Full List of NCP AP Candidate : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये फूट पडली. त्यानंतर अजित पवारांनी थेट भाजपाबरोबर जात सत्तेत उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. महायुतीमध्ये आता भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) असे तीन मित्र पक्ष आहेत. एकनाथ शिंदेंना ८० जागा मिळाल्या असून अजित पवारांना ५१ जागा मिळाल्या आहेत. तर, भाजपाने सर्वाधिक १४६ जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. उर्वरित जागा इतर मित्र पक्षांना देऊ केल्या आहेत. दरम्यान, अजित पवारांना कोणत्या ५१ जागा मिळाल्या आणि त्या जागेवरून कोणाला उभं केलंय हे पाहुयात.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संपूर्ण यादी (Full List of NCP AP Candidate)

विधानसभा मतदारसंघउमेदवार
नवापूरभरत गावित
अमळनेरअनिल पाटील
अमरावतीसुलभा खोडके
मोर्शीदेवेंद्र भुयार
अहेरीधर्मरावबाबा अत्राम
लोहाप्रताप चिखलीकर
सिन्नरमाणिकराव कोकाटे
निफाडदिलीप बनकर
दिंडोरीनरहरी झिरवाळ
देवळालीसरोज अहिरे
शहापूरदौलत दरोडा
अनुशक्ती नगरसना मलिक
वांद्रे पूर्वझिशान सिद्दिकी
श्रीवर्धनआदिती तटकरे
शिरूरज्ञानेश्वर कटके
बारामतीअजित पवार
भोरशंकर मंडेकर
मावळसुनील शेळके
पिंपरीआण्णा बनसोडे
वडगाव शेरीसुनील टिंगरे
श्रीरामपूरलहू कानडे
पारनेरकाशिनाथ दाते
गेवराईविजयसिंह पंडित
परळीधनंजय मुंडे
उदगीरसंजय बनसोडे
फलटणसचिन पाटील
इस्लामपूरनिशिकांत पाटील
तासगाव कवठे महाकाळसंजयकाका पाटील
येवलाछगन भुजबळ
आंबेगावदिलीप वळसे पाटील
कागलहसन मुश्रीफ
अर्जुनी मोरगावराजकुमार बडोले
माजलगावप्रकाश सोळंके
वाईमकरंद पाटील
खेड आळंदीदिलीप मोहिते
अहिल्यानगर शहर (अहमदनगर)संग्राम जगताप
इंदापूरदत्तात्रय भरणे
अहमदपूरबाबासाहेब पाटील
पिंपरीअण्णा बनसोडे
कळवणनितीन पवार
कोपरगावआशुतोष काळे
अकोलेकिरण लहामटे
वसमतचंद्रकांत नवघरे
चिपळूणशेखर निकम
पाथरीउत्तमराव विटेकर
जुन्ररअतुले बेनके
मोहोळयशवंत माने
हडपसरचेतन तुपे
चंदगडराजेश पाटील
इगतपुरीहिरामण खोसकर
तुमसरराजू कारेमोरे
पुसदइंद्रनील नाईक
मुंब्रा कळवानजीब मुल्ला

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जुलै २०२३ मध्ये बंडखोरी झाली. अजित पवारांनी पक्षातील ४० आमदारांना आपल्यासोबत घेऊन भारतील जनता पक्षाला समर्थन दिलं. त्यामुळे विरोधी बाकावरून ते थेट उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जाऊन बसले. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्या. या निवडणुकीत महायुतीत राष्ट्रवादींना हवीतशी जादू करून दाखवता आली नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाचं खापर अजित पवारांवर सोडण्यात आलं. त्यामुळे विधानसभेत अजित पवार एकला चलो रे ची भूमिका घेतील असं म्हटलं जात होतं. परंतु, आम्ही महायुतीतूनच निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे विधानसभेला तरी अजित पवार काही जादू करून दाखवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Assembly Election 2025
मविआचा ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा चेहरा केजरीवालांच्या मदतीला, दिल्लीच्या निवडणुकीत ‘आप’ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Sharad Pawar, Ajit Pawar share stage at Baramati event
शरद पवार-अजित पवार पुन्हा एकाच व्यासपीठावर; ‘व्हीएसआय’च्या सर्वसाधारण सभेत उद्या उपस्थिती
Ajit Pawar
“जनमानसात खराब प्रतिमा असणाऱ्यांना पक्षात घ्यायचं नाही”, अजित पवारांचा रोख कोणाकडे? राष्ट्रवादीच्या शिबिरात म्हणाले…

हेही वाचा >> Mahayuti vs Maha Vikas Agahdi Candidate : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, २८८ मतदारसंघात कोण कोणाविरोधात वाचा एका क्लिकवर!

दरम्यान, अजित पवारांसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारूण पराभव झाला होता. तर, आता अजित पवारांविरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्र पवार उभे ठाकले आहेत. त्यामुळे गेल्या अजित पवार आपली जागा राखून ठेवण्यात यशस्वी होतात की बारामतीची जनता पुन्हा एकदा शरद पवारांवर विश्वास दाखवणार हे २३ तारखेलाच निश्चित होईल.

Story img Loader