Maharashtra Exit Poll Updates: लोकसभा निवडणुका संपल्यापासूनच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. लोकसभेतील निकालांमुळे राज्यातील सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसली होती. सत्ताधाऱ्यांनी सत्ता राखण्यासाठी तर विरोधकांनी लोकसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांना अधिकच मागे रेटण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. आज या तयारीचा शेवटचा दिवस असून राज्यभरात मतदारराजा पुढील पाच वर्षं राजकीय पटलावर वावरणाऱ्या आपल्या नेतेमंडळींचं भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये बंदिस्त करणार आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Assembly Election Exit Poll Updates: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा सर्व अपडेट्स…

10:56 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Voting Live: राज ठाकरेंची मतदानानंतर प्रतिक्रिया

निवडणुकीत भयंकर प्रकार बघायला मिळत आहेत. मी आधीच सांगितलं होतं की या निवडणुकीत खूप गोंधळ होतील. विचित्र गोष्टींचे वापर होतील. त्याप्रमाणे ते होतेय. कुणालाच कशाचाच अंदाज येत नाहीये. असे प्रकार करून काही होणार नाहीये आता. ती वेळ निघून गेली आहे. जी काही बाकीच्यांनी माती खायची होती ती ५ वर्षांत खाल्लेली आहे. लोक या प्रकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही. पैशांचा वापर होतच होता, पण सध्या खूप उघडपणे होतोय – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

10:43 (IST) 20 Nov 2024
राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या मतदार रविता पंकज तडवीने मनीबेली मतदान केंद्रावर मतदान केले.

राज्यातली पहिल्या क्रमांकाची मतदार रविता पंकज तडवी हिने राज्यातला पहिला क्रमांकाचा मतदार बूथ असलेल्या मनीबेली मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला आहे.

10:36 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नाशिक शहरात मतदान केंद्र बदलल्याने गोंधळ, जिल्ह्यात दोन तासांत ६.९३ टक्के मतदान

नाशिक : शहरातील कॉलेज रोड, गंगापूर रोडसह अनेक भागात सकाळपासून रांगा लागल्या होत्या. शहरात काही मतदारांनी केंद्र बदलल्याच्या तक्रारी केल्या. कुटुंबातील एका सदस्याचे नाव जवळच्या केंद्रावर तर, दुसऱ्यांची नावे दुरवरील केंद्रावर गेल्याचे सांगितले जाते.

सवि्स्तर वाचा…

10:20 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : नंदुरबार जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील 9 वाजेपर्यंत झालेले मतदानाची टक्केवारी

अक्कलकुवा विधानसभा – 6.52 टक्के

शहादा विधानसभा – 10.18 टक्के

नंदुरबार विधानसभा – 6 टक्के

नवापूर विधानसभा – 6.52 टक्के

10:14 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :नागपुरातील नाईक तलाव जवळ ईव्हीएम बंद, मतदारांची दमछाक

नागपूर : मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात दोन मतदान केंद्रात काही ईव्हीएम यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाला.

सविस्तर वाचा…

09:48 (IST) 20 Nov 2024

Belapur Assembly Constituency voting live: मंदा म्हात्रे यांचे कुटुंबियांसह मतदान

बेलापूर विधानसभा भाजपाच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांनी कुटुंबियांसह मतदान हक्क बजावला

09:41 (IST) 20 Nov 2024
Belapur Assembly Constituency voting live: संदीप नाईक यांनी बजावला मतदान हक्क

बेलापूर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) उमेदवार संदीप नाईक यांनी मतदान हक्क बजावला

09:35 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Poll Percentage Updates Live: पहिल्या २ तासांत ६.६१ टक्के मतदान

महाराष्ट्रातील मतदानाची पहिली टक्केवारी समोर आली असून पहिल्या दोन तासांत अर्थात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान राज्यभरात झाल्याची माहिती आहे.

09:31 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: बीडमध्ये बोगस मतदानाचा प्रकार? CCTV चं कनेक्शन काढून मतदान होत असल्याचा दावा!

बीडच्या परळीमध्ये बोगस मतदान? व्हिडीओ व्हायरल, शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्याकडून आक्षेप, सीसीटीव्हीचं कनेक्शनच गायब!

09:27 (IST) 20 Nov 2024

Mumbai Vidhan Sabha Constituency Voting Live: मुंबईतील मतदान केंद्रांवर मतदानासाठी गर्दी

मुंबईतील मतदान केंद्रांवर मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेले नागरिक आणि कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत.

09:16 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: रोहित पवारांच्या नावे बनावट पोल? स्वत: पोस्ट करत केला दावा

‘आमदार प्रा. राम शिंदे समर्थक’ या नावाच्या व्हाटसॲप चॅनलवरून माझ्या विरोधकांकडून TV 9 मराठी आणि ABP माझा या वृत्तवाहिनीच्या नावाने बनावट पोल, बनावट आणि बदनामीकारक बातम्या पसरवल्या जात आहेत. याबाबत TV 9 मराठी आणि ABP माझा या दोन्ही वाहिन्यांनी तत्काळ खुलासा करावा आणि अशा प्रकारे फेक न्यूज आणि फेक पोल करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, ही विनंती! – रोहित पवार
https://twitter.com/RRPSpeaks/status/1859078962443678022

09:12 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Constituency Voting Live: शरद पवारांचं मोठं विधान, म्हणाले…

२३ तारखेनंतर महाराष्ट्रात काय चित्र असेल? असा प्रश्न विचारला असता शरद पवारांनी ‘इथे सत्तापरिवर्तन होईल’, असं विधान केलं आहे.

09:11 (IST) 20 Nov 2024

Mahim Vidhan Sabha Constituency Voting Live: अमित ठाकरे मतदानानंतर म्हणाले…

राज ठाकरे यांचे पुत्र व माहीम विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार अमित ठाकरे यांनी मतदानानंतर माध्यमांशी संवाद साधला..

09:07 (IST) 20 Nov 2024

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे सहपरिवारसहित लोणी गावी मतदान

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सहपरिवार राहाता तालुक्यातील लोणी या गावी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, शालिनी विखे, माजी खा. डॉ. सुजय विखे

09:04 (IST) 20 Nov 2024

बाळासाहेब थोरात यांनी जोर्वे गावी केले मतदान

काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या जोर्वे या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला. जोर्वे गाव संगमनेर तालुक्यात असले तरी विधानसभेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या शिर्डी मतदारसंघात आहे. यावेळी त्यांच्या पत्नी कांचनताई थोरात, कन्या डॉ. जयश्री थोरात त्यांच्या समावेत होत्या.

09:02 (IST) 20 Nov 2024

Kasba Assembly Constituency voting live: कसबा विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

कसबा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर यांनी कमला नेहरू विद्यालय येथे मतदान केले.तर मतदान करण्यापुर्वी त्यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले.

08:58 (IST) 20 Nov 2024
Mumbai Vidhan Sabha Constituency Voting Live: झिशान सिद्दिकींची बाबा सिद्गिकींबाबत भावनिक प्रतिक्रिया

मी पहिल्यांदाच मतदानासाठी एकटा आलो आहे. माझे वडील आता हयात नाहीत. हे सगळं जरा वेगळं आहे, पण ते करायलाच हवं. मला माहिती आहे की माझे वडील कायम माझ्यासोबतच असतील – झिशान सिद्दिकी

08:54 (IST) 20 Nov 2024

Ajit Pawar on viral audio clip: अजित पवारांचं व्हायरल ऑडिओ क्लिपवर भाष्य

जी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे, त्याबाबत मी एवढंच सांगेन की मी दोघांनाही चांगलं ओळखतो. एकतर माझ्या कुटुंबातली माझी बहीण आहे आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत मी अनेक वर्षं काम केलं आहे. त्यामुळे त्यांचे आवाज, त्यांचे बोलण्याचे टोन तेच आहेत. आता त्यावर चौकशी होईल तेव्हा कळेल.

08:43 (IST) 20 Nov 2024

Thane Vidhan Sabha Constituency Voting live : ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे उम्मेदवार संजय केळकर यांनी केले मतदान

ठाणे शहर विधानसभेचे भाजपचे उम्मेदवार संजय केळकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी तीन हात नाका येथील वन विभाग कार्यालयाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर कुटुंबासह मतदान केले.

08:42 (IST) 20 Nov 2024
Mumbai Vidhan Sabha Constituency Voting Live: मास्टर ब्लास्टरचा राज्याच्या जनतेला संदेश…

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेसाठी त्यानं एक संदेश दिला आहे…

08:40 (IST) 20 Nov 2024

Rajura Vidhan Sabha Constituency Voting Live : कोरपना येथे १२ लाखाची रोकड जप्त

चंद्रपूर:राजुरा विधानसभा मतदार संघात एफएसटी टीम कोरपना यांनी सुमारे 12 लाखांची रोकड जप्त केली आहे. आयटी नोडलला कळवण्यात आले, त्यांची टीम गडचांदूर येथे पोहोचली असून एसओपीनुसार आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.

08:35 (IST) 20 Nov 2024
Mumbai Vidhan Sabha Constituency Voting Live: मुख्य निवडणूक आयुक्तांनी बजावला मतदानाचा हक्क!

महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोकलिंगम यांनी कुलाबा मतदारसंघातील सचिवालय जिमखाना मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला

08:31 (IST) 20 Nov 2024

Akshay Kumar Voting Live: अभिनेता अक्षय कुमारनं केलं मतदान

अभिनेता अक्षय कुमारनं मुंबईत केलं मतदान, मतदानानंतर माध्यमांशी साधला संवाद…

08:19 (IST) 20 Nov 2024
Maharashtra Vidhan Sabha Voting Live: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं महाराष्ट्रातील मतदारांना आवाहन

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. राज्याच्या मतदारांना माझी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही मोठ्या उत्साहाने या प्रक्रियेचा भाग व्हा आणि लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवा. यावेळी सर्व तरुण व महिलां मतदारांना माझं आवाहन आहे की तुम्ही मोठ्या संख्येनं मतदानासाठी घराबाहेर पडा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

08:17 (IST) 20 Nov 2024

Mumbai Vidhan Sabha Constituency Voting Live: मुंबईतून १७५ कोटींचा मुद्देमाल जप्त

विधानसभा निवडणुकीनिमित्त आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत रोख रक्कम, मूल्यवान धातू, दारू, अंमली पदार्थ इत्यादी सुमारे १७५ कोटी रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विविध कायद्याअंतर्गत मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक पार पाडण्याकरीता एकूण ४४९२ जणांवर प्रभावीपणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये आदेश जारी करण्यात आले असून मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिघात (मतदान केंद्र परिसर) व अन्यथा नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी मदतीसाठी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य नियंत्रण कक्षातील मदत क्रमांक १००, १०३, ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर

08:16 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: मोबाईल वापरण्यास बंदी का?

मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मनाई असल्याचे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या प्रत्येक निर्देशाची अमलबजावणी काटेकोरपणे होईल. त्याबाबत सर्व पोलिसांना सूचना करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करणे, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करणे, तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

वाचा सविस्तर

08:16 (IST) 20 Nov 2024

Mumbai Vidhan Sabha Constituency Voting Live: मतदान केंद्रालगत मोबाईल नेण्यास बंदी

मतदान केंद्रालगतच्या १०० मीटर परिसरात मोबाइल अथवा वायरलेस यंत्रणा, तसेच परिसरात बॅनर, ध्वनीक्षेपक, मेगोफोनचा वापर करण्यास बंदी आहे. याशिवाय मतदान केंद्र, परिसरात मतदार व निवडणूक आयोगाचे अधिकारी वगळता इतर कोणतीही व्यक्ती घुटमळणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. तसे करताना आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

वाचा सविस्तर

08:15 (IST) 20 Nov 2024

Mumbai Vidhan Sabha Constituency Voting Live: मुंबईत मोठा पोलीस फौजफाटा!

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून मुंबई पोलीस दलाने पाच अपर पोलीस आयुक्त, २० पोलीस उप आयुक्त, ८३ सहायक पोलीस आयुक्त यांच्यासह दोन हजारांहून अधिक पोलीस अधिकारी व २५ हजारांहून अधिक पोलीस अंमलदार, ०३ दंगल नियंत्रण पथके असा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक विभागामार्फत स्वतंत्रपणे १४४ अधिकारी व एक हजाराहून अधिक पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत चार हजारांहून अधिक गृहरक्षक दलाचे जवानांना तैनात करण्यात आले आहे. याशिवाय महत्त्वाच्या ठिकाणी २६ केंद्रीय सुरक्षा दले / राज्य सुरक्षा दले यांची निवडणूक कामासाठी नेमणूक करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर

08:13 (IST) 20 Nov 2024

Mumbai Assembly Election Voting Live: मतदानासाठी मुंबईत ३० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिकठिकाणी बुधवार, २० नोव्हेंबर रोजी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३० हजारांहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. साडेचार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर

08:12 (IST) 20 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Voting Live: मुंबई : मतदान प्रक्रियेचे यंदा शंभर टक्के वेब कास्टिंग

विधानसभा निवडणुकीसाठी यंदा विशेष काळजी घेण्यात आली असून सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी १०० टक्के वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महानगरांमध्ये मतटक्का वाढणार? (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

Maharashtra Assembly Election Voting Updates, 20 November 2024: महाराष्ट्रातील महासंग्रामाची सांगता.. जनतेचा कौल नेमका कुणाच्या पारड्यात पडणार?