सांगली : ‘लाडकी बहीण’साठी सरकारने तिजोरी रिकामी केली असून रिझर्व्ह बँकेकडे सव्वा लाख कोटींच्या कर्जाची मागणी करावी लागली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले. रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते बी.डी.पवार, दिलीपराव मोरे, ‘राजारामबापू’चे संचालक दादासाहेब मोरे, कृष्णेचे संचालक जे. डी. मोरे, माजी संचालक सुजित मोरे, अविनाश मोरे, माजी जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे, सरपंच शुभांगी बिरमुळे, सुहास पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुनिता देशमाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते. आ.पाटील म्हणाले, की सरकारने लोकप्रियतेसाठी अनेक घोषणा केल्याने सध्या तिजोरीवर ताण पडत आहे.

Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
supriya sule on devendra fadnavis
“देवेंद्र फडणवीसांविरोधात आता खटला भरला पाहिजे, त्यांनी राज्यातील…”; छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल!

हेही वाचा >>> बार्शीत राजेंद्र राऊत – सोपल गटात गोंधळ; दोन्ही गटांचे आरोप-प्रत्यारोप, तणाव

अगोदरच राज्यावर पावणे आठ लाख कोटींचे कर्ज आहे. पुन्हा सव्वा लाख कोटींचे कर्ज मागणी केली आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक माणसावर ६५-७० हजार रुपयांचे कर्ज होणार आहे. मतदारसंघातील विरोधक माझ्या विरुध्द बोलण्यास काहीच नसल्याने ऊसदराचा प्रश्न काढत आहेत. मात्र, आपला कारखाना राज्यात चांगला चालू असलेला कारखाना आहे. यामुळे या विरोधकांच्या टीकेवर मतदार विश्वास ठेवणार नाही.

ॲड. विवेकानंद मोरे यांनी स्वागत केले. महेश पवार यांनी आभार मानले.

Story img Loader