भात सर्वच प्रमुख राजकीय पक्षात झालेली बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यात त्यांना काही ठिकाणी त्यांना यश आले.

सविस्तर वाचा...

11:22 (IST) 5 Nov 2024
सांगली: दिवाळी फराळासोबत पैशांचे वाटप; तासगावमध्ये १ लाख रुपये जप्त

दिवाळी फराळासोबत पैसे वाटत असताना दोघांना पकडून १ लाख ३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले.

सविस्तर वाचा...

11:22 (IST) 5 Nov 2024
सांगली, जत, खानापूरमध्ये बंडखोरी; अन्यत्र आघाडी – महायुती लढत

सांगली, जत, खानापूर याठिकाणी बंडखोरी झाली असून अन्य ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढती होत आहेत.

सविस्तर वाचा...

11:21 (IST) 5 Nov 2024
बंडखोरीने सांगलीतील तीन लढती लक्षवेधी!

सांगली, खानापूरसह जतमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेली बंडखोरी महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आव्हानात्मक ठरणार आहे.

सविस्तर वाचा...

What Devendra Fadnavis Said?

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हटलं आहे? (फोटो-देवेंद्र फडणवीस, एक्स पोस्ट)

महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले, "आमचं धोरण..."

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंनी जिंकून येण्याचा दावा केला आहे. तसंच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन मविआ आणि महायुती दोहोंमध्ये बराच खल झाला. आम्ही तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहोत. महाविकास आघाडीने चेहरा जाहीर करावा अशी खोचक टीका भाजपाने आणि महायुतीने वारंवार केली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी काय फॉर्म्युला असेल ते सांगितलं आहे.

"आम्हाला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमधून चांगला पाठिंबा मिळतो आहे. मी हे अतिआत्मविश्वासाने नाही तर अगदी मनापासून सांगतो आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत आम्ही जी विकासकामं केली आणि ज्या विविध प्रकारच्या योजना आणल्या त्या योजनांमुळे आणि विकासकामांमुळे जनता आमच्या बरोबर आहे. लोकांनी महाराष्ट्रातली पहिली अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार कसं चाललं आणि आमचं सरकार कसं चाललं हे दोन्ही पाहिलं आहे. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे हा माझा विश्वास आहे" असं देवेंद्र फडणवीस (म्हणाले.

Story img Loader