सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. सावंतवाडी मध्ये विद्यमान शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी चौथ्यांदा चौकार मारला तर कणकवली मध्ये भाजपचे नितेश राणे तिसऱ्यांदा विजयी झाले. कुडाळ येथे विद्यमान आमदार वैभव नाईक यांचा पराभव करत निलेश राणे यांनी वडील नारायण राणे यांच्या पराभवाचा वचपा काढला. जिल्ह्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तिन्ही उमेदवार पराभूत झाले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात बदल हवा तर आमदार नवा या स्लोगनने उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राजन तेली यांच्यासह भाजपचे युवा मोर्चा उपाध्यक्ष, बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल परब व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ अर्चना घारे यांनी धुराळा उडवत आरोग्य, रोजगार, पर्यटन, हमीभावावर फोकस केले होते. पण केसरकर यांनी चौथ्यांदा चौकार मारत ३९ हजार ८९९ मताधिक्य घेत राजन तेली यांना तिसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला.या ठिकाणी केसरकर यांना ८१ हजार ००८ ,राजन तेली ४१ हजार १०९ तर अपक्ष विशाल परब ३३ हजार २८१, सौ अर्चना घारे परब ६ हजार १७४ मतं मिळाली.
हेही वाचा >>> Maharashtra Election 2024: “बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घ्या! हा निकाल मान्य नाही” ठाकरेंच्या मोठ्या नेत्याची मागणी
कुडाळला वडीलांच्या पराभवाचा वचपा काढत निलेश राणे विजयी
कुडाळ विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरोधात शिवसेना लढत झाली. या ठिकाणी आमदार वैभव नाईक यांचा निलेश राणे यांनी ८ हजार ३४४ मतांनी पराभव केला. निलेश राणे यांना ८० हजार ९९७ तर वैभव नाईक यांना ७२ हजार ६५३ मतं मिळाली. लोकसभा निवडणूकीत खासदार नारायण राणे यांना २७ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. ते तोडत नाईक यांचा पराभव झाला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर वैभव नाईक गेले नाही ते निष्ठावंत राहिले. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची होती.
कुडाळ विधानसभा मतदारसंघ महायुतीच्या वाटपात शिवसेना (शिंदे गटाला) सुटला होता. त्यामुळे ऐनवेळी निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी दिली. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे धनुष्य बाण तर कणकवली मध्ये भाजपचे नितेश राणे यांच्यासाठी हातात कमळ घेतले होते त्यामुळे घराणेशाहीचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र निलेश राणे व नितेश राणे तगडे उमेदवार होते.
हेही वाचा >>> Shivsena : जनतेच्या दरबारी ‘शिवसेने’चा निकाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “असली – नकलीमध्ये…”
नितेश राणे यांचा हिंदू धर्म मुद्दा फायदेशीर
कणकवली विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे दाखवत आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांचा तब्बल ५८ हजार ००७ मताने पराभव करत विजयाची हॅट्रिक साधली आहे.
ठाकरे शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या आणि अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागुन राहीलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यानी ५८ हजार ०७ मताधिक्क्यानी विजय मिळवत उबाठाला जोरदार धक्का दिला आहे.आमदार नितेश राणे याना १०८३६९ तर संदेश पारकर यांना ५०३६२ मते मिळाली आहेत.
कणकवली विधानसभा निवडणुकीत सहा उमेदवार निवडणुक रिंगणात होते. यामध्ये नितेश नारायण राणे (भाजप – १०८३६९), संदेश पारकर (उबाठा-५०३६२), चंद्रकांत जाधव (बहुजन समाज पार्टी -८८७), अपक्ष गणेश माने (११४४), बंदेनवाज खानी (४५५),संदेश सुदाम परकर(९०१) अशी मते मिळाली आहेत. तर नोटाचा अधिकार १०११ मतदारांनी बजावला असुन २२१ मते अवैध ठरली आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात एक लाख ६३ हजार ३७१ मतदान झाले होते. कणकवली मध्ये घराणेशाही मुद्दा चालला नाही. नितेश राणे सध्या हिंदू धर्मातील प्रश्नावर आक्रमक भूमिकेत असतात. त्यामुळे या ठिकाणी मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरले होते. तर संदेश परकर नावाचा एक उमेदवार उभा करण्यात आला होता.