Maharashtra Vidhan Sabha Election Live Updates Today : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. वेगवेगळ्या पक्षांनी, उमेदवारांनी राज्यभर जोरदार प्रचार सुरू केला आहे. दरम्यान, सोमवारी (४ नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली. बंडखोरांनी माघार घ्यावी यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे प्रयत्न चालू होते. त्यात सर्वच पक्षांना काही प्रमाणात यश मिळालं आहे. तर, काही बंडखोऱांची समजूत काढण्यात नेते अपयशी ठरले आहेत. आता पुढचे काही दिवस राज्यभर केवळ प्रचार, राजकीय टिका-टिप्पण्या पाहायला मिळतील. सोमवारी सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जंगी सभेपासून त्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीसंबंधीच्या अशा सर्व बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हे वाचा >> “शरद पवार राजकारणातले भीष्म पितामह, त्यांनी निवृत्ती…”, संजय राऊतांचे आवाहन
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने त्यांचा वचननामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी १० प्रमुख आश्वासनं दिली आहेत.
- लाडक्या बहिणींना ₹2100
प्रत्येक महिन्याला ₹ 1500 वरून ₹2100 देण्याचे तसेच महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचे वचन ! - शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला ₹15,000
प्रत्येक वर्षाला ₹12,000 वरून ₹15,000 देण्याचे तसेच MSP वर 20% अनुदान देण्याचे वचन ! - प्रत्येकास अन्न आणि निवारा
प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन ! - वृद्ध पेन्शनधारकांना ₹2100
महिन्याला ₹1500 वरून ₹2100 देण्याचे वचन ! - जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर
राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन ! - 25 लाख रोजगारनिर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000
प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000 विद्यावेतन देण्याचे वचन ! - 45,000 गावांत पांदण रस्ते बांधणार
राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन ! - अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹15,000 आणि सुरक्षा कवच
महिन्याला ₹15,000 वेतन आणि विमा संरक्षण देण्याचे वचन ! - वीज बिलात 30% कपात करून
सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन ! - सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र @ 2029’
100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन
Maharashtra Breaking News Live Today, 05 November 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय बातम्या
मुंबई : बुद्ध विहारांमध्ये जाऊन राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्याची जबाबदारी शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
कल्याण : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केले. दिवाळीपूर्वीचे दोन हप्ते आचारसंहितेची अडचण नको म्हणून बँकांमध्ये जमा केले.
अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्ष आणि युवा स्वाभिमान पक्ष समोरा-समोर आल्याने महायुतीत फूट पडल्याचे चित्र आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूर मतदासंघात शिवसेना (ठाकरे) गटातील नेते तसेच सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉ. सुनील पाटील यांनी अनेक कार्यकर्त्यांसमवेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विशेष उपस्थितीत सुनील पाटील यांनी पक्षप्रवेश केला. निष्ठावंत शिवसैनिकांच्या भावना होत्या, म्हणून मी या पक्षात आलो, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी पक्षप्रवेशांनंतर दिली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाबाबत काय म्हटलं आहे? (फोटो-देवेंद्र फडणवीस, एक्स पोस्ट)
महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचं धोरण…”
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी उरला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोहोंनी जिंकून येण्याचा दावा केला आहे. तसंच मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? यावरुन मविआ आणि महायुती दोहोंमध्ये बराच खल झाला. आम्ही तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणूक लढवत आहोत. महाविकास आघाडीने चेहरा जाहीर करावा अशी खोचक टीका भाजपाने आणि महायुतीने वारंवार केली आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी काय फॉर्म्युला असेल ते सांगितलं आहे.
“आम्हाला महाराष्ट्रातल्या अनेक भागांमधून चांगला पाठिंबा मिळतो आहे. मी हे अतिआत्मविश्वासाने नाही तर अगदी मनापासून सांगतो आहे. अडीच वर्षांच्या कालावधीत आम्ही जी विकासकामं केली आणि ज्या विविध प्रकारच्या योजना आणल्या त्या योजनांमुळे आणि विकासकामांमुळे जनता आमच्या बरोबर आहे. लोकांनी महाराष्ट्रातली पहिली अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार कसं चाललं आणि आमचं सरकार कसं चाललं हे दोन्ही पाहिलं आहे. त्यामुळे जनता आमच्या बरोबर आहे हा माझा विश्वास आहे” असं देवेंद्र फडणवीस (म्हणाले.