2024 Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Live Updates, 19 November 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोप – प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या.  त्यापूर्वी सोमवारी अनेकांच्या सभा गाजल्या. तर, प्रचारफेरीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, प्रचार तोफा थंडावताच दोन महत्त्वाच्या घटना समोर आल्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्याप्रकरणी आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

2024 Maharashtra Assembly Election Live Updates, 19 November 2024 : महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मतदानाकडे लक्ष्य!

12:04 (IST) 19 Nov 2024

Sanjay Shirsat and Manoj Jarange Meet Live : संजय शिरसाटांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले…

मनोज जरांगेंची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना सलाईन लागली होती. आज त्यांना मोकळा वेळ मिळाला त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली. आमची स्नेहपूर्वक मैत्री आहे. आपल्या माणसांना भेटण्यात आजचा वेळ त्यांना दिला. आमचे राजकीय व्यतिरिक्त विषय असतात त्यावर चर्चा केली. त्यांचा राजकारणाशी संबंध नसल्याने ते फार खोलात जात नाहीत. बाकी इतर कोणते विषय नव्हते. मी मित्र म्हणून त्यांची विचारपूर करत असतो – संजय शिरसाट

11:29 (IST) 19 Nov 2024

Anil Deshmukh Attack Live Update : अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

– काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरण नागपूर ग्रामीण पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे

– या प्रकरणात चार अज्ञात इसमांविरोधात हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

– घटनास्थळावर पुराव्यांचा तपास सुरू आहे

– जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये

– कायदा व सुवव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल

11:12 (IST) 19 Nov 2024

साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र

साताराः साताऱ्यातील राजकारण हे पक्षांपेक्षा खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे दोन राजे आणि लोकप्रतिनिधींभोवती फिरत असते. यंदा लोकसभेपासूनच केवळ पक्षच नाही तर दोन्ही राजेही तना-मनाने एकत्र राहिल्याने कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत या एकीचा संदेश गेला आहे.

सविस्तर वाचा

11:12 (IST) 19 Nov 2024

गोंदिया जिल्ह्यात तीन मतदारसंघांत थेट, एका जागी चौरंगी लढत

गोंदिया जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत थेट तर एका मतदारसंघात चौरंगी लढत रंगली आहे. गोंदिया मतदारसंघात महाविकास आघाडीचे गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) विरुद्ध महायुतीचे विनोद अग्रवाल (भाजप) या दोघांतच थेट लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

सविस्तर वाचा

11:11 (IST) 19 Nov 2024

बुलढाणा जिल्ह्यात युती विरुद्ध आघाडीत थेट सामना, सिंदखेडराजात लक्षवेधी मैत्रीपूर्ण लढत

बुलढाणा जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत थेट सामना असून सिंदखेडराजातील मैत्रीपूर्ण लढत लक्षवेधी ठरली आहे. वंचित, बसप, मोठ्या संख्येतील नवीन पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहे.

सविस्तर वाचा

11:11 (IST) 19 Nov 2024

बंडखोरांमुळे भंडारा जिल्ह्यात अटीतटीचे सामने

भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर आणि साकोली या तीनही मतदारसंघांत बंडखोरांमुळे अटीतटीचे सामने रंगण्याची चिन्हे आहेत. पक्षातील बंडखोरी, मित्र पक्षांसह स्वपक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांची नाराजी तसेच मतदारांमध्ये उमेदवारांप्रती असलेली नकारात्मकता, यामुळे उमेदवारांची प्रचारादरम्यान चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले.

सविस्तर वाचा

11:10 (IST) 19 Nov 2024

चंद्रपूर जिल्ह्यात तुल्यबळ लढती, राजुऱ्यात शेतकरी संघटनेमुळे चुरस

चंद्रपूर जिल्ह्यातील सहांपैकी पाच मतदारसंघांत भाजप-काँग्रेसमध्येच थेट सामना असून राजुरा या एकमेव मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध शेतकरी संघटना, अशी लढत आहे.

जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी मतदारसंघ हा बल्लारपूर आहे. येथे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसचे संतोषसिंह रावत व अपक्ष डॉ. अभिलाषा गावतुरे, अशी तिरंगी लढत आहे.

सविस्तर वाचा

10:50 (IST) 19 Nov 2024

भाजप उमेदवार प्रताप अडसड यांच्‍या बहिणीवर हल्‍ला, राजकीय वर्तुळात खळबळ

अमरावती : धामणगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रताप अडसड यांची बहीण अर्चना रोठे (अडसड) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील सातेफळ फाट्यावर हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. या हल्ल्यात त्यांच्या हाताला जखमा झाल्या आहेत.

वाचा सविस्तर…

10:49 (IST) 19 Nov 2024

कोळीवाडीचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

मुंबई : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर काळात संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान असलेल्या गिरगावमधील फणसवाडी परिसरातील कोळीवाडी पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. मात्र, यात म्हाडामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे खेटे घातल्यानंतरही कोळीवाडीतील रहिवाशांना न्याय मिळालेला नाही. नियमानुसार सहा महिन्यांमध्ये प्रस्ताव सादर न करणाऱ्या विकासकालाच म्हाडाने संधी दिल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे, आता कोळीवाडीतील रहिवासी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या विचारात आहेत.

वाचा सविस्तर…

10:48 (IST) 19 Nov 2024

अनिल देशमुखांवरील हल्ल्यामागील रहस्य… काय घडले नेमके?

अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला होण्याच्या घटनेने नागपूर जिल्हा हादरून गेला आहे. या हल्ल्यामागे नेमके कोण ? हल्ला झाला की घडवून आणला ? पोलिसांचे म्हणने काय ? राजकीय पक्षाचे आरोप कोणते ?

वाचा सविस्तर…

10:37 (IST) 19 Nov 2024

Shriniwas Pawar Live News : बारामतीमध्ये श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन

बारामतीमध्ये श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांचं सर्च ऑपरेशन

श्रीनिवास पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील

10:34 (IST) 19 Nov 2024

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; मुंबईत दुचाकी प्रचारफेरीवर भर; नेते व कार्यकर्त्यांच्या गर्दीत उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

अरे आवाज कुणाचा?, ही ताकद कुणाची?, कोण आला रे कोण आला, लक्षात ठेवा लक्षात ठेवा आपली निशाणी लक्षात ठेवा आदी विविध घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी मतदारसंघ दणाणून सोडला होता. तसेच प्रचारादरम्यान उमेदवारांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टोलेबाजीही केली. अनेक ठिकाणी विविध उमेदवारांच्या प्रचारफेरी रस्त्याच्या दुतर्फा एकमेकांसमोरही आल्या.

सविस्तर बातमी वाचा

10:33 (IST) 19 Nov 2024

Sanjay Raut Live News : “विरोधी पक्षातील अनेकांवर हल्ले होतील”, अनिल देशमुखांच्या हल्ल्यानंतर संजय राऊतांचा संशय

विरोधी पक्षातील अनेकांवर हल्ले होतील. अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख निवडणुकीला उभे आहेत आणि ते निवडून येत आहेत. ७ वेळा अनिल देशमुख निवडून आले आहेत. भाजपाची जे नौटंकी चालू आहे, असं कधी झालं नव्हतं. माजी गृहमंत्र्यांवर हल्ले व्हावेत असं कधीही महाराष्ट्रात झालं नव्हतं, ते देवेंद्र फडणवीस आणि अमित शाहांच्या काळात झालं आहे. काय यांच्या हातात कायदा सुव्यवस्था आहे.