Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP Seat Wise Analysis: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपाप्रणीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आतापर्यंत केवळ १० जागांवर विजय मिळविला आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचा गट तब्बल ४० मतदारसंघात आमनेसामने आले होते. त्यामुळे मतदार शरद पवारांची तुतारी फुंकणार की अजित पवारांच्या घड्याळाची वेळ साधणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र या संघर्षात अजित पवार गटाची सरशी झालेली दिसून येत आहे. अजित पवार यांनीही महायुतीच्या पत्रकार परिषदेत आमचाच पक्ष खरा असल्याचे ठासून सांगितले होते.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या गटाचे उमेदवार कोणकोणत्या मतदारसंघात आमनेसामने आले होते. त्याची यादी खाली दिलेली आहे. मतदारसंघाचे नाव आणि त्यापुढे दोन्ही गटांच्या उमेदवारांचे नाव दिले आहे. त्यापुढे निकाल दिला असून अजित पवार यांच्या विजयी उमेदवाराचे नाव गुलाबी रंगात रंगवले आहे. अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी गुलाबी रंगाची निवड केली होती. यासाठी त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेटही घातले होते. या रंगावरून अजित पवार आणि त्यांच्या गटावर बरीच टीका करण्यात आली होती. मात्र आता याच प्रचारामुळे अजित पवारांच्या पक्षाला यश लाभले आहे.

Ladki Bahin Yojana Next Installment Date
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? १५०० रुपये मिळणार की २१०० रुपये? आदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : स्मृती इराणी दिल्ली विधानसभेची निवडणूक लढवणार? केजरीवालांना शह देण्यासाठी भाजपाचा प्लान काय?
Ravindra Chavan talk on local body elections in exclusive interview with Loksatta
‘शक्तिशाली’ भारतासाठी ‘बलशाली’ भाजप आवश्यक
Anna Bansode statement over Sharad Pawar praise RSS
Sharad Pawar: मविआचं पुढं काय होणार? राष्ट्रवादीचे खासदार महायुतीत जाणार? शरद पवारांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?
ajit pawar ncp latest news in marathi
अजित पवार स्वबळावर लढणार का ?
क्र.मतदारसंघाचे नावअजित पवारांचा गटशरद पवारांचा गटकोण विजयी ठरले
अणुशक्ती नगरसना मलिकफहाद अहमदसना मलिक
श्रीवर्धनआदिती तटकरेअनिल नवगणेआदिती तटकरे
जुन्नरअतुल बेनकेसत्यशील शेरकरअपक्ष विजयी
आंबेगावदिलीप वळसे पाटीलदेवदत्त निकमदिलीप वळसे पाटील
शिरूरज्ञानेश्वर कटकेअशोक पवारज्ञानेश्वर कटके
इंदापूरदत्तात्रय भरणेहर्षवर्धन पाटीलदत्तात्रय भरणे
बारामतीअजित पवारयुगेंद्र पवारअजित पवार
पिंपरीअण्णा बनसोडेसुलक्षणा शिलवंतअण्णा बनसोडे
वडगाव शेरीसुनील टिंगरेबापूसाहेब पठारेबापूसाहेब पठारे
१०हडपसरचेतन तुपेप्रशांत जगतापचेतन तुपे
११अकोलेकिरण लहामटेअमित भांगरेकिरण लहामटे
१२कोपरगावआशुतोष काळेसंदीप वर्पेआशुतोष काळे
१३पारनेरकाशीनाथ दातेराणी लंकेकाशीनाथ दाते
१४अहमदनगरसंग्राम जगतापअभिषेक कळमकरसंग्राम जगताप
१५माजलगावप्रकाश सोळंकेमोहन जगतापप्रकाश सोळंके
१६बीडयोगेश क्षीरसागरसंदीप क्षीरसागरसंदीप क्षीरसागर
१७आष्टीबाळासाहेब आजबेमेहबूब शेखभाजपा उमेदवार विजयी
१८परळीधनंजय मुंडेराजेसाहेब देशमुखधनंजय मुंडे
१९अहमदपूरबाबासाहेब पाटीलविनायक जाधवबाबासाहेब पाटील
२०उदगीरसंजय बनसोडेसुधाकर भालेरावसंजय बनसोडे
२१माढामीनल साठेअभिजीत पाटीलअभिजीत पाटील
२२मोहोळयशवंत मानेराजू खरेराजू खरे
२३फलटणसचिन पाटीलदीपक चव्हाणसचिन पाटील
२४वाईमकरंद पाटीलअरुणा पिसाळमकरंद पाटील
२५चिपळूणशेखर निकमप्रशांत यादवशेखर निकम
२६चंदगडराजेश पाटीलनंदिता बाभूळकरराजेश पाटील
२७कागलहसन मुश्रीफसमरजित घाटगेहसन मुश्रीफ
२८इस्लामपूरनिशिकांत पाटीलजयंत पाटीलजयंत पाटील
२९तासगाव कवठे महांकाळसंजय पाटीलरोहित पाटीलरोहित पाटील
३०सिंदखेडराजामनोज कायंडेराजेंद्र शिंगणेमनोज कायंडे
३१मोर्शीदेवेंद्र भुयारगिरीश कराळेभाजपा उमेदवार विजयी
३२तुमसरराजू कारेमोरेचरण वाघमारेराजू कारेमोरे
३३अहेरीधर्मरावबाबा आत्रामभाग्यश्री आत्रामधर्मरावबाबा आत्राम
३४पुसदइंद्रनील नाईकशरद मैंदइंद्रनील नाईक
३५वसमतराजू नवघरेजयप्रकाश दांडेगावकरराजू नवघरे
३६येवलाछगन भुजबळमाणिकराव शिंदेछगन भुजबळ
३७सिन्नरमाणिकराव कोकाटेउदय सांगळेमाणिकराव कोकाटे
३८दिंडोरीनरहरी झिरवळसुनीता चारोसकरनरहरी झिरवळ
३९शहापूरदौलत दरोडापांडुरंग बरोरादौलत दरोडा
४०मुंब्रा कळवानजीब मुल्लाजितेंद्र आव्हाडजितेंद्र आव्हाड

अजित पवार शरद पवारांच्या विरोधात ४० मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. यापैकी ३० जागांवर त्यांचा उमेदवार निवडून आलेला आहे. तर ७ मतदारसंघात शरद वार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर तीन मतदारसंघात दोन्ही गट वगळून तिसऱ्याच उमेदवाराचा विजय झाला आहे.

All Candidate Winner List – महाराष्ट्रातील विजयी उमेदवारांची यादी 

BJP Winner Candidate List – भाजपाच्या विजयी उमेदवारांची यादी  

Congress Winner Candidate List – काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी  

Shivsena Eknath Shinde Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी h

Shivsena Uddhav Thackeray Winner Candidate List – शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Ajit Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

NCP Sharad Chandra Pawar Winner Candidate List – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

Shivsena Ekantha Shinde vs Shivsena Uddhav Thcakeary Winner Candidate List – शिवसेना एकनाथ शिंदे वि शिवसेना उद्धव  ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांची यादी 

BJP vs Congress Winner Candidate List – भाजपा वि काँग्रेस गटाच्या विजयी उमेदवारांची यादी

Mahayuti vs Maha Vikas Agahdi Winner Candidate List – महायुती वि महा विकास आघाडी विजयी उमेदवारांची यादी  

Story img Loader