Maharashtra Exit Poll Updates: लोकसभा निवडणुका संपल्यापासूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. लोकसभेतील निकालांमुळे राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली होती. सत्ताधाऱ्यांनी सत्ता राखण्यासाठी तर विरोधकांनी लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना अधिकच मागे रेटण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. आज या तयारीचा शेवटचा दिवस असून राज्यभरात मतदारराजा पुढील पाच वर्षं राजकीय पटलावर वावरणाऱ्या आपल्या नेतेमंडळींचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त करणार आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Assembly Election Exit Poll Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सर्व अपडेट्स…

15:05 (IST) 20 Nov 2024

९५ वर्षांच्या आजोबांनी बजावला मतदानाचा हक्क

गोंदिया येथे एका ९५ वर्षीय ( 95 Year Old Voter ) आजोबांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी तरुणाईलाही लाजवेल असा उत्साह त्या आजोबांमधे बघायला मिळाला. तरुणांनी मतदान करून लोकशाहीला बळकट करावे असे आवाहन लक्ष्मण बेडेकर या ९५ वर्षीय आजोबांनी केले आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचा उत्सव पार पडतो आहे. खरंतर सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहमतदानाची सोय केली होती. मात्र आपण बूथवर जाऊन मतदान करणार असं लक्ष्मण बेडेकर ( 95 Year Old Voter ) यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं. तसंच ते त्यांचा मुलगा प्रसाद बेडेकर यांच्यासह मतदान करायला केंद्रावर आले होते.

14:56 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यातील ४५ हजारांवर गोवारी मतदारांचा मतदानावर बहिष्कार; कारण…

भंडारा : गोवारी समाजाला अनुसचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे याकरिता गोवारी समाजाचा लढा सुरू असून या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा समाजाच्या वतीने आधीच देण्यात आला होता.

सविस्तर वाचा…

14:12 (IST) 20 Nov 2024

सेवाग्राम आश्रमचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ गांधीवादी, सर्वोदयी विचारवंत ऍड. मा. म. गडकरी यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

14:05 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Voting Percentage Live: महाराष्ट्रात दुपारी १ पर्यंत ३२.१८ टक्के मतदान

सध्यापर्यंत अंदाजे मतदार सहभाग 32.18% आहे.

जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे आहे-

अहमदनगर-32.90%

अकोला-29.87%

अमरावती-31.32%

छत्रपती संभाजीनगर-33.89%

बीड-32.58%

भंडारा-35.06%

बुलढाणा-32.91%

चंद्रपूर-35.54%

धुळे-34.05%

गडचिरोली-50.89%

गोंदिया-40.46%

हिंगोली-35.97%

जळगाव-27.88%

जालना-36.42%

कोल्हापूर-38.56%

लातूर-33.27%

मुंबई शहर-27.73%

मुंबई उपनगर-30.43%

नागपूर-31.65%

नांदेड-28.15%

नंदुरबार-37.40%

नाशिक-32.30%

उस्मानाबाद-31.75%

पालघर-33.40%

परभणी-33.12%

पुणे-29.03%

रायगड-34.84%

रत्नागिरी-38.52%

सांगली-33.50%

सातारा-34.78%

सिंधुदुर्ग-38.34%

सोलापूर-29.44%

ठाणे-28.35%

वर्धा-34.55%

वाशीम-29.31%

यवतमाळ-34.10%.

13:58 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: शर्मिला ठाकरेंचं अमित ठाकरेंबाबत विधान…

आम्ही कुणालाही अर्ज मागे घ्यायला सांगितलेलं नाही. उलट आमच्याकडे शेवटच्या दिवशी अर्ज माघारीसंदर्भात भेटी घेण्यासाठी लोक आले होते. आम्ही कुणालाही भेटलो नाही. मला अभिमान आहे की माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल. मला अमित ठाकरेंच्या विजयाचा १०० टक्के विश्वास आहे. मी लोकांना आवाहन करेन की तुम्ही बाहेर पडून मतदान करा. लोक अमितला नक्की जिंकून देतील. पण मला मोठा विजय हवाय, थोडासा नकोय – शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांच्या आई

13:57 (IST) 20 Nov 2024

चंद्रपूर :चिमूरमध्ये सर्वाधिक ४१.०४ टक्के, तर चंद्रपुरात सर्वात कमी २९.०३ टक्के मतदान

चंद्रपूर : दुपारी १ वाजतापर्यंत चिमुरमध्ये सर्वाधिक तर चंद्रपुरात सर्वात कमी मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा मतदारसंघात आज (दि. २० नोव्हेंबर) बुधवारी सकाळी ७ वाजतापासून मतदान सुरू झाले. शहरी मतदारांमध्ये उत्साह कमी तर ग्रामीण मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. ग्रामीण भागात मतदानासाठी मतदान केंद्रावर गर्दी दिसत आहे. शहरी भागातील सिव्हिल परिसरातील केंद्र ओस पडलेले आहेत. दुपारी १ वाजतापर्यंत राजुरा मतदारसंघात ३७.३२ टक्के मतदान झाले . चंद्रपूरमध्ये २९.३ टक्के, बल्लारपूरमध्ये ३५.४१ टक्के, ब्रह्मपुरीमध्ये ३९.९१ टक्के, चिमुरमध्ये ४१.०४ टक्के मतदान झाले आहे . वरोरा मतदारसंघात ३२.२४ टक्के मतदान झाले आहे .

13:54 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळच्या सत्रात नागपूरकरांचे उत्साहपूर्ण मतदान, ७५ टक्के मतदानाकडे वाटचाल?

नागपूर : दर निव़डणुकीत निरुत्साह दाखविणाऱ्या नागपूरकरांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची सुरूवात अतिशय उत्साहपूर्ण केली.

सविस्तर वाचा…

13:44 (IST) 20 Nov 2024

नंदुरबार जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघातील १ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी

अक्कलकुवा विधानसभा – ३४.०० टक्के

शहादा विधानसभा – ४०.४५ टक्के

नंदुरबार विधानसभा – ३३.०० टक्के

नवापूर विधानसभा – ४२.७१ टक्के

13:36 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : यवतमाळात अल्पवयीन मुलांद्वारे बुथवर भाजप उमेदवारांचा प्रचार!

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी आज बुधवारी सकाळी मतदानास उत्साहात प्रारंभ झाला. मात्र काही मतदान केंद्रांवर पक्षाद्वारे उभारण्यात आलेल्या बुथवर उमेदवारांचा उघड प्रचार होत असल्याचे निदर्शनास आले.

सविस्तर वाचा…

13:15 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदानाचा टक्का वाढेल, फडणवीसांना विश्वास, कुटुंबासोबत केले मतदान

नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका शाळा, डीग दवाखाना, धरमपेठ, नागपूर येथे मतदानाचा हक्क बजावला. ते सकाळी साडेदहाच्या सुमारास आई आणि पत्नी सोबत मतदान केंद्रावर पोहोचले.

सविस्तर वाचा…

12:53 (IST) 20 Nov 2024

Worli Vidhan Sabha Constituency Voting Live: वरळीत राज ठाकरेंच्या खोट्या सहीचं पत्र दाखवणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांनी हटकलं!

शिंदे गटाला मनसेचा पाठिंबा असल्याचं राज ठाकरेंच्या खोट्या सहीचं पत्र दाखवणाऱ्या एका व्यक्तीला वरळीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी हटकल्यानंतर त्याला केंद्रापासून दूर नेण्यात आलं.

12:49 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: बारामतीमध्ये बोगस मतदान? युगेंद्र पवार यांच्या आईचा मोठा दावा!

माझ्यासमोर एका व्यक्तीनं मतदान केंद्रावर दमदाटी केली. तो जणूकाही स्वत:च्या घरचं लग्न असल्यासारखं या, बसा वगैरे सांगत होता. खाणाखुणा करून मतदारांशी बोलत होता. काय संकेत देत होता माहिती नाही. आम्ही आक्षेप घेतला आणि असं न करण्याची विनंती केली. आमचा मोहसीन त्यांना तेच सांगत होता. पण त्याला त्यांनी धमकी दिली. मग पोलिसांनी त्यांना लगेच बाहेर काढलं. पोलिसांचं सहकार्य होतं. मग मी बाहेर आले. तिथे गेटच्या बाहेर आतल्या व्यक्तीचा मोठा भाऊ म्हणाला, “तुला मी बघून घेईन”.. ते कुणाचे कार्यकर्ते होते माहिती नाही, पण नक्कीच घड्याळाचे होते हे मी सांगू शकते. मी याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देत आहोत. आता ते सीसीटीव्ही फूटेज डिलीटही केलं जाण्याची भीती आम्हाला वाटत आहे – युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांचा आरोप

12:40 (IST) 20 Nov 2024

जळगाव जिल्ह्यात पहिल्या चार तासात १५.६२ टक्के मतदान

जळगाव : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते ११ वाजेदरम्यान सरासरी १५.६२ टक्के मतदान झाले. रावेरमध्ये सर्वाधिक २०.५० टक्के आणि पाचोऱ्यात सर्वात कमी ८.५३ टक्के मतदानाची नोंद पहिल्या चार तासात झाली आहे.

जळगाव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजेपर्यंत अमळनेरमध्ये १४.० टक्के, भुसावळमध्ये १६.४२ टक्के, चाळीसगावमध्ये १७.९० टक्के, चोपड्यात १४.९० टक्के, एरंडोलमध्ये १४.३९ टक्के, जळगाव शहरात १५.८८ टक्के, जळगाव ग्रामीणमध्ये १७.८३ टक्के, जामनेरमध्ये १५.१३ टक्के, मुक्ताईनगरात १६.१७ टक्के, पाचोऱ्यात ८.५३ टक्के आणि रावेरमध्ये २०.५० टक्के मतदान झाले आहे.

12:28 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : गडकरींचे सहकुटुंब मतदान, म्हणाले ” यंदा विकास…”

नागपूर: नितीन गडकरी यांनी कुटुंबासह महाल येथील महापालिकेच्या टाऊन हॉल येथे मतदान केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उत्तर नागपूरमध्ये दोन तासांपासून ईव्हीएम बंद, त्रस्त होऊन मतदार परतले

नागपूर : उत्तर नागपूर मतदारसंघातील विनयालय शाळा,कस्तुरबा नगर येथील खोली क्रमांक २,बूथ क्रमांक ५९/५७ येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे.

सविस्तर वाचा…

11:59 (IST) 20 Nov 2024
Raj Thackeray on Maharashtra Vidhan Sabha Election: राज ठाकरेंचा फोटो व्हायरल

(इंडियन एक्स्प्रेसचे फोटोग्राफर प्रदीप दास यांनी हा फोटो काढला आहे)

या फोटोला तुम्ही काय कॅप्शन द्याल?

11:53 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अहेरी विधानसभा क्षेत्रातील १११ वर्षीय फुलमती बिनोद सरकार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेत येत असलेल्या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील १११ वर्षीय महिला मतदार फुलमती बिनोद सरकार यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

11:52 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : चंद्रपुरात मतदान संथगतीने, चिमूर मतदारसंघात मात्र सर्वाधिक…

चंद्रपूर :विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील चिमूर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक, तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान होत आहे.

सवि्स्तर वाचा…

11:51 (IST) 20 Nov 2024

Worli Vidhan Sabha Constituency Voting Live: शर्मिला ठाकरेंचं अमित ठाकरेंबाबत मोठं विधान, म्हणाल्या…

आम्ही कुणालाही अर्ज मागे घ्यायला सांगितलेलं नाही. उलट आमच्याकडे शेवटच्या दिवशी अर्ज माघारीसंदर्भात भेटी घेण्यासाठी लोक आले होते. आम्ही कुणालाही भेटलो नाही. मला अभिमान आहे की माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल. मला अमित ठाकरेंच्या विजयाचा १०० टक्के विश्वास आहे. मी लोकांना आवाहन करेन की तुम्ही बाहेर पडून मतदान करा. लोक अमितला नक्की जिंकून देतील. पण मला मोठा विजय हवाय, थोडासा नकोय – शर्मिला ठाकरे, राज ठाकरे यांच्या पत्नी

11:47 (IST) 20 Nov 2024

बाहेरून मतदार आणल्याने कांदे-भुजबळ समर्थकांमध्ये धक्काबुक्की , सुहास कांदे यांच्याकडून समीर भुजबळांना जिवे मारण्याची धमकी

नांदगाव मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे आणि प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यात वाद होऊन तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी कांदे हे भुजबळांच्या अंगावर धावून गेले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले.

वाचा सविस्तर…

11:35 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील 11 वाजेपर्यंत झालेले मतदानाची टक्केवारी

अक्कलकुवा विधानसभा – 19.57 टक्के

शहादा विधानसभा – 24.98 टक्के

नंदुरबार विधानसभा – 18.68टक्के

नवापूर विधानसभा -24.58 टक्के

11:34 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पुन्हा एका उमेदवारावर प्राणघातक हल्ला…दुचाकीवर आलेल्या सात गुंडांनी…

बुलढाणा : स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या पाच ते सात गुंडांनी त्यांची गाडी अडवली व गाडीवर दगडफेक सुरू केली.

सविस्तर वाचा…

11:34 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Voting Percentage Live: महाराष्ट्रात ११ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी आली समोर

सकाळी ११ वाजेपर्यंत महाराष्ट्रात १८.१४ टक्के मतदान झालं आहे. त्यात गडचिरोलीमध्ये सर्वाधिक ३० टक्के मतदान झाल्याचं समोर आलं आहे.

जिल्हानिहाय मतदान टक्केवारी खालीलप्रमाणे आहे-

अहमदनगर-18.24% अकोला-16.35% अमरावती-17.45% छत्रपती संभाजीनगर-18.98% बीड-17.41% भंडारा-19.44% बुलढाणा-19.23% चंद्रपूर-21.50% धुळे-20.11% गडचिरोली-30.00% गोंदिया-23.32% हिंगोली-19.20% जळगाव-15.62% जालना-21.29% कोल्हापूर-20.59% लातूर-18.55% मुंबई शहर-15.78% मुंबई उपनगर-17.99% नागपूर-18.90% नांदेड-13.67% नंदुरबार-21.60% नाशिक-18.71% उस्मानाबाद-17.07% पालघर-19.40% परभणी-18.49% पुणे-15.64% रायगड-20.40% रत्नागिरी-22.93% सांगली-18.55% सातारा-18.72% सिंधुदुर्ग-20.91% सोलापूर-15.64% ठाणे-16.63% वर्धा-18.86% वाशिम-16.22% यवतमाळ-19.38%

11:33 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: महाराष्ट्रात क्रमांक एकच्या मतदार महिलेनं केलं मतदान!

राज्यातली पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता पंकज तडवी यांनी राज्यातला पहिला क्रमांकाचा मतदार बूथ असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील मनीबेली मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी इतरांनाही मतदानाचं आवाहन केलं आहे. “माझं पहिल्या क्रमांकाचं मत आहे. मी मतदान केलं आहे. इतरांनाही मी आवाहन करते की तुम्हीही मतदान करा. मत देणं हा आपला हक्क आहे”, असं त्या म्हणाल्या आहेत.

11:23 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: नेरूळमध्ये एका कारमध्ये इंटरनेट राऊटर्सचा सेटअप आढळला!

नेरूळच्या शिवाजीनगर मतदानकेंद्राजवळ एका कारमध्ये मोठ्या प्रमाणावर इंटरनेट राऊटर्सचा सेटअप आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. यातून काही हॅक करण्याचा प्रयत्न होत होता का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

11:17 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: राज ठाकरेंचं नेत्यांवरील हल्ल्यांवर विधान…

या लोकांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे. त्यातून या सगळ्या गोष्टी होत आहेत. गेल्या निवडणुकीत अमुक नेता कुठे होता, या निवडणुकीत कुठे आहे, त्याआधीच्या निवडणुकीत कुठे होता अशा गोष्टी घडायला लागल्यावर याचा एक राग व्यक्त होणारच आहे – राज ठाकरेंनी नेत्यांच्या गाड्यांवर हल्ले होण्याच्या प्रकारावर केलं भाष्य

11:17 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: राज ठाकरे म्हणाले, “..त्यांना तुम्ही शिक्षा द्यायला पाहिजे”

टक्केवारी वाढली पाहिजे, लोकांनी मतदान केलं पाहिजे. ज्यांनी ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केली आहे, अपमान केला आहे त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

11:05 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: नांदगामध्ये कांदे-भुजबळ समर्थक भिडले

नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघात सुहास कांदे व समीर भुजबळ या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं. सुहास कांदेंच्या समर्थकांनी काही मतदारांना बाहेरून आणल्याचा आरोप करत भुजबळ समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. यानंतर सुहास कांदेंनी समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचंही सांगितलं जात आहे.

11:04 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: राजुरा: ६० लाखाची रोकड जप्त

चंद्रपूर: प्राप्त तक्रारीनुसार राजुरा विधानसभा मतदार संघातील गडचांदूर येथे फ्लाईंग सर्वेलन्स टीमने कारवाई करून ६० लाख रुपयांची रक्कम व इतर प्रचार साहित्य जप्त केले आहे. निवडणूक विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढील कारवाई सुरू आहे.

11:02 (IST) 20 Nov 2024

मालेगावात दोन ठिकाणी मतदार यंत्रात दोष

मालेगाव : मालेगाव बाह्य मतदार संघातील या.ना.जाधव विद्यालय व निळगव्हाण प्राथमिक शाळा अशा दोन केंद्रांमधील मतदान यंत्रे नादुरुस्त झाल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही काळ ताटकळत बसावे लागले.

सविस्तर वाचा…

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महानगरांमध्ये मतटक्का वाढणार? (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

Maharashtra Assembly Election Voting Updates, 20 November 2024: महाराष्ट्रातील महासंग्रामाची सांगता.. जनतेचा कौल नेमका कुणाच्या पारड्यात पडणार?