महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा ज्वर वाढू लागला आहे. दोन आघाड्या आणि सहा प्रमुख पक्षांबरोबरच ही निवडणूक तिरंगी, चौरंगी किंवा बहुरंगी करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रत्येकाकडून निवडणूक जिंकण्याचा आणि सत्तेत येण्याचा दावा केला जातोय. आपणही अनेकदा राजकीय घडामोडींचे आडाखे बांधत असतो. जर तुम्हालाही राजकीय घडामोडी आणि निवडणुकांच्या राजकारणाचा गाढा अभ्यास असेल, तर मग हे क्विझ फक्त तुमच्यासाठी आहे!

या क्विझमध्ये तुम्हाला तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी फक्त पाच प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. त्यावर तुम्हाला स्मार्टफोनसारखं आकर्षक बक्षिस जिंकण्याची मोठी संधी आहे. स्मार्टफोनबरोबरच इतरही आकर्षक बक्षिसांचे तुम्ही दावेदार ठरू शकता.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat : महाविकास आघाडी किती जागा जिंकणार? बाळासाहेब थोरातांचं उत्तर, “आम्ही…”
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Anis Ahmed Bhai Rebellion Candidacy Congress print politics news
आपटीबार: ‘लाठी भी मेरी और भैस भी मेरी’
halba community candidates in three constituencies in nagpur against bjp and congress
हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार 
congress leader anil kaushik join bjp
अनिल कौशिक यांच्या बंडा नंतर काँग्रेस भवना बाहेर; पदाधिकारी – कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष
Sunil Tatkare On Jayant Patil
Sunil Tatkare : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
independents candidates in six constituencies of Chandrapur will spoil party candidates votes in vidhan sabha election 2024
अपक्ष बिघडवणार पक्षीय उमेदावारांचे राजकीय गणित? चंद्रपूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत ‘उदंड जाहले अपक्ष’
sharad pawar Diwali padwa
पवार कुटुंबीयांचा बारामतीत वेगवेगळा पाडवा; शरद पवार गोविंदबागेत, अजित पवार काटेवाडीत नागरिकांच्या भेटीला

राजकारण्यांप्रमाणेच तुम्हालाही तुमचाच विजय होईल असं वाटत असेल, तर मग लगेच सुरू करा. वर क्विझची लिंक आहे, त्यावर क्लिक करा आणि प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात करा!

महाराष्ट्रात काय आहे विधानसभा निवडणुकीचं गणित?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एकीकडे भारतीय जनता पक्ष, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष हे तीन सत्ताधारी पक्ष महायुतीमध्ये आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे तीन प्रमुख पक्ष विरोधातील महाविकास आघाडीमध्ये आहेत. यांच्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी व इतर अपक्षांकडूनही निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अवघ्या २८८ जागांसाठी काही हजार उमेदवार रिंगणात उतरले आहेत!