2024 Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Updates, 18 November 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुसाठी प्रचाराची मुदत आज संपणार आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान असल्यामुळे आज (१८ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजेपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यामुळे या शेवटच्या दिवशी जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार आणि राजकीय पक्ष करताना दिसेल. काल रविवार असल्यामुळे सर्व पक्षाच्या जोरदार सभा झालेल्या पाहायला मिळाल्या. या सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. तर जनतेला नवी आश्वासने देण्यात आली. आज शेवटच्या दिवशी आणखी कोणते मुद्दे निवडणुकीत येतात, हे पाहावे लागेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Assembly Election 2024 Live Today, 18 November 2024 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४, मराठी बातम्या
शेतात दारूचा साठा सापडला, आरोप प्रत्यारोप सूरू.
वर्धा : दारू, पैसे वाटप, पार्ट्या यास उधाण येते. आता सर्वत्र गाजत असलेल्या आर्वी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दारू साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे.
सविस्तर वाचा…
Kalicharan on Manoj Jarange Patil: कालीचरण यांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका: म्हणाले…
वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच वादात अडकणारे कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान केले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत बोलत असताना कालीचरण यांनी हिंदूंना मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पाडण्याचे आवाहन केले. तसेच मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा हवाला देऊन लाखो लोक मुंबईत गेल्याची घटना घडली असे ते म्हणाले. मला त्या आंदोलनाचा नेता आधी चांगला वाटला होता. पण नंतर तो चादर चढवायला गेला, अशी टीका कालीचरण महाराज यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता केली.
विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी ठाकरे गटाचे माजी कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी भाजपची वाट धरून डोंबिवली विधानसभेतील भाजप नेते व उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण यांना समर्थन जाहीर केले.
शहरात ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे सत्र कायम, सिंहगड रस्ता, कोंढवा भागातील घटना
पुणे : पादचारी ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ऐवज चोरून नेल्याच्या घटना सिंहगड रस्ता आणि कोंढवा भागात घडली.
सविस्तर वाचा…
Ajit Pawar: ‘माझा दादा मुख्यमंत्री व्हावा’, अजित पवारांच्या बहिणीची इच्छा
अजित पवार यांची चुलत बहीण रजनीताई इंदुलकर या बारामतीमध्ये त्यांच्या प्रचारासाठी फिरत आहेत. कुटुंबातील इतर सदस्यांनी दादांना पाठिंबा द्यायला हवा होता, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच माझा दावा राज्याचा मुख्यमंत्री व्हावा, अशीही इच्छा त्यांनी बोलून दाखविली. मी त्यांना कायम आशीर्वाद देत आले आहे. एक दिवस तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत पाहायचं आहे, माझं स्वप्न एक ना एक दिवस नक्कीच पूर्ण होईल.
निवडणुकीचा प्रचार संपण्याच्या बेतात असताना बडनेरा मतदारसंघातील युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी नवा डाव खेळला आहे. बच्चू कडू यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर उमेदवार प्रीती बंड यांना विनाअट पाठिंबा दिला आहे.
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
पुणे : स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मंगळवारी (१९ नोव्हेंबर) आणि बुधवारी (२० नोव्हेंबर) वाहतूक बदल करण्यात येणार आहे.
आरक्षण संपविण्यासाठी ‘या ’ धोरणाचा वापर, मायावतींनी कोणावर केला गंभीर आरोप !
पुणे : राज्य सरकारने त्यांच्या फायद्यासाठी जाती-जातींमध्ये ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या धोरणाचा अवलंब करून आरक्षणातील वर्गीकरणाचा निर्णय लागू करण्यास सुरुवात केली आहे,’ असा आरोप बसपाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केला.
मायाच बायकोने कोणतं घोडं मारलं रे बुवा ‘ घराणेशाहीचे समर्थन आणि देवेंद्र फडणवीसांना सवाल.
वर्धा : आर्वीत खासदार अमर काळे यांनी पत्नी मयुरा काळे यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री सभा घेत झालेल्या आरोपाचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला. याच सभेत सर्व काही ते बोलून टाकू, असे त्यांनी पूर्वीच स्पष्ट करून टाकले होते.
Eknath Khadse: यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही, एकनाथ खडसेंनी जाहीर केली भूमिका
यापुढे कोणतीही निवडणूक लढविणार नाही, अशी घोषणा एकनाथ खडसे यांनी केली आहे. “मी गेली अनेक वर्ष जनतेमध्ये आहे. जनतेच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता, मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडली. आजकाल माझी तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार, हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण सर्वांनी रोहिणी खडसेंचा निवडून द्यावे”, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी केले.