2024 Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Updates, 18 November 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुसाठी प्रचाराची मुदत आज संपणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान असल्यामुळे आज (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवशी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार आणि राजकीय पक्ष करताना दिसेल. काल रविवार असल्यामुळे सर्व पक्षाच्या जोरदार सभा झालेल्या पाहायला मिळाल्या. या सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तर जनतेला नवी आश्वासने देण्यात आली. आज शेवटच्या दिवशी आणखी कोणते मुद्दे निवडणुकीत येतात, हे पाहावे लागेल.

Live Updates

Maharashtra Assembly Election 2024 Live Today, 18 November 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४, मराठी बातम्या

19:17 (IST) 18 Nov 2024

तुम्ही रोहित पवार याला विधानसभेत पाठवा, त्याला मंत्रिमंडळात कोणते खाते द्यायचे हे मी पाहतो - शरद पवार

कर्जत : रोहित पवार यांना पाच वर्षांपूर्वी तुम्ही प्रथम निवडून दिले. पाच वर्षे त्यांनी आमदार म्हणून काम पाहिले. आता दुसऱ्यांदा त्याला विधानसभेत पाठवा, मंत्रिमंडळामध्ये त्याला कोणते खाते द्यायचे याची जबाबदारी माझी राहील, असे उद्गार शरद पवार यांनी कर्जत येथे रोहित पवार यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना काढले.

18:41 (IST) 18 Nov 2024

भाजपकडून देशाला तोडण्याचे काम, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

वसई: भाजप नेते योगी हे मागील काही दिवसांपासून बटेंगे तो कंटेंगेची भाषा करीत आहेत. देशाला तोडण्याचे काम भाजप, राष्ट्रीय सेवा संघ आणि योगी यांनी केले असल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी वसई महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील व संदीप पांडे यांच्या प्रचारार्थ माणिकपूर येथील मैदानात स्वाभिमान सभा पार पडली. या सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे वसईत आले होते.

18:19 (IST) 18 Nov 2024

खबरदार! आता समाजमाध्यमांवर प्रचार कराल तर….

नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा प्रचारतोफा सोमवारी (१९ नोव्हेंबर) संध्याकाळी ६ वाजता थंडावणार आहे. त्यानंतर समाजमाध्यमांवर निवडणूकीचा प्रचार करणारी पोस्ट टाकल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल

सविस्तर वाचा...

18:13 (IST) 18 Nov 2024

Maharashtra Assembly Election: प्रचार थांबला; आता चेंडू मतदारांच्या कोर्टात, २० नोव्हेंबरची प्रतिक्षा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत आज सायंकाळी ६ वाजता संपली असून आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी आता मतदार राज्याची सत्ता कुणाला सोपवायची याचा निर्णय घेतील. उद्याचा दिवस मतदारांना जाहिराती, मुलाखती आणि उमेदवारांच्या प्रसिद्धीच्या फोनपासून सुटका मिळणार आहे.

18:02 (IST) 18 Nov 2024

दक्षिण नागपूरमध्ये भाजप काँग्रेसला समानसंधी

नागपूर : दक्षिण नागपूर मतदारसंघात तिसऱ्यांदा रिंगणात असलेले भाजपचे विद्यमान आमदार मोहन मते यांच्यासमोर काँग्रेसचे गिरीश पांडव यांचे तगडे आव्हान आहे.

सविस्तर वाचा...

17:54 (IST) 18 Nov 2024

दादर – माहीम विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

दादर – माहीम विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या प्रचारफेरीत कोळी बांधव आणि वारकरी सुद्धा सामील झाले आहेत. ढोल - ताशा, बैंडच्या गजरासह टाळ - मृदुंगांचाही गजर पाहायला मिळत आहे.

17:53 (IST) 18 Nov 2024

Eknath Khadse Political Retirement : एकनाथ खडसे यांचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काही महिने जोरकस प्रयत्न करुनही यश न आल्याने आमदार एकनाथ खडसे यांनी तो प्रयत्न सोडून राष्ट्रवादीतच (शरद पवार) राहण्याचा निर्णय घेतल्यावर महाविकास आघाडीने विरोधकांना तोंड देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर विधानसभा निवडणुकीत टाकली. सविस्तर वाचा

17:52 (IST) 18 Nov 2024

Constituencies In Yavatmal : स्थानिक मुद्यांसह जातीय समीकरणे निर्णायक, यवतमाळमधील सातही मतदारसंघात चुरस

जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात होत असलेली निवडणूक अखेरच्या टप्प्यात जातीय समिकरणांवर येवून पोहोचली आहे. महायुतीचे उमेदवार लाडकी बहीण व सरकारने लागू केलेल्या अन्य योजनांमुळे आपणच विजयी होवू असा दावा करत आहे.

सविस्तर वाचा

17:52 (IST) 18 Nov 2024

अजित पवारांनी विदर्भातील स्वपक्षाच्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडले का? एकही प्रचार सभा नाही, कार्यकर्ते सैरभैर

राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने विदर्भात सात उमेदवार दिले असले तरी प्रचारासाठी पक्षातील कोणताही बडा नेता या भागात फिरकला नाही. सविस्तर वाचा

17:41 (IST) 18 Nov 2024

नागपुरात अंमली पदार्थांचे तस्कर व पिस्तूल वापणाऱ्यांचा सुळसुळाट! निवडणुकीच्या तोंडावर धामधूम

नागपूर : सध्या विधानसभा निवडणुकीची धामधून सुरु असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. मात्र, शहरातील गुन्हेगार, अंमली पदार्थ तस्कर आणि पिस्तूलांचा वापर करणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत.

सविस्तर वाचा...

17:25 (IST) 18 Nov 2024

‘या’मतदारसंघात विकासाचे नाही तर दादागिरीचे राजकारण, फडणवीस म्हणतात,‘रेती चोरी व अवैध व्यवसायातून…’

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभांपैकी सावनेर क्षेत्र माजी मंत्री सुनील केदारांमुळे सर्वात मागास राहिला. केदारांनी या भागात केवळ रेती चोरी आणि अवैध व्यवसायातून लोकांना रोजगार दिला.

सविस्तर वाचा...

17:02 (IST) 18 Nov 2024

Vinod Tawde: 'एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है', विनोद तावडेंची नवी घोषणा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्रात पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली. तसेच एक है तो सेफ है, या भाजपाच्या घोषणेवर टीका करताना उद्योगपती गौतम अदाणी आणि भाजपाचे संबंध असल्याची टीका त्यांनी केली. या पत्रकार परिषदेनंतर भाजपाकडून राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रत्युत्तरा दाखल घेतलेल्या पत्रकार परिषेदत राहुल गांधींवर टीका केली. उद्योगपती गौतम अदाणी यांना विविध कंत्राटे देऊन मोठे करण्याचे काम काँग्रेसच्या काळातच झाले, याचा तपशील तावडे यांनी दिला. तसेच 'एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है', अशी नवी घोषणा विनोद तावडे यांनी दिली.

https://twitter.com/ANI/status/1858445372705968598

16:51 (IST) 18 Nov 2024

जय भीम म्हटल्याने 'या' नेत्याची मंत्रीपदाची संधी हुकली ?

नागपूर : डॉ. नितीन राऊत यांचे चित्रफित प्रसारित झाली आहे. त्यात ते जय भीम म्हणतो म्हणून मंत्रिपद गेले होते, असे वक्तव्य करत आहे.

सविस्तर वाचा...

16:39 (IST) 18 Nov 2024

प्रचारात मागे राहाल, पालिकेच्या तिकिटाला मुकाल, एकनाथ शिंदे यांच्याकडून बदलापुरात सर्व पक्षियांची कान उघाडणी

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मागे पडला आणि तुमच्या प्रभागात जर आपल्या उमेदवाराला कमी मते मिळाली तर लक्षात ठेवा पालिका निवडणुका तोंडावर आहेत. तुम्हाला तिकीटाला मुकावं लागेल, अशी स्पष्ट कान उघाडणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बदलापुरात महायुतीच्या मेळाव्यात केली.

वाचा सविस्तर...

16:30 (IST) 18 Nov 2024

‘बटेंगे तो कटेंगे’ १०० टक्के मतदानासाठी हिंदू संस्था…

नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवाचा भाग बनावा म्हणून प्रशासन जनजागरण करत आहे.

सविस्तर वाचा...

16:15 (IST) 18 Nov 2024

बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय माझा व फडणवीसांचा, गडकरी

गोंदिया : बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय बडोलेंचा नव्हता तर देवेंद्र फडणवीस व माझा होता, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यानो आपल्या मनातील गैरसमज दूर करावा,असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

सविस्तर वाचा...

15:59 (IST) 18 Nov 2024

काँग्रेसने १९९२ च्या दंगल प्रकरणात कारवाई केली नाही - प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

अकोला : श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालामध्ये १९९२ च्या दंगल प्रकरणामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना व इतर हिंदुत्ववादी पक्ष, संघटनांचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

15:54 (IST) 18 Nov 2024

Dilip Walse Patil: शरद पवारांनी पाडा, पाडा, पाडा.. असे आवाहन केल्यानंतर दिलीप वळसे पाटीलही आक्रमक

मला आयटी, ईडी यापैकी एकही नोटीस आली असेल तर मी उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घ्यायला तयार आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले. मला आजवर एकही नोटीस आलेली नाही आणि मला कशाचीही भीती नाही. मी ३५ वर्षांत ज्यापद्धतीने राजकारण केले. त्याची नोंद इतर पक्षातील नेत्यांनीही घेतलेली आहे, असे दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

15:38 (IST) 18 Nov 2024

Amravati Assembly Constituency : अमरावतीत तिरंगी लढतीत कुणाची बाजी?

जिल्‍ह्यातील राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्‍व ठेवून असलेल्‍या तीन दिग्‍गजांची अमरावती विधानसभा मतदारसंघातील लढत ही लक्षवेधी ठरली आहे. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या (अजित पवार) उमेदवार सुलभा खोडके, काँग्रेसचे डॉ. सुनील देशमुख आणि भाजपचे बंडखोर जगदीश गुप्‍ता यांच्‍यासाठी ही निवडणूक राजकीय अस्तित्‍वाची परीक्षा घेणारी आहे.

सविस्तर वाचा…

15:13 (IST) 18 Nov 2024

दादर - माहीम मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारफेरीत आदित्य ठाकरेंचा सहभाग

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा काहीच वेळात थंडावतील; या पार्श्वभूमीवर दादर - माहीम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारफेरीत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला. शेवटच्या दिवशी उमेदवार दुचाकी प्रचारफेरीवर भर देत आहेत.

14:08 (IST) 18 Nov 2024

अहेरीत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत? अपक्षांमुळे प्रस्थापितांच्या मनात धाकधूक…

गडचिरोली : विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला केवळ आता ४८ तास शिल्लक असून राज्याचे लक्ष लागलेल्या अहेरी विधानसभेत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत होणार असे चित्र आहे. याठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हेही शर्यतीत आहेत. त्यामुळे विजयची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता आहे.

सविस्तर वाचा

14:07 (IST) 18 Nov 2024

पूर्व नागपूरच्या बालेकिल्ल्यात भाजपपुढे प्रथमच आव्हान

नागपूर : गेल्या तीन निवडणुकांपासून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पूर्व नागपुरात यंदा पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत. भाजपचे उमेदवार कृष्णा खोपडे हे विजयाचा चौकार लावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांची लढत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दुनेश्वर पेठे, अजित पवार गटाच्या बंडखोर आभा पांडे, काँग्रेसचे बंडखोर पुरुषोत्तम हजारे निवडणूक लढवत आहेत.

सविस्तर वाचा

14:07 (IST) 18 Nov 2024

कारंजामध्ये मतदारांचे पाठबळ कुणाला?; कार्यकर्ते सतरंज्या उचलण्यासाठीच मर्यादित

अकोला : नेत्यांच्या वारसदारांना आमदारकीची डोहाळे लागले आहेत. कारंजा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांनी नेत्यांच्या वारसदारांनाच निवडणूक रिंगणात उतरवत कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्यासाठीच मर्यादित ठेवले. आता मतदार कुठल्या वारसदारांना मतांचे पाठबळ देतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 18 Nov 2024

अंधेरी पश्चिमेत भाजप आमदाराला कडवे आव्हान!

मुंबई : लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या रवींद्र वायकर यांना फक्त २२१ मतांची आघाडी देणाऱ्या अंधेरी पश्चिम मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार अमित साटम यांना यंदा कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या ज्या अशोक जाधव यांचा मोठ्या फरकाने पराभव केला, तेच यावेळी पुन्हा समोर आहेत.

सविस्तर वाचा

14:06 (IST) 18 Nov 2024

मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?

अलिबाग- शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याची खेळी शरद पवार यांनी श्रीवर्धन मतदारसंघात केली आहे. मात्र काँग्रेस मधील बंडखोरीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अडचणी वाढणार आहे. मविआतील बंडखोरी अंतर्गत कुरबुरी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरेच्या पथ्यावर पडू शकणार आहे.

सविस्तर वाचा

14:05 (IST) 18 Nov 2024

Chandrapur Assembly Election 2024: चंद्रपूर जिल्ह्यात सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला

Chandrapur Assembly Constituency Candidates for Maharashtra Assembly Election 2024 चंद्रपूर : राज्याच्या राजकारणात वर्चस्व राखून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजप नेते तथा विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस नेते तथा विद्यमान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर या तीन नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मुनगंटीवार यांना सातव्या विजयाची, तर वडेट्टीवार यांना ब्रह्मपुरीत ‘हॅट्ट्रिक’ची प्रतीक्षा आहे.

सविस्तर वाचा

13:53 (IST) 18 Nov 2024

Constituencies in Wardha District : वर्धा जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतच थेट सामना

वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी या जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने नेमके चित्र स्पष्ट नसून मतदार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. सविस्तर वाचा…

13:47 (IST) 18 Nov 2024

नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?

नागपूर: प्रियंका गांधी यांची एक झलक बघण्यासाठी परिसरातील नागरिकांनी तब्बल चार प्रतीक्षा केली. मात्र, या ‘रोड शो’साठी भाजपच्या कार्यकर्त्यांनीही तब्बल चार तास प्रतीक्षा केली आहे.

सविस्तर वाचा...

13:08 (IST) 18 Nov 2024

Navneet Rana: "बच्चू कडू ज्या ताटात खातात त्याच ताटात..", नवनीत राणा यांची मोठी टीका

अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमधील वाद नवीन नाही. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता नवनीत राणा यांनी उत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, मी प्रचारातून गायब झालेली नाही. मी जिल्हाभर फिरत आहे. पण मला शोधण्याची काळजी माझे दादा बच्चू कडू का करत आहेत? पण त्यांच्या काळजीसाठी मी त्यांचे आभार व्यक्त करते. बच्चू कडू ज्या ताटात खातात, त्याच ताटात छिद्र करतात, अशी टीका नवनीत राणा यांनी केली.

13:06 (IST) 18 Nov 2024

नाना पटोले हे स्वयंघोषित मुख्यमंत्री, खासदार प्रफुल पटेल

गोंदिया : स्वयंघोषित मुख्यमंत्री गोंदिया भंडारा येथील जनतेला मत मिळविण्याकरिता भूलथापा देण्याच्या प्रयत्न करीत असतील तर ते योग्य नाही, असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोले यांना लगावला.

सविस्तर वाचा...

MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news

भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? 'मविआ'चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर.. ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

Story img Loader