Maharashtra Vidhan Sabha Election Updates Today : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्यात दोन दिवस आधीच प्रचार संपणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभा, प्रचारफेऱ्या व बैठकांचा धडाका लावला आहे. त्यात महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्यांमधील पक्षांचा समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रचाराचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात आज दिवसभरात घडणाऱ्या सर्व घटनांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra News Live Today, 08 November 2024 : महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.
अमली पदार्थ तयार करण्याचे काम गुजरातमधील एका बंदरावर चालते. हे पदार्थ संपूर्ण भारतात पुरवले जातात, असा आरोपही त्यांनी केला.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे वरळी विधानभेतून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमित ठाकरे हे दादर – माहिम विधानसभेतून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत.
“लाडकी बहीण योजना राबविण्यापेक्षा लाडक्या बहिणीला सन्मान दिला असता तर आणखीनच कळवळा आला असता.” असं प्रत्युत्तर शीलवंत यांनी अजित पवारांना दिलं आहे.
हिंदुत्वाचा व भाजपचा बुरखा पांघरून काँग्रेसच्या विजयाची ही तयारी असल्याची जाणीव आम्हाला अमरावतीकरांना करून द्यायची आहे, असे शिवराय कुळकर्णी म्हणाले.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे संबंध हे कायमच परस्परविरोधी राहिले आहेत.
लेखकापासून संगीतकारांपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात रॅप गाण्याच्या निर्मितीचा प्रवास असल्यामुळे एका रॅप गाण्याच्या निर्मितीपासून प्रसिद्धीसाठी दीड ते अडीच लाख रुपयांचा खर्च येत असल्याचे समजते.
चंद्रपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत चंद्रपूरचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा वन व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सर्वासमक्ष अतिशय स्पष्टपणे जाहीर नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तकाने काँग्रेसचे बंडखोर मनोज शिंदे यांना दोन ते तीन कोटी रुपये दिल्याचा आरोप काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला.
खासदार शिंदे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कल्याण ग्रामीणमध्ये सक्रिय झाले असून रोड शो, व्यक्तीगत भेटीगाठी, पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटाच त्यांनी येथे लावला आहे.
निवडणुकीच्या आचारसंहिता काळात राज्यातील विविध ठिकाणी भरारी पथकांकडून कारवाई केली जात असून त्यात रोख रक्कम, सोने आणि इतर साहित्य जप्त केले जाते आहे.
जिल्ह्याचे खासदार अमर काळे यांच्या पत्नीला आर्वी मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिल्याचा रोष आता हळूहळू प्रकट होवू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार) हिंगणघाट व आर्वी या दोन जागा आघाडीत मिळाल्या. सविस्तर वाचा…
भिवंडीतील ठाकरे गटाच्या एका माजी आमदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. असे असतानाही त्यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती.
कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणी नाव घेतले तर न्यायालयात खेचीन, अशी नोटीस आमदार सुनील टिंगरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पाठवली आहे. पोर्शे’तील गुन्हेगारांच्या मागे तुम्हीच होता, त्यामुळे आता या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुण आणि तरुणीला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला
मतदानाच्या दिवशी मतदार घराबाहेर पडावा, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाची पळापळ सुरू असते. मतदाराने मतदान केंद्रात येऊन मतदान केले, तरी मतदान कोणाला केले असेल, याचा अंदाज लागणे कठीण. त्यामध्येच काही बोगस मतदार येऊन मतदान करून जाण्याचे प्रकार आजही घडत असतात. सविस्तर वाचा…
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे सिंहगड रस्ता पोलिसांनी दाखल केले. सिंहगड रस्ता भागातील मानस सोसायटी ते क्रिस्टल कॅस्टल सोसायटी रस्त्याचे कॉक्रीटीकरण सुरू आहे. सविस्तर वाचा…
महायुतीच्या जागावाटपात शहरातील एकही जागा न मिळालेल्या शिवसेनेकडे (शिंदे) महायुतीच्या नेत्यांनी विशेष जबाबदारी सोपविली आहे. शहरातील ‘धोक्या’तील जागांसाठी शिवसेनेची कुमक देण्यात आली असून, शिवाजीनगर, वडगावशेरीसह अन्य काही मतदारसंघांत लक्ष घालण्याची सूचना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजनेला नावे ठेवणारे, बहिणींना भीक देणारे सरकार अशी योजनेची हेटाळणी करणा-या महाविकास आघाडीने योजनेची वाढती लोकप्रियता लक्षात आल्यानंतर या योजनेचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे. सविस्तर वाचा…
जम्मू-काश्मिरमधील ३७० कलम पुन्हा आणण्याची धमक कोणातच नाही. राहुल गांधी यांच्या चार पिढ्यांनाही ते शक्य होणार नाही, असे आव्हान भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी इचलकरंजी येथे दिले. सविस्तर वाचा…
राम मंदिर, रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्यांसह हिंदुत्वाला आतंकवाद म्हणणाऱ्यांसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी प्रतारणा केली. वडिलांनी कमावले ते सारे सत्तेसाठी पणाला लावले अन् गमावलेही, काँग्रेस आणि सर्व विरोधकांसह विशेषतः उद्धव ठाकरे यांना राष्ट्रहितापेक्षा सत्ता, स्वार्थ अन् आपला मतगठ्ठा हवा असल्याचा हल्लाबोल केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शहा यांनी केला. सविस्तर वाचा…
सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळावा यासाठी निवडणूक विभागाच्या माध्यमातून विविध जनजागृतीच्या उपायोजना राबविण्यात येत असतात.
महाविकास आघाडीची सत्ता येणे अशक्य आहे, तरीही केवळ काँग्रेसमध्येच मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर नेते गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत. शरद पवार यांना त्यांच्या मुलीला, तर उद्धव ठाकरे यांना मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी शिराळा येथे प्रचार सभेत बोलताना केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचारामुळे राज्यातील २०० सहकारी साखर कारखान्यांपैकी १०१ साखर कारखाने मृत्युपंथाला लागले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगलीत केला. सविस्तर वाचा…
दिव्यांग व्यक्ती तसेच ८५ वर्षावरील काही ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडून मतदान करणे शक्य होत नसते. यामुळे गेल्या काही निवडणूकांमध्ये मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले होते.
मुंबई : काँग्रेसला राम राम करत नुकतेच भाजपवासी झालेल्या माजी नगरसेवक रवी राजा यांनी शीव कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराला कायदेशीर नोटीस बजावली आहे. प्रचाराच्या ध्वनिचित्रफितीत छायाचित्र वापरल्याबद्दल राजा यांनी ही नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी नुकताच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश केला. शीव कोळीवाडा या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी अपेक्षित होती, मात्र काँग्रेसने राजा यांना उमेदवारी न देता गणेशकुमार यादव यांना उमेदवारी दिली. त्यामुळे, राजा नाराज झाले व त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मात्र, राजा यांनी आता काँग्रेसचे उमेदवार यादव यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात आता उमेदवारांचा प्रचार सुरू झाला आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सिल्लोड मतदारसंघातील २३ मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताई आणि भाऊ मधील जहाल संघर्ष, टोकाचा विरोध, ‘अरे ला कारे’ चे राजकारण याचे प्रतिबिंब प्रचारातही दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत नियमित नेत्यांसह अन्य काही प्रभावी व्यक्तींवर प्रत्येक पक्ष जबाबदारी देत असतो. त्याने तटस्थपणे मतदारसंघातील उणीवा शोधून त्या भरून काढण्याचे कार्य असे व्यक्ती करतात.
अकोला : काँग्रेसचे सरकार येताच ते राज्य शाही परिवाराचे एटीएम होऊन जाते. हिमाचल, तेलंगणा, कर्नाटक राज्य शाही परिवाराचे एटीएम झाले. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी कर्नाटक, तेलंगणामध्ये वसुली सुरू झाली. मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली करण्यात आली, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केला.
नक्षलवादी भारतीय संविधानाला मानत नाहीत आणि भाजपलाही संविधान संपवायचे आहे. संविधानाच्या मुद्यांवर नक्षलवादी आणि भाजपमध्ये समानता आहे, असा जोरदार हल्ला छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी भाजपवर केला.