Maharashtra Vidhan Sabha Election Live Updates Today : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वेगवेगळ्या पक्षांनी, उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, सोमवारी (४ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न चालू होते. त्यात सर्वच पक्षांना काही प्रमाणात यश मिळालं आहे. तर, काही बंडखोऱांची समजूत काढण्यात नेते अपयशी ठरले आहेत. आता पुढचे काही दिवस राज्यभर केवळ प्रचार, राजकीय टिका-टिप्पण्या पाहायला मिळतील. सोमवारी सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जंगी सभेपासून त्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसंबंधीच्या अशा सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
Maharashtra Breaking News Live Today, 05 November 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या
ही विधानसभा निवडणुकही २०१९ प्रमाणेच भाजपा, शिवसेना(ठाकरे) व शेतकरी कामगार पक्ष यांच्यात तिरंगी होत आहे. त्यामुळे या निवडणुकीतही भाजपा, शिवसेना (उद्धव ठाकरे) व शेकाप यांच्यात चुरशीच्या लढतीचे चित्र आहे.
नवी मुंबई ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघात महायुतीत झालेली बंडखोरी रोखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपयश आल्याचे सोमवारी स्पष्ट झाले.
कौशिक यांनी पक्ष सोडल्यामुळे काँग्रेस पक्षाला कोणताही धक्का बसलेला नाही असे म्हणत पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वाशीतील काँग्रेस भवनाबाहेर एकत्र येत रस्त्यावर फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवित असतानाही मनसेकडून स्थानिक पातळीवर काही अपक्ष आणि अन्य पक्षांच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देण्यात आल्याचे पुढे आले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या १५ दिवस आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भातले आदेश जारी केले आहेत. पदरचनेतील शुक्ला यांच्या नंतरच्या सर्वात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार सोपवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. यानंतर मुख्य सचिवांनीदेखील तीन वरीष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या पॅनलला नव्या पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “बऱ्याच गोष्टी करून घेतल्या आहेत, सरकार बेकायदेशीर आहे, त्यामुळे त्यांनी अनेक नेमणुका सुद्धा बेकायदेशीरपणे करून घेतल्या आहेत”.
राऊत म्हणाले, “जो अधिकारी तुरुंगात जाण्याच्या तयारीत होता, ज्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल आहेत त्याला सरकार बदलताच त्या अधिकाऱ्यावरील गुन्हे काढून त्यांना थेट राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचे बक्षीस देण्यात आले. त्यांच्याकडून अनेक राजकीय गैर कृत्ये करून घेतली. ती व्यक्ती भाजपाच्या जवळची आहे. अखेर पापाचा घडा भरला आणि निवडणूक आयोगालाच लाज वाटली असेल. हे जर फार काळ टिकवलं तर निवडणूक आयोगाची उरली सुरली इज्जतसुद्धा धुळीस मिळेल म्हणून अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या ताईंना राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरून हटवण्यात आले. गृहमंत्र्यांना प्रशासन कळत नाही, राज्य व्यवस्था कळत नाही आणि नैतिकता कळत नाही. आम्ही निवडणूक आयोगाचे आभारी आहोत. उशीर का होईना त्यांनी शहानपणाचा निर्णय घेतला.
Gadchiroli Vidhan Sabha Constituency Election 2024 बंड शमवण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नानंतरही जिल्ह्यातील आरमोरी, गडचिरोली आणि अहेरी या तिन्ही विधानसभा क्षेत्रात बंडखोरी कायम राहिल्याने महाविकास आघाडीची कोंडी झाली आहे.
कल्याण : कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील चार विधानसभा हद्दींमध्ये निवडणूक आयोगाची भरारी पथके आणि स्थिर सर्वेक्षण विभागाकडून तीन पाळ्यांमध्ये कल्याण, डोंबिवलीत शहराबाहेरून येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
वर्धा : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्याची प्रक्रिया आटोपली आहे. आरोप प्रत्यारोप तसेच खुलासे सूरू झाले आहेत. सर्वाधिक लक्षवेधी चर्चा आजवर आर्वी मतदारसंघात भाजप उमेदवारीवरून झाली.
चौगुले यांच्यावर उमेदवार माघारीसाठी दबाव येऊ नये यासाठी गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारासह शिंदेसेनेचे ऐरोलीतील प्रमुख प्रभावी नेते ‘नाॅट रिचेबल’ झाल्याचे पहायला मिळाले.
Raigad Vidhan Sabha Constituency Election 2024: रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षात असलेला समन्वयाचा आभाव उघड झाला आहे.
पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
Maharashtra Assembly Election 2024: विदर्भात सर्वच प्रमुख राजकीय पक्षात झालेली बंडखोरी शमवण्यासाठी नेत्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यात त्यांना काही ठिकाणी त्यांना यश आले.
दिवाळी फराळासोबत पैसे वाटत असताना दोघांना पकडून १ लाख ३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले.
सांगली, जत, खानापूर याठिकाणी बंडखोरी झाली असून अन्य ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा लढती होत आहेत.
सांगली, खानापूरसह जतमध्ये विधानसभा निवडणुकीत झालेली बंडखोरी महायुती व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना आव्हानात्मक ठरणार आहे.
मुंबई : बुद्ध विहारांमध्ये जाऊन राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्याची जबाबदारी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
कल्याण : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले. दिवाळीपूर्वीचे दोन हप्ते आचारसंहितेची अडचण नको म्हणून बँकांमध्ये जमा केले.
अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आणि युवा स्वाभिमान पक्ष समोरा-समोर आल्याने महायुतीत फूट पडल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदासंघात शिवसेना (ठाकरे) गटातील नेते तसेच सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांसमवेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विशेष उपस्थितीत सुनील पाटील यांनी पक्षप्रवेश केला. निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावना होत्या, म्हणून मी या पक्षात आलो, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी पक्षप्रवेशांनंतर दिली.
महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचं धोरण…”
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंनी जिंकून येण्याचा दावा केला आहे. तसंच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन मविआ आणि महायुती दोहोंमध्ये बराच खल झाला. आम्ही तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहोत. महाविकास आघाडीने चेहरा जाहीर करावा अशी खोचक टीका भाजपाने आणि महायुतीने वारंवार केली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी काय फॉर्म्युला असेल ते सांगितलं आहे.
“आम्हाला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमधून चांगला पाठिंबा मिळतो आहे. मी हे अतिआत्मविश्वासाने नाही तर अगदी मनापासून सांगतो आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत आम्ही जी विकासकामं केली आणि ज्या विविध प्रकारच्या योजना आणल्या त्या योजनांमुळे आणि विकासकामांमुळे जनता आमच्या बरोबर आहे. लोकांनी महाराष्ट्रातली पहिली अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार कसं चाललं आणि आमचं सरकार कसं चाललं हे दोन्ही पाहिलं आहे. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे हा माझा विश्वास आहे” असं देवेंद्र फडणवीस (म्हणाले.