Maharashtra Vidhan Sabha Election Updates Today : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानासाठी अवघे काहीच दिवस उरले आहेत. त्यात दोन दिवस आधीच प्रचार संपणार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारसभा, प्रचारफेऱ्या व बैठकांचा धडाका लावला आहे. त्यात महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्ही आघाड्यांमधील पक्षांचा समावेश आहे. त्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडी यांच्या प्रचाराचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात आज दिवसभरात घडणाऱ्या सर्व घटनांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra News Live Today, 08 November 2024 : महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

13:10 (IST) 9 Nov 2024
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”

एका मतदार संघाचे मतदार आणि दुसऱ्या मतदार संघातून निवडणूक लढणे म्हणजे बाहेरचा उमेदवार होत नाही. कोहळे शेजारच्या मतदार संघातील आहेत. आम्ही पाकिस्तान मधून उमेदवार आणला नाही. आशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी कोहळे यांना विरोध करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांना सुनावले.

वाचा सविस्तर…

12:19 (IST) 9 Nov 2024
मराठवाड्यात शिक्षकांकडून संस्थाचालकांचा प्रचार !

साखर कारखाने आणि शिक्षक संस्था चालविणारेच बहुतांश उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने मराठवाड्यातील प्रचारात शिक्षक पडद्यामागे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगण्यात येते.

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 9 Nov 2024
महायुतीच्या लोकप्रिय आश्वासनांमुळे तिजोरीवर दीड ते दोन लाख कोटींचा अधिक आर्थिक भार ?

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने जाहीर केलेल्या आश्वासन दशसूत्रीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारला किमान दीड लाख कोटी रुपयांहून अधिक आर्थिक भार उचलावा लागणार आहे.

सविस्तर वाचा…

11:50 (IST) 9 Nov 2024
प्रचारातून विकासाचे मुद्दे हद्दपार, जातीय राजकारण, बंडखोरी व मतविभाजनाचे गणितच चर्चेत; सर्वसामान्यांचे जिव्हाळ्याच्या प्रश्नांना बगल

विधानसभा निवडणुकीमध्ये अकोला व वाशीम जिल्ह्यात विकासाचे मुद्दे, समस्या प्रचार मोहिमेतून हद्दपार झाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:45 (IST) 9 Nov 2024
ईडीच्या दबावामुळे भुजबळांना भाजपात जावं लागलं? बावनकुळे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…

ईडीच्या दबावामुळे मला भाजपात जावं लागलं, असं छगन भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी त्यांच्या पुस्तकातून केला आहे. त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “आज मी छगन भुजबळांबरोबर होतो. त्यांनी व्यक्तिगतही मला असं सांगितलं की मी असं कुठेही बोललो नाही. त्यांनी मला व्यक्तिगत सांगितलं की ते सर्व काही खोटं आहे. मी कुठेही असं बोललो नाही, माझा कुठेही आसा गैरवापर करणे असं योग्य नाही, भुजबळ हे कायदेशीर कारवाई करतील असं दिसत आहे”.

11:29 (IST) 9 Nov 2024
उद्धव ठाकरेंकडून पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या माजी खासदाराची हकालपट्टी

हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. नांदेडमध्ये पैसे घेऊन उमेदवारी दिली जातेय, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुखपदासाठी पैसे घेतले जातायत. त्यामुळे कार्यकर्ते संतप्त आहेत, असा दावा हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी केला होता. नांदेड उत्तरमध्ये पक्षाने आयात उमेदवाराला एबी फॉर्म दिला होता. पैसे घेऊन तिकिटं विकली जातायत. पक्ष व नेते खेळ करतायत, त्यामुळे कार्यकर्तेही तेच करतील असं वानखेडे म्हणाले होते. यासह त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षातील वरिष्ठ नेते व पक्षावर गंभीर आरोप केले होते. परिणाणी आज (९ नोव्हेंबर) त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.