पश्चिम महाराष्ट्राच्या सहकार- साखर पट्ट्यातील प्रभुत्वाच्या आधारे राज्यात राज्याचा सत्ताशकट हाकण्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा रिवाज या वेळच्या विधानसभा निवडणुकीत मोडीत निघाला. कोल्हापूर, सांगली, सातारा या बागायती पट्ट्यात आता पट्ट्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची वहिवाट मोडीत निघाली असून भगव्याची दुलई सर्वदूर पसरली आहे. या लाटेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील, माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे, रामराजे कुपेकर अशा बड्या नेत्यांना जबर धक्का बसला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी मतदारसंघ ग्रामीण आहेत. ऊस- दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा भाव, शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक शेतीवर येणारे गंडांतर, ग्रामीण भागातील बेरोजगारी, औद्याोगिक वसाहतींमध्ये बड्या उद्याोगांच्या आगमनाची प्रतीक्षा, महापूर – पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवणे, पश्चिम भागातील दुष्काळी छाया आदी प्रश्न सामान्यांना सतावणारे आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचारात उल्लेख करणे महायुती आणि महाविकास आघाडीला भाग पडले.
हेच मुद्दे महाविकास आघाडीने तापवत ठेवले. महायुतीने कधी दीर्घकालीन तर कधी कामापुरते नियोजन करत तापलेली हवा थंड करण्याची नीती अवलंबली. ऊस – साखर उद्याोगाला केंद्राच्या माध्यमातून दिलेल्या भरघोस सवलती – मदतीचा पाढा वाचला. उसाच्या एफआरपीमध्ये केली जात असलेली वाढ उत्पादकात बिंबवली. कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याची अधिसूचना काढली. प्रकल्प लादणार नाही अशी सबुरीचा भूमिका घेतली. महापूर, पावसाचे पाणी वळवण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करून शासन काही करते आहे याचा आभास केला. मुख्यमंत्री या भागातील असल्याने त्यांची सहज उपलब्धता, योजना – निधी मंजूर करण्यातही तत्परता याचा महायुतीला मोठाच लाभ झाला.
हेही वाचा >>>VIDEO : कोल्हापुरात आमदाराच्या विजयी मिरवणुकीवेळी आगीचा भडका, गुलाल उधळताना दुर्घटना, काही महिला जखमी
ऐरणीवरचे विषय अलवारपणे हाताळण्यात महायुतीला यश आले असले तरी दाखवलेली स्वप्ने पुरी करणे हे कडवे आव्हान असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या निराकरणासाठी चार हजार कोटी ओतावे लागणार आहेत. वर उल्लेख केलेल्या योजनांसाठी असाच कोट्यवधीचा निधी गरजेचा आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील नाराजीची निरगाठ खुबीने सोडवावी लागेल. १५ वर्षे रखडलेला कोल्हापूर – सांगली मार्ग, कराड – कोल्हापूर मार्गाची रखडपट्टी, आयटी पार्क उभारणी यांसारख्या विकासकामांना गती देताना नेतृत्वाचा कस लागणार आहे.
हेही वाचा >>>सांगलीत दिग्गज नेते निकालाने जमिनीवर !
या वेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारंपरिक पोत पूर्णत: बदलला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याची राजकीय प्रकृती फुले, शाहू आंबेडकर विचारांवर पोसली गेलेली पुरोगामी विचारांची राहिली आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, एन. डी. पाटील प्रभृतींच्या विचारांचा जनमानसावर परिणाम राहिला आहे. नवी पिढी मात्र हिंदुत्व, धर्म यांना अधिक महत्त्व देताना दिसत आहे. हेच हेरून या भागात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार केला. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, व्होट जिहादला प्रतिउत्तर धर्मयुद्धाचे अशी अत्यंत आक्रमक मांडणी केली. परिणामी नवी पिढी महायुतीकडे सरकली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या छायेत असलेला उसाचा सुपीक पट्टा महायुतीच्या प्रभावाखाली आला आहे. २००९ साली मिरज येथे दंगल झाली होती. तेव्हा भाजप- शिवसेनेने आक्रमक हिंदुत्वाचा गजर करीत काँग्रेस, राष्ट्रवादीकडे असलेले पाच पारंपरिक मतदारसंघ युतीच्या तंबूत आणले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा महायुतीच्या अशा पद्धतीच्या प्रचाराला यश आले आहे. कोल्हापूरमध्ये दोन वर्षांपूर्वी घडलेली जातीय दंगल, विशाळगड येथील अतिक्रमण, त्यानंतर उसळलेली दंगल, प्रतापगड येथील औरंजेबाच्या कबर अतिक्रमणाचे उच्चाटन यांसारख्या घटनांच्या माध्यमातून हिंदुत्ववादी संघटनांनी बीजारोपण केले आणि भाजपने या निवडणुकीत त्या आधारे मतांच्या राशी जमवल्या. कृष्णाकाठ पूर्वीसारखा राहिला नाही हेच खरे.
dayanand.lipare@expressindia.com