Maharashtra Breaking News 22 October 2024 : राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. दुसरीकडे महायुतीमधील भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची उमेदवारांची यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील सोमवारी दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. तसेच मनसेच्या उमेदवारांचीही यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व घडामोडींसह राजकीय घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today, 22 October 2024 : विधानसभेची रणधुमाळी सुरू, उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

20:55 (IST) 22 Oct 2024
धाराशिव: विधानसभा निवडणूक २८ दिवसांवर, निवडणूक उपजिल्हाधिकारी फरार

शिरीष यादव यांच्यासह त्यांच्या पत्नीविरूध्दही बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सविस्तर वाचा...

20:38 (IST) 22 Oct 2024
नाशिक पश्चिममधून दिनकर पाटील यांची बंडखोरी निश्चित

नाशिक : पक्षाने संधी न दिल्यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही, हरणार नाही. विधानसभा निवडणूक लढविणारच, असा निर्धार भाजपचे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी व्यक्त केला.

सविस्तर वाचा...

20:23 (IST) 22 Oct 2024
उदय सांगळे यांच्या हाती तुतारी, सिन्नरमध्ये माणिक कोकाटेंशी लढत

नाशिक : सिन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये लढत होणार हे निश्चित मानले जात असून अजित पवार गटाचे आमदार माणिक कोकाटे यांना शह देण्यासाठी शरद पवार गटाने उदय सांगळे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली आहे.

सविस्तर वाचा...

20:11 (IST) 22 Oct 2024
पुणे : कटक मंडळाच्या रुग्णालयातील गच्चीवर मृतदेह सापडला

लष्कर भागातील कटक मंडळाच्या प्रशासकीय इमारतीतील गच्चीवर एक जण मृतावस्थेत सापडला.

सविस्तर वाचा...

20:03 (IST) 22 Oct 2024
पहिल्या दिवशी नाशिक पूर्व, मालेगाव बाह्यमधून दोन अर्ज दाखल

नाशिक : महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागा वाटप घोळात उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मंगळवारपासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असतानाही अनेक जागांवरील उमेदवारीचा तिढा सुटलेला नाही.

सविस्तर वाचा...

19:52 (IST) 22 Oct 2024
छगन भुजबळ यांचा येवल्यातून उमेदवारी अर्ज

अजय-अतूल संगीत रजनीप्रसंगी ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी पंकज आणि समीर भुजबळ यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले होते.

सविस्तर वाचा...

19:52 (IST) 22 Oct 2024
रत्नागिरी: लांजा येथे गोवा बनावटी दारुसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकावर गुन्हा दाखल

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावर लांजा देवधे येथे सोमवारी सायंकाळी उशिरा करण्यात आलेल्या कारवाईत १२ लाख रुपयांची कार आणि गोवा बनावटीची ७ हजार ४०० रुपयांची दारु असा एकूण १२ लाख ७ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारूची वाहतूक केल्या प्रकरणी लांजा पोलिसांनी खालापूर (रायगड) येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, लांजा पोलीस ठाणे मार्फत मुंबई-गोवा महामार्गावर वाहन तपासणी सुरू आहे. सोमवारी २१ ऑक्टोबरला देवधे येथील हॅपी धाब्यासमोर मुंबईकडे जाणाऱ्या कार क्रमांक एमएच ४६ सिपी ३७१३ ची तपासणी करण्यात आली असता कारमध्ये गोवा बनावटीचा दारूसाठा आढळून आला.

19:49 (IST) 22 Oct 2024
अहिल्यानगर-सोलापूर महामार्गावर माहीजळगाव येथे भीषण अपघातात दोन युवक ठार

नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहीजळगाव बायपास जवळ भीषण अपघात यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एकाचा जागेवरच तर दुसरा मिरजगाव येथील लोकमान्य हॉस्पिटल उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा...

19:43 (IST) 22 Oct 2024
“योगेंद्र यादव यांची टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची टीका

त्यांनी केलेली टीका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

सविस्तर वाचा...

19:42 (IST) 22 Oct 2024
पिंपरी विधानसभा: अजित पवारांचे विश्वासू आमदार अण्णा बनसोडेंना महायुतीमधून विरोध; १८ माजी नगरसेवकांचा ठराव

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा हेच अण्णा बनसोडे अजित पवारांच्या सोबत होते.

सविस्तर वाचा...

19:28 (IST) 22 Oct 2024
दिवाळीत भेसळ रोखण्यासाठी, अन्न औषध प्रशासन विभाग सज्ज

नाशिक : दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून कुठल्याही पदार्थात भेसळ आढळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

18:56 (IST) 22 Oct 2024
सोने, चांदीच्या भावात वाढ होण्याची कारणे अन् आगामी काळात भाव कमी होणार का? जाणून घ्या…

पुणे : सोने आणि चांदीच्या भावातील तेजीचे वारे मंगळवारी कायम राहिले. यामुळे सोने आणि चांदीच्या भावाने सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. दिल्लीतील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमला ३५० रुपयांनी वधारून ८१ हजार रुपयांवर गेला.

सविस्तर वाचा...

18:40 (IST) 22 Oct 2024
"पुढच्या काही तासांतच महाविकास आघाडी तुटल्याचे दिसेल", रामदास कदमांचा मोठा दावा

"उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि कॉग्रेस यांच्यामध्ये तिकीट वाटपावरून मोठ्या प्रमाणात मतभेद झाले आहेत. त्यामुळे पुढच्या काही तासांतच महाविकास आघाडी तुटल्याचे महाराष्ट्रातील जनतेच्या समोर येणार आहे. त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. तसेच नाना पटोले हे देखील मुख्यमंत्री पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांतच महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंची शिवसेना बाजूला झालेली तुम्हाला दिसेल", असा मोठा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

17:44 (IST) 22 Oct 2024
ठाणे: हीट अँड रन प्रकरणातील मर्सिडीज अवघ्या ‘पावणे चार लाखा’ची, २००८ चा मॉडेलची मोटार आरोपीने केली होती खरेदी

पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी जंक्शन परिसरात एका भरधाव मर्सिडीज मोटारीच्या धडकेत दर्शन हेगडे (२१) याचा मृत्यू झाला आहे.

सविस्तर वाचा...

17:34 (IST) 22 Oct 2024
गजबजलेला चौक, वर्दळीचा रस्ता अन् विद्यार्थ्यांची घरी जाण्यासाठी घाई, न्यू इंग्लिश शलेसमोरील दृश्य…

नागपूर : शहरातील सर्वात गजबलेलेल्या चिटणीस पार्क चौकातील गर्दीत न्यू इंग्लिश माध्यमिक शाळा अडकली आहे. शाळा सुटताच विद्यार्थी, विद्यार्थिनी सायकलने थेट गर्दीच्या मुख्य रस्त्यावरून घराची वाट काढतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा सविस्तर...

17:34 (IST) 22 Oct 2024
सावधान! ‘शेअर मार्केट’मध्ये पैसे गुंतवण्याचा बेत? आधी ही बातमी वाचा

बुलढाणा: होय! ही बातमी सावध करणारीच आहे. गुंतविलेल्या पैशाचे अल्पावधीतच दामदुप्पट, तिप्पट करण्याच्या आमिषाने शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा आपला बेत असेल तर ही बातमी तुमचे आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवू शकते. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका व्यापाराला हा मोह भलताच महागात म्हणजे चोवीस लाखात पडला आहे.

वाचा सविस्तर...

17:33 (IST) 22 Oct 2024
“प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्या अन् मोफत ‘टॅबलेट’ मिळवा”, संस्थांकडून विद्यार्थ्यांना आमिष

नागपूर: राज्यातील बार्टी, सारथी, महाज्योती, ‘टीआरटीआय’ या संस्थांच्या यूपीएससी, एमपीएससीसह ‘आयबीपीएस’च्या व पोलीस आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यातून महाज्योतीने माघार घेतली असली तरी बार्टी, सारथी आणि टीआरटीआयसाठी प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

17:33 (IST) 22 Oct 2024
रवी राणांच्या नव्या दाव्यामुळे भाजपचा एक गट पुन्हा अस्‍वस्‍थ

अमरावती : भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्‍यापैकी धामणगाव मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे विद्यमान आमदार प्रताप अडसड यांना उमेदवारी मिळाली, तर अनपेक्षितपणे अचलपुरातून प्रवीण तायडे यांना उमेदवारी मिळाली. पण, जिल्‍ह्यातील इतर मतदारसंघांमध्‍ये उमेदवारी जाहीर होण्‍याची प्रतीक्षा आहे.

वाचा सविस्तर...

17:27 (IST) 22 Oct 2024
चांदवड-देवळा मतदारसंघात भाजपला धक्का, केदा आहेर समर्थक १५ नगरसेवकांचे राजीनामे

नाशिक : जिल्ह्यातील चांदवड-देवळा विधानसभा मतदारसंघात माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांना उमेदवारी न दिल्याच्या निषेधार्थ देवळा नगरपंचायतीच्या १५ नगरसेवकांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

सविस्तर वाचा...

16:51 (IST) 22 Oct 2024
भाजपाला आणखी एक धक्का! स्वप्नील येरूनकर यांचा ठाकरे गटात प्रवेश

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज मुंबईतील कुर्ला मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे महामंत्री स्वप्नील येरूनकर यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "मशाल धगधगणार, महाराष्ट्र जिंकणार. ज्यांनी आपला पक्ष चोरला त्या चोरांकडून तुम्ही आपल्या शिवसेनेत आलात. आपण चोरांची टोळी राजकारणात जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाहीत", असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

16:43 (IST) 22 Oct 2024
कळवणमध्ये अजित पवार गट, माकपमध्ये सामना

नाशिक : दिंडोरी लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी माघार घेणाऱ्या माकपसाठी महाविकास आघाडीने कळवण विधानसभा मतदारसंघ सोडला आहे.

सविस्तर वाचा...

16:08 (IST) 22 Oct 2024
‘मसाप’चा सत्कार स्वीकारू नये, नियोजित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांना कुणी केली विनंती?

डाॅ. तारा भवाळकर यांनी बुधवारी (२३ ऑक्टोबर) महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने होणारा सत्कार स्वीकारू नये, अशी विनंती खुद्द नियोजित संमेलनाध्यक्षांनाच करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा...

15:49 (IST) 22 Oct 2024
माजी मंत्री राजकुमार बडोलेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी आमदार राजकुमार बडोले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

15:37 (IST) 22 Oct 2024
काँग्रेसच्यावतीने महाविकास आघाडीशी समन्वय साधण्याची जबाबदारी आता आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर…

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राऊत आणि त्यांच्यात शाब्दिक खटके उडाल्याचे तत्कालीन कारण पटोले यांना महागात पडले आहे.

सविस्तर वाचा...

15:13 (IST) 22 Oct 2024
रत्नागिरीत वंचित बहुजन आघाडी उमेदवार देणार? विद्यमान आमदारांना विधानसभा जड जाण्याची शक्यता

मतदार संघातील मतदानाची गणिते बदलण्याची आणि विद्यमान आमदारांना ही निवडणूक आणखीच जड जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सविस्तर वाचा...

14:50 (IST) 22 Oct 2024
पिंपरीत मोठा ट्विस्ट! आमदार अण्णा बनसोडे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता; शहराध्यक्षांचे सूचक विधान

मतदारसंघात नवीन उमेदवार देण्याची मागणी असून बहल यांनी अप्रत्यक्षपणे बनसोडे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

सविस्तर वाचा...

14:49 (IST) 22 Oct 2024
राजकुमार बडोले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी आमदार राजकुमार बडोले यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे.

14:33 (IST) 22 Oct 2024
अत्यवस्थ रुग्णांना जी.टी. रुग्णालयाचा लवकरच दिलासा; कसा ते वाचा...

मुंबई : जी. टी. रुग्णालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील अतिदक्षता विभागात आणखी १० खाटांची भर पडणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई विभागामधील अत्यव्यस्थ रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रक्तशुद्धकरण केंद्रही सुरू करण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा

14:32 (IST) 22 Oct 2024
भंडारा : डीजे व्यावसायिकाच्या आत्महत्येला राजकीय वळण

भंडारा : जिल्ह्यात पुन्हा एक राजकीय वादळ उठले आहे. जिल्ह्यातील एका डीजे व्यावसायिकाने आत्महत्या गेली. त्यानंतर त्याने आत्महत्या का केली, याबाबतची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली.

वाचा सविस्तर...

14:32 (IST) 22 Oct 2024
भाजपाला धक्का! संदीप नाईकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने अनेकजण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे. आज मुंबईत त्यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला. आमदार गणेश नाईक याचे पुत्र संदीप नाईक यांनी आज (दि.२२) राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election

महाविकास आघाडी, (फोटो-संग्रहित छायाचित्र)

महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपारून मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवरच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. आज महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Story img Loader