Maharashtra New CM : महाराष्ट्रात महायुतीला रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. निकाल २३ नोव्हेंबरला लागला आहे. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदेही रेसमध्ये आहेत अशा चर्चा होत्या. शिवसैनिकांनीही मुख्यमंत्रिपद पुन्हा शिवसेनेला मिळावं अशी मागणी केल्याच्या चर्चा झाल्या. मात्र एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह जे नाव जाहीर करतील त्या नावाला आमचा पाठिंबा असेल असं त्यांनी म्हटलं आहे. आता दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? हे स्पष्ट होण्याची चिन्हं आहेत. या आणि अशा सगळ्या घडामोडींवर आपली नजर लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमांतून असणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Breaking News Live Updates | महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं नाव आज जाहीर होणार? यासह महत्त्वाच्या बातम्या
दीड हजार वर्षापूर्वीच्या मंदिरांचा कायापालट… गुळाच्या लेपातून कसे सुरू आहे काम ?
राज्यातील पुरातन मंदिरांचे जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीने हाती घेण्यात आलेल्या तीन मंदिरांचा जीर्णोद्धार अंतिम टप्प्यात आहे. धूतपापेश्वर (राजापूर- रत्नागिरी), खंडोबा मंदिर (छत्रपती संभाजीनगर) आणि पुरुषोत्तम पुरी (माजलगाव-बीड) मंदिरांचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. सविस्तर वाचा…
‘ईव्हीएम’विरोधात आता न्यायालयात धाव ‘हे’ आहे कारण !
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आले असताना, पुण्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप करून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सविस्तर वाचा…
१३२ आमदार निवडून आल्यानंतर भाजपाचा मुख्यमंत्री होणं ही एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा सगळ्यांना वाटत होतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेबाहेर राहून काम करेन असं सांगितलं होतं. पण त्यांना दिल्लीतून आदेश आला की तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा आदेश मानला. महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यामुळे बाकीचे प्रश्न निर्माण होत नाही. मागासवर्गीय आणि ओबीसी यांच्या अधिकारांवर गदा येऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं. शक्ती मागे उभं केली आहे. त्यामुळे त्यांना काही लोक टार्गेट करत आहेत. याचं कारण तेच आहे असं छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.तर अजित पवार यांनी ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होईल असं म्हटलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगळ्या पक्षातील नेत्यांच्या मैत्रीचे पर्व
अवघ्या सहा महिन्याच्या अंतराने झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया व वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मैत्रीचे पर्व अनुभवायला मिळाले आहे.
अलिबागचा पांढरा कांदा यंदा उशिरा; पाऊस लांबल्याने, लागवड रखडली.
अलिबागच्या पांढऱ्या कांद्याची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. भात कापणी झाल्यानंतर शेतात पांढरा कांदा लावला जातो. यंदा पाऊस उशिरापर्यंत पर्यंत पडला. त्यामुळे कांद्याची लागवड थोड्या उशिराने सुरू झाली. त्यामुळे यंदा अलिबागचा पांढरा कांदा बाजारात उशिरा होणार आहे.सविस्तर वाचा…
रायगडमध्ये ५४ उमेदवारांची अनामत जप्त; मनसे, बसपा.वंचित सह अपक्ष उमेदवारांचा समावेश
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा ५४ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात मनसे, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
एप्रिल २०२५ मध्ये नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू होण्याच्या हालचाली सिडको मंडळ आणि अदानी इंटरप्रायजेस कंपनीमध्ये युद्धपातळीवर सुरू झाल्या असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.
सोलापुरात विजय देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टींची मंत्रिपदासाठी चर्चा
राज्यात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार, याची सार्वत्रिक उत्सुकता असताना संभाव्य मंत्रिमंडळात सोलापुरातून भाजपला दोन मंत्रिपदे मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकीय वर्तुळात तसा अंदाजही वर्तविला जात आहे.
संजय पाटील खून प्रकरण : पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांची अटक बेकायदा; उच्च न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र केसरी संजय पाटील-आटकेकर यांच्या खून प्रकरणातील तपासी अधिकारी संभाजी पाटील यांच्यावर करण्यात आलेली अटकेची कारवाई बेकायदा असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट करताना, याप्रकरणी संभाजी पाटील यांना महाराष्ट्र शासन व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दोन लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेशही दिला. सविस्तर वाचा…
राज्यघटनेचा संस्कृत अनुवाद राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित; प्रकल्पामध्ये दोघा पुणेकरांचा सहभाग
राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यघटनेच्या संस्कृत अनुवादाचे प्रकाशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले. या अनुवाद प्रकल्पामध्ये भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे श्रीनंद बापट आणि डेक्कन कॉलेजचे भव शर्मा या दोन पुणेकरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सविस्तर वाचा…
पोलिसांचा ३५ हजार वाहनचालकांवर दंडुका; विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई
वाहतूक नियम धुडकाविणाऱ्या बेशिस्तांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या ३५ हजारांंहून जास्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली आहे. सविस्तर वाचा…
पुणेकरांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले… पालकमंत्र्यांची प्रतीक्षा
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने, तसेच राज्याच्या मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याने पुण्यातील पाणी पुरवठा नियोजन रखडले आहे. पुढील वर्षातील पाणीपुरवठा नियोजनासंर्दभात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक अद्याप झालेली नाही. सविस्तर वाचा…
युद्धभूमी आता पर्यटकांसाठी खुली; काय आहे लष्कराची योजना?
‘जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद ते पर्यटन असा बदल झाला आहे. देशाच्या सीमावर्ती भागातील ४८ ठिकाणे पर्यटनासाठी प्रचार करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने साहसी खेळ, गिर्यारोहण, ट्रेकिंग अशा उप्रक्रमांना प्रोत्साहन देण्यात येत असून, सियाचिन, गलवान, कारगिल युद्धभूमी पर्यटकांना खुली करण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…
‘गुंफण’च्या संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे
कराड : गुंफण अकादमीतर्फे महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील खानापूरमध्ये (जि. बेळगाव) आयोजित २० व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांची निवड झाल्याची माहिती गुंफण अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी दिली.
डॉ. चेणगे म्हणाले, गुंफण अकादमी गेली दोन दशके महाराष्ट्र, गोवा तसेच कर्नाटकातील सीमा भागात मराठी भाषकांमधील मायमराठीविषयीच्या जाज्वल्य अस्मितेचा दीप तेवत राहावा म्हणून सातत्याने साहित्य संमेलन भरवते. बेळगाव जिल्ह्यातील खानापूरमध्ये २० वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन यावर्षी २२ डिसेंबरला होत आहे. या संमेलनाध्यक्षपदी रंगनाथ पठारे यांची निवड अकादमीने एकमताने केली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला अलीकडेच अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला. त्यासाठीच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे होते. ते प्रतिभावंत साहित्यिक असून, त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, अनुवाद असे वैशिष्ट्यपूर्ण, सकस अन् चौफेर लेखन केले आहे. हिंदी, इंग्रजी, कन्नड, उर्दू, सिंधी आणि कोकणी भाषांमध्ये त्यांच्या साहित्यकृतींचे भाषांतर झाले आहे. ‘ताम्रपट’ कादंबरीसाठी त्यांना १९९९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या अनेक पुस्तकांना नामांकित तसेच राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत. पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले आहे. अशा महान साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली सीमाभागात ‘गुंफण’चे साहित्य संमेलन होत असल्याचा अभिमान असल्याचे डॉ. बसवेश्वर चेणगे यांनी सांगितले.
महायुतीच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी कधी? काय म्हणाले अजित पवार?
महायुतीतले ( Mahayuti ) प्रमुख नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी माध्यमांना हे सांगितलं की ३० नोव्हेंबर किंवा १ डिसेंबर या दोन दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला नव्या सरकारमध्ये असेल असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे
तरुणांसाठी नवतंत्रज्ञानाची कवाडे खुली होणार! गुगल डेव्हलपर ग्रुपच्या वतीने डेव्हफेस्ट २०२४ चे आयोजन
पुणे : बदलते तंत्रज्ञान आणि त्यातील नवीन गोष्टी याची माहिती तंत्रज्ञांना व्हावी, यासाठी गुगल डेव्हलपर ग्रुपने ‘डेव्हफेस्ट २०२४’चे आयोजन केले आहे. या परिषदेची संकल्पना यंदा ‘जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कृत्रिम प्रज्ञा) आणि त्याचा नैतिक दृष्टिकोनातून वापर ही आहे. या परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह युवा तंत्रज्ञांना नवतंत्रज्ञानाची कवाडे खुली होणार आहेत. गुगल डेव्हलपर ग्रुपतर्फे येत्या शनिवारी (ता.३०) ‘डेव्हफेस्ट’च्या १३ व्या आवृत्तीचे आयोजन हॉटेल वेस्टइन येथे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ ते सायंकाळी ५ दरम्यान होणार आहे.
याबाबत गुगल डेव्हलपर ग्रुप पुणेचे संयोजक महावीर मुथ्था म्हणाले की, तरुण तंत्रज्ञांमधील सर्जनशीलता वाढवण्यासाठी २०११ मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली. ‘डेव्हफेस्ट’ ही एक तंत्रज्ञान परिषद असून, स्थानिक समुदायाच्या गरजा आणि उद्दिष्ट्ये पूर्ण करण्याचा उद्देश त्यामागे असतो. यामध्ये ज्ञानाची देवाणघेवाण आणि नेटवर्किंगवर विशेष भर देण्यात येतो. हे युवा डेव्हलपर्ससाठी एक चांगले व्यासपीठ आहे. यामध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह चर्चासत्रे, कार्यशाळा आणि नेटवर्किंग सत्रांचा समावेश आहे.
क्षीरसागरांच्या मंत्रिपदासाठी महालक्ष्मीला साकडे
कोल्हापूर : गोरगरीब जनता, रुग्णांचे कैवारी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत तसेच आमदार राजेश क्षीरसागर यांना मंत्री आणि पालकमंत्री पद मिळावे, यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि बरे झालेल्या रुग्णांकडून मंगळवारी करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला साकडे घालण्यात आले. आरोग्य सेवेचा महायज्ञ अखंडपणे सुरू राहण्यासाठी एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे, असे मत बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केले. उपस्थित पदाधिकारी आणि रुग्णांनी मंदिराला प्रदक्षिणा तर वैद्यकीय मदत मिळालेल्या लहान मुलांनी एकनाथ शिंदे यांची प्रतिमा दाखवत हेच मुख्यमंत्री व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रमेश खाडे, सुरेश माने, शिवसेना दक्षिण शहर प्रमुख अमरजा पाटील उपस्थित होते.
महाराष्ट्रात महायुतीला रेकॉर्डब्रेक बहुमत मिळालं आहे. निकाल २३ नोव्हेंबरला लागला आहे. मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.दरम्यान आज हे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.