2024 Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Updates, 19 November 2024 : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोप – प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. त्यापूर्वी सोमवारी अनेकांच्या सभा गाजल्या. तर, प्रचारफेरीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, प्रचार तोफा थंडावताच दोन महत्त्वाच्या घटना समोर आल्या. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि भाजपाचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्याप्रकरणी आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
2024 Maharashtra Assembly Election Live Updates, 19 November 2024 : महाराष्ट्रातील निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मतदानाकडे लक्ष्य!
विनोद तावडेंचं राहुल गांधी यांच्या ट्वीटला प्रत्युत्तर
“राहुल गांधीजी, तुम्ही स्वतः नालासोपारा येथे या, हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज बघा, तिथली निवडणूक आयोगाची संपूर्ण कार्यवाही बघा आणि पैसे कसे आले हे सिद्ध करा. कोणतीही माहिती नसतानाचा अशा प्रकारचे वक्तव्य हे बालिशपणाचं नाही तर अजून काय?”, असं विनोद तावडेंनी म्हटलं आहे.
“विनोद तावडेंना अटक करा”, रमेश चेन्नीथला यांची मागणी
“महाराष्ट्रात भाजपाने पराभव स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांनी पैसे वाटायला सुरुवात केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे ५ कोटी रुपये घेऊन एका मतदारसंघात जाऊन ते वाटत असल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपाने कितीही पैसे वाटले तरी महाराष्ट्रात भाजपा महायुती विजयी होणार नाही. महाराष्ट्रातील जनता सत्ता परिवर्तनासाठी तयार आहे. विनोद तावडे यांनी जे काम केलं. त्यासाठी त्यांना अटक केली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्यांनी ज्यांना ज्यांना पैसे वाटले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजपा आणि शिवसेना शिंदे यांनी राज्यात पैसे वाटले याची चौकशी झाली पाहिजे”, असं काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी म्हटलं आहे.
पुण्यातील वडगावशेरीमधील शरद पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे यांच्यावर अज्ञाताकडून हल्ला
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या असून उद्या मतदान होणार आहे. तर या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पुण्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ चर्चेत राहिला. या मतदारसंघातून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे, तर शरद पवार गटाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे सर्वांनी पाहिले. त्याच दरम्यान मागील सहा दिवसांपूर्वी वडगावशेरी भागातील अजित पवार गटाचे नेते चंद्रकांत टिंगरे आणि माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांनी महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत टिंगरे आणि रेखा टिंगरे यांनी शरद पवार गटात प्रवेश देखील केला. यामुळे एकूणच महायुतीला धक्का मानला जात आहे. या सर्व घडामोडी दरम्यान चंद्रकांत टिंगरे यांच्यावर आज दुपारी अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Maharashtra Election 2024 : अंधेरी पश्चिमेत भाजप आमदाराला कडवे आव्हान! नव्या राजकीय समीकरणांमुळे मतांचे ध्रुवीकरण
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या रवींद्र वायकर यांना फक्त २२१ मतांची आघाडी देणाऱ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार अमित साटम यांना यंदा कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. सविस्तर वाचा…
Vinod Tawade Live Updates : “संशय येऊ नये म्हणून महिलांच्या माध्यमातून…”, हितेंद्र ठाकूरांचा दावा
पार्टी विथ डिफरंन्स म्हणणारे पैसे वाटतात. त्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सचिव येतात, याचं मला आश्चर्य वाटतं. महिलांनाही त्यांनी पुढे केलं. महिला तिथे तोंड लपवून बसल्या होत्या. महिलांच्या माध्यमातून पैसे वाटले तर संशय येत नाही. १९ ते २० लाख पैसे वाटले आहेत. बाटेंगे तो पिटेंग आम्हीही मागे पुढे पाहणार नाही.
Maharashtra Assembly Election 2024 : ६ लाखांवर मतदारांच्या हातात १११ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला…..आज अकोला जिल्ह्यात….
जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघातील निवडणुकीच्या रिंगणात एकूण १११ उमेदवार असून त्यांच्या भाग्याचा फैसला १६ लाखांवर मतदारांच्या हातात आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. सविस्तर वाचा…
Anil Deshmukh Attacked: अनिल देशमुखांचा सहानुभूतीसाठी स्टंट; चित्रा वाघ म्हणतात, ‘पुराव्यानिशी पर्दाफाश करू…’
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सविस्तर वाचा…
Umarkhed Assembly Constituency :उमरखेडच्या निवडणुकीत ‘ट्विस्ट’ वंचित व शिवसेना बंडखोराकडून…
आज सकाळपासून उमरखेड मतदारसंघात समाजमाध्यमावर वंचित बहुजन आघाडीचे उमदेवार तातेराव हणवते यांनी १०० रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलेले कथित पाठींब्याचे पत्र व्हायरल झाले. सविस्तर वाचा…
वरळी बीडीडीतील ३५ हून अधिक चाळींतील रहिवासी मतदान करणार, मतदानावरील बहिष्काराचा निर्णय अखेर मागे
मुंबई : वरळी बीडीडीमधील ३५ हून अधिक चाळींतील रहिवाशांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता प्रत्यक्ष मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना या रहिवाशांनी बहिष्काराचा निर्णय मागे घेतला आहे.
mahavikas aghadi : २७ मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढतींचे ‘मविआ’समोर आव्हान
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये तीन मोठे पक्ष विरुद्ध पाच डावे- समाजवादी पक्ष यांच्यात २७ विधानसभा मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. मैत्रीपूर्ण लढतींचे रुपांतर मोठे पक्ष विरुद्ध छोटे पक्ष असे झाल्याने ‘मविआ’च्या ३३ मतदारसंघांत आव्हान उभे राहिले आहे.
Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात, चार जण जखमी
जळगाव : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी मंगळवारी किनगाव (ता.यावल) येथे साहित्य घेऊन मतदान केंद्राकडे जात असलेल्या चार महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात चार महिला कर्मचारी जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Vinod Tawade : “मला भाजपावाल्यांनीच विनोद तावडेंबद्दल सांगितलं”, हितेंद्र ठाकूर यांची माध्यमांना माहिती; पैसे वाटल्याचा आरोप!
भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे विरार पूर्वमधील हॉटेल विवांतामध्ये उपस्थित असताना तिथे मोठा गदारोळ झाला. विनोद तावडे तिथे पैसे वाटत असल्याचा आरोप करत त्याचवेळी क्षितिज ठाकूर व त्यांच्यासह बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते तिथे आले. त्यावेळी भाजपा कार्यकर्ते व बविआच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणवार बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी जवळपास तीन तास बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेराव घातला होता. एकीकडे भारतीय जनता पक्षानं हे आरोप फेटालून लावले असताना दुसरीकडे हितेंद्र ठाकूर यांनी भाजपातूनच विनोद तावडेंबद्दल सांगण्यात आल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
एकाच गाडीतून हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे रवाना
‘सोडून दिलं…”, विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप केल्यानंतर हितेंद्र ठाकूर बॅकफूटवर?
सांगण्याकरता काही आहे का. पैसे वाटप, बैठका घ्यायच्या असतात का? भाजपाच्या अंगावर येईल , त्यांच्याकडे बोलायला काही नव्हतं. त्यामुळे आचारसंहितेत पत्रकार परिषद घेत नाहीत. कोणत्या आचारसंहितेत पत्रकार परिषद घेत नाहीत. जिल्हाधिकारी म्हणतात की पत्रकार परिषद घेता येत नाही. मी कोणाच्या बापाचा प्रेशर घेत नाही – हितेंद्र ठाकूर
माल भरपूर आहे. आता मला ५० फोन आले. जे आहे ते मिटवा. आपण मित्र आहोत, म्हणाले. मी म्हटलं सोडून दिलं – हितेंद्र ठाकूर
वेगवेगळ्या रुममध्ये कुठे १० लाख, २ लाख कुठे ५ लाख मिळाले – हितेंद्र ठाकूर
Maharashtra Live News
निवडणूक आयोगाने विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूरांची पत्रकार परिषद थांबवली
पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसपुढे तिहेरी लढतीचे आव्हान
नागपूर : लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कडवे आव्हान देणारे विकास ठाकरे यांना काँग्रेसने पुन्हा एकदा पश्चिम नागपूर मतदारसंघाच्या मैदानात उतरले असून त्यांना टक्कर देण्यासाठी भाजपने सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेस बंडखोरही रिंगणात असल्याने काँग्रेसपुढे हा मतदारसंघ राखण्याचे आव्हान आहे.
वाशीम जिल्ह्यात मतविभाजन निर्णायक; तिरंगी-चौरंगी लढतींमुळे रंगत
अकोला : विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीला बंडखोरी थोपवण्यात अपयश आले. त्यामुळे वाशीम, रिसोड व कारंजा मतदारसंघात तिरंगी-चौरंगी सामने होत आहेत. जातीय व मतविभाजनाचे समीकरण कुणाच्या पथ्यावर पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दर्यापुरात महायुतीतील संघर्ष वेगळ्या वळणावर
अमरावती : महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्या विरोधात भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांनी थेट मैदानात उतरून प्रचार केल्याने महायुतीत संघर्ष टोकदार बनलेला असताना आता अभिजीत अडसूळ यांनी महायुतीच्या नेत्यांची छायाचित्रे वापरल्याबद्दल युवा स्वामिभान पक्षाच्या उमेदवाराविरूद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
Vinod Tawade Live Updates : “रोज रात्री ११ नंतर पोलीस बंदोबस्तात…”, पैसे वाटपावरून संजय राऊतांचा मोठा दावा
भाजपाने कितीही लपवायचा प्रयत्न केला तरीही जे घडलंय ते कॅमेरासमोर आहे. खुलासे कसले करताय? भाजपाचा खरा चेहरा उघड झालाय. त्यांचा खेळ संपलाय. विनोद तावडे पक्षाचे महासचिव आहेत. महासचिवाकडे ५ कोटी रुपये पकडण्यात आले. पैशांचं वाटप करत असताना बविआचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. त्यांनी विनोद तावडेंना कोंडून ठेवलं, यावर भाजपा काय खुलासा करणार? प्रत्येक मतदारसंघात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पैसे पोहोचले. मुंबईत- ठाण्यातून पैसे वाटपासाठी माणसांच्या नेमणुका झाल्या आहेत. ईशान्य मुंबईतून राम रेपाळे रात्री ११ नंतर पैसे घेऊन येतो आणि मतदारसंघात पैसे वाटप करून पोलीस बंदोबस्तात परत ठाण्यात जातो. अशी १८ पैसे वाटप करणाऱ्यांची नावे माझ्याकडे आहेत – संजय राऊत
अकोला जिल्ह्यात तिरंगी सामने; महायुती, महाविकास आघाडीसह वंचित लढतीत
अकोला : विधानसभेच्या जिल्ह्यातील पाच मतदारसंघांमध्ये तिरंगी सामन्यांची चुरस आहे. महायुती, महाविकास आघाडीसह वंचितदेखील लढतीत दिसून येते. जातीय समीकरण व मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
Vinod Tawade Live News : पैसे वाटपाचा आरोप झाल्यानंतर विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मतदानाच्या दिवशी…”
आज वाड्याहून नालासोपारा येथे परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती.मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय आहेत, हे सांगण्याकरता मी आलो होतो. मित्र पक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटतोय. मी म्हणालो की चेक करा काही हरकत नाहीत. तर हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकरू आले. जर पैसे वाटप होत असेल तर निवडणूक आयोगाने चौकशी करावी. मतदानादिवशी मत यंत्रणेवर सही कशी करावी, हरकत कशी घ्यावी, असं या बैठकीत सांगण्यात येत होतं – विनोद तावडे
Shrinivas Pawar Sharayu Toyota Live Updates : शरयू टोयोटामध्ये सर्च ऑपरेशन झाल्यानंतर श्रीनिवास पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“तीन-चार पोलीस आणि पाच-सहा सरकारी अधिकारी होते. रात्रीचं शोरूम बंद असतं. पण ते आले आणि म्हणाले की तक्रार आली आहे. तक्रार कुठून आलीय हे त्यांनी सांगितलं नाही. शोरुममधील कर्मचाऱ्यांनी त्यांना आतमध्ये नेलं. त्यांनी आतमध्ये तपासलं असता त्यांना काहीही सापडलं नाही. निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी घडत असतात”, अशी प्रतिक्रिया श्रीनिवास पवार यांनी दिली.
सिंदखेडराजाच्या आखाड्यात दोन मित्र समोरासमोर, ‘शत्रू’चेही आव्हान
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत रंगली आहे. येथे महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही मित्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. शिंदे गटातर्फे माजी आमदार शशिकांत खेडेकर, तर राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे मूळचे काँग्रेसचे मनोज कायंदे मैदानात उतरले आहेत.
विरारमध्ये विनोद तावडेंकडून पैसे वाटप, बविआच्या उमेदवाराचा मोठा दावा
बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी विनोत तावडेंवर गंभीर आरोप केला आहे. विनोद तावडे यांनी विरार येथे पैसे वाटल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. “मी रिटर्निंग ऑफिसर यांच्याशी बोललो आहे. विनोद तावडे मला विनंती फोन करून करत आहेत. माझ्या फोनवर त्यांचे २५ कॉल्स आले आहेत. मला माफ करा, जाऊद्या, अशी विनंती ते करत आहेत”, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.
बेलापुरात बंडखोरांना साथ देणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांची तंबी, मंदा म्हात्रे यांनाच विजयी करण्याचे आवाहन
नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार मंदा म्हात्रे यांना विजयी करा असे आवाहन करत असतानाच बंडखोर उमेदवाराला साथ देणाऱ्या स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना तंबी दिली. या मतदारसंघात बंडखोरी करणारे विजय नहाटा यांना टाटा करा, अशा गद्दारांना मी थारा देणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बंडखोरांना इशारा दिला.
Sanjay Shirsat and Manoj Jarange Meet Live : संजय शिरसाटांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले…
मनोज जरांगेंची प्रकृती ठीक नव्हती. त्यांना सलाईन लागली होती. आज त्यांना मोकळा वेळ मिळाला त्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेतली. आमची स्नेहपूर्वक मैत्री आहे. आपल्या माणसांना भेटण्यात आजचा वेळ त्यांना दिला. आमचे राजकीय व्यतिरिक्त विषय असतात त्यावर चर्चा केली. त्यांचा राजकारणाशी संबंध नसल्याने ते फार खोलात जात नाहीत. बाकी इतर कोणते विषय नव्हते. मी मित्र म्हणून त्यांची विचारपूर करत असतो – संजय शिरसाट
Anil Deshmukh Attack Live Update : अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात चार अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
– काटोलमध्ये अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरण नागपूर ग्रामीण पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे
– या प्रकरणात चार अज्ञात इसमांविरोधात हत्येचा प्रयत्न हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
– घटनास्थळावर पुराव्यांचा तपास सुरू आहे
– जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
– कायदा व सुवव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई होईल
साताऱ्यात दोन्ही राजे एकत्र
साताराः साताऱ्यातील राजकारण हे पक्षांपेक्षा खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे दोन राजे आणि लोकप्रतिनिधींभोवती फिरत असते. यंदा लोकसभेपासूनच केवळ पक्षच नाही तर दोन्ही राजेही तना-मनाने एकत्र राहिल्याने कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत या एकीचा संदेश गेला आहे.
गोंदिया जिल्ह्यात तीन मतदारसंघांत थेट, एका जागी चौरंगी लढत
गोंदिया जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत थेट तर एका मतदारसंघात चौरंगी लढत रंगली आहे. गोंदिया मतदारसंघात महाविकास आघाडीचे गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) विरुद्ध महायुतीचे विनोद अग्रवाल (भाजप) या दोघांतच थेट लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात युती विरुद्ध आघाडीत थेट सामना, सिंदखेडराजात लक्षवेधी मैत्रीपूर्ण लढत
बुलढाणा जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत थेट सामना असून सिंदखेडराजातील मैत्रीपूर्ण लढत लक्षवेधी ठरली आहे. वंचित, बसप, मोठ्या संख्येतील नवीन पक्ष आणि अपक्ष उमेदवारांमुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहे.