Maharashtra Budget Session 2024 , 27 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपले उपोषण असून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत. देशपातळीवर इंडिया आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे. खासदार राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेवर आहेत. यासह जगभरातील सर्व घडामोडींची माहिती येथे वाचा एका क्लिकवर….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Interim Budget Session 2024 Updates : महाराष्ट्रासह देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर…

14:06 (IST) 27 Feb 2024
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आंदोलकाने स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले, वातावरण तणावपूर्ण

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू व आंबेडकरी चळवळीतील विद्यार्थी संघटनांमधील संघर्ष तीव्र होत असून मंगळवारी प्रशासकीय इमारतीसमोर रिपब्लिन विद्यार्थी सेनेचा मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. त्याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेऊन कारवाईसाठी पोलीस ठाण्यात नेले आहे. या घटनेची माहिती विद्यापीठात सुरू असलेल्या अधिसभा बैठकीत पोहोचली आणि काही सदस्यांनी आंदोलन सुरू असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशव्दारासमोर धाव घेतली.

व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी विद्यापीठात काही तरूण भगवे उपरणे घालून विद्यार्थी-विद्यार्थ्यांना एकत्र बसले असता धमकावत होते. त्या निषेधार्थ कुलगुरूंच्या दालनासमोर सचिन निकमसह आंबेडकर, डाव्या चळवळीतील संघटनांनी आंदोलन केले होते. मात्र, आंदोलन करणाऱ्यांविरोधातच गुन्हे दाखल झाले. त्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे.

14:05 (IST) 27 Feb 2024
Maharashtra Interim Budget Session 2024 Live Updates: अर्थसंकल्प सादरीकरणास सुरुवात

अर्थमंत्री अजित पवार यांनी यंदाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात केली आहे…

13:55 (IST) 27 Feb 2024
तुर्भे एमआयडीसी मध्ये भीषण आग, तीन कामगारांना वाचवण्यात यश

नवी मुंबई : नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी येथील बी २२७ भूखंडावरील एका कंपनीत आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी एमआयडीसी आणि नवी मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या ३ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचा प्रयत्न शर्यतीने सुरू आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आग लागलेल्या कंपनी मध्ये ३ कामगार अडकले होते.सुदैवाने अग्निशमन दलाचे जवान वेळेवर पोहचले आणि त्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

13:55 (IST) 27 Feb 2024
रुग्णाच्या मृत्युला जबाबदार ठरलेल्या ज्येष्ठ नागरिक डॉक्टरची शिक्षा कायम; मात्र वयामुळे शिक्षा भोगण्याचे आदेश देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई : चाळीस वर्षांपूर्वी रुग्णाच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरल्याप्रकरणी एका वरिष्ठ नागरिक डॉक्टरला झालेली शिक्षा उच्च न्यायालयाने योग्य ठरवली. मात्र, या डॉक्टरचे वय लक्षात घेऊन न्यायालयाने त्याला १० दिवसांची शिक्षा भोगण्याचे आदेश देण्यास नकार दिला.

सविस्तर वाचा

13:32 (IST) 27 Feb 2024
मुंबई : पिस्तूल, जिवंत काडतुसांसह सराईत आरोपीला अटक, आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला शस्त्रास्त्रांसह वरळी परिसरातून अटक करण्यात पोलिसांना यश आले.

सविस्तर वाचा…

13:31 (IST) 27 Feb 2024
जंबो करोना काळजी केंद्र घोटाळा प्रकरण : संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना जामीन, सुटका मात्र नाही

अन्य आरोपींना जामीनही मंजूर झाला असून पाटकर हेही जामीन मिळण्यास पात्र आहेत, असे देखील न्यायालयाने पाटकर यांना जामीन मंजूर करताना प्रामुख्याने नमूद केले.

सविस्तर वाचा…

13:31 (IST) 27 Feb 2024
मुंबई : एमएमआरडीए ‘मेट्रो ५’साठी २२ गाड्या खरेदी करणार

‘ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो ५’ मार्गिकेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून या मार्गिकेसाठी मेट्रो गाड्या खरेदी करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 27 Feb 2024
धारावी पुनर्विकासात व्यावसायिकांना आता जीएसटी सवलतीचे गाजर…पण पुनर्विकास कोठे होणार याबाबत मौन!

धारावीमधील स्थानिक व्यावसायिकांना मदत करण्यासाठी राज्याकडून वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) पाच वर्षांपर्यंत परतावा दिला जाणार आहे, असे धारावी पुनर्विकास प्रकल्प कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले.

सविस्तर वाचा…

13:25 (IST) 27 Feb 2024
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भीमटोला आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भीमटोला आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाले. विद्यापीठात दडपशाही चालू आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. विद्यापीठाने एक परिपत्रक काढण्यात आले होते. या परिपत्रकाच्या माध्यमातून आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली होती. त्याविरोधातच हे आंदोलन चालू होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

13:09 (IST) 27 Feb 2024
कर नाही त्याला डर कशाला, सगळं समोर येऊ द्या- जितेंद्र आव्हाड

मनोज जरांगे यांना शरद पवार, राजेश टोपे यांचा पाठिंबा आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. यावर अजित पवार गटातील जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. कर नाही त्याला डर कशाला. सगळं समोर येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, असे आव्हाड म्हणाले.

12:49 (IST) 27 Feb 2024
पिंपरी चिंचवड : १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने केली मित्राची हत्या, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील चाकणमध्ये अल्पवयीन गुन्हेगाराने दुसऱ्या अल्पवयीन गुन्हेगाराची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

सविस्तर वाचा…

12:47 (IST) 27 Feb 2024
मुंबई : मॅकडोनाल्डविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

पनीरऐवजी चीज ॲनालॉगचा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आल्यानंतर मुंबईतील मॅकडोनाल्डच्या १३ उपहारगृहांसह फास्टफूडची विक्री करणाऱ्या अन्य नामांकित १७ उपहारगृहांना अन्न व औषध प्रशासनाने नोटीस पाठविली आहे.

सविस्तर वाचा…

12:44 (IST) 27 Feb 2024
सायबरसुरक्षा उत्कृष्टता मोहिमेचा पुण्याला मान! अमेरिकेच्या वाणिज्य दूतावासासोबत मराठा चेंबरची संयुक्त उपक्रम

पुणे : डिजिटल तंत्रज्ञान अतिशय वेगाने प्रगती करीत आहेत. या परिस्थितीत त्यात निर्माण होणारे सायबर धोके टाळणेही आवश्यक बनले आहे. यासाठी सायबर सुरक्षा उत्कृष्टता मोहिमेची सुरूवात पुण्यातून करण्यात आली आहे. या अंतर्गत सायबर सुरक्षा क्षेत्रातील भारत आणि अमेरिकेतील कंपन्या एकत्र येऊन कौशल्य विकासासोबत सायबर सुरक्षा उपाययोजनांवर काम करणार आहेत.

‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर’च्या (एमसीसीआयए) वतीने आयोजित पाचव्या ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’मध्ये सोमवारी या मोहिमेची घोषणा करण्यात आली. यावेळी अमेरिकेचे भारतातील महावाणिज्य दूत माईक हॅनके, इस्राईलचे महावाणिज्य दूत कोबी शोशानी, एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर आणि महासंचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमेरिकेचे महावाणिज्य दूत माईक हॅनके म्हणाले की, सायबर सुरक्षा उत्कृष्टता मोहिमेच्या माध्यमातून जगभरातील सायबर सुरक्षा तत्ज्ञांना जोडले जाणार आहे. रोजगार निर्मिती, नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि उद्योगांना सुविधा पुरविणे हा या केंद्राचा प्रमुख उद्देश असेल. सायबर सुरक्षा हा भारत आणि अमेरिका यांच्या द्वीपक्षीय भागीदारीत प्राधान्यक्रमावरील मुद्दा राहिला आहे. सायबर धोके कमी करून डिजिटल क्रांतिद्वारे जागतिक समृद्धी आणि स्थैर्य आणण्याचे आव्हान दोन्ही देशांसमोर आहे. त्यातूनच हे पाऊल उचलले जात आहे.

12:04 (IST) 27 Feb 2024
बेरोजगारांना संधी! २० हजारांपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती!

पुणे : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत येत्या २ मार्च रोजी बारामती येथे होणाऱ्या नमो महारोजगार मेळाव्यामध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक, तसेच इतर सेवा क्षेत्रातील सुमारे २० हजारपेक्षा जास्त रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या मेळाव्यासाठी १२० पेक्षा जास्त खासगी उद्योजकांनी आतापर्यंत सहभाग नोंदवला आहे.

वाचा सविस्तर…

12:04 (IST) 27 Feb 2024
विज्ञान दिनी विज्ञानप्रेमींना मेजवानी! खुला दिवस, शास्त्रज्ञ संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन

पुणे : शहरातील विविध विज्ञान संस्था, शिक्षण संस्थांतर्फे विज्ञानप्रेमींना मेजवानी मिळणार आहे. विज्ञान दिनी (२८ फेब्रुवारी) खुला दिवस, व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, शास्त्रज्ञांशी संवाद असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

वाचा सविस्तर…

11:48 (IST) 27 Feb 2024
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बारामती लोकसभा मतदार संघातील विधानसभा निहाय बैठक पुण्यात सुरू

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यांपासून दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान लोकसभा निवडणुकीला काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला असताना अजित पवार, सुनेत्रा पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक भागात दौरे आणि मेळावे घेत आहेत. यामुळे सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होणार असे जवळपास निश्चित मानले जात आहे.

यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून त्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात येणार्‍या विधानसभा मतदार संघनिहाय पुण्यातील बैठकीला शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात झाली आहे. मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक होत आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित आहेत.

10:56 (IST) 27 Feb 2024
मनोज जरांगेंच्या आंदोलनाची होणार एसआयटी चौकशी!

राज्य विधिमंडळात आज मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांवरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. त्यानंतर सत्ताधारी भाजपाने जरांगेंच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यानंतर आता जरांगेंच्या आदोलनाची, त्यांना देण्यात आलेल्या आर्थिक मदतीची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल. तसे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

10:52 (IST) 27 Feb 2024
ठाणे : सेंट्रल पार्कमुळे कोंडीचे नवे केंद्र कोलशेत

ठाण्यातील नागरिकांना हक्काचे पार्क मिळावे यासाठी बांधीव हस्तांतरण विकास हक्काच्या माध्यमातून कोलशेत भागात नमो सेंट्रल पार्क हे उद्यान विकसित करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा…

10:52 (IST) 27 Feb 2024
बदलापुरच्या होम प्लॅटफॉर्मचे लोकार्पण, सोहळ्यापूर्वी महाविकास आघाडीची निदर्शने

बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे अधिकृतरित्या लोकार्पण सोमवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडले.

सविस्तर वाचा…

10:40 (IST) 27 Feb 2024
पुणे : पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वाचा सविस्तर…

10:39 (IST) 27 Feb 2024
पिंपरी : अमृत भारत योजनेंतर्गत चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्थानकांचा विस्तार

पिंपरी : अमृत भारत स्टेशन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड, देहूरोड, लोणावळा रेल्वे स्थानकांच्या विस्तारीकरणाच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन पद्धतीने भूमिपूजन झाले.

वाचा सविस्तर…

10:38 (IST) 27 Feb 2024
पिंपरी-चिंचवडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आक्रमक

पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट सरसावले आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी शहरावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.

सविस्तर वाचा…

10:37 (IST) 27 Feb 2024
मुंबई : ठाकरे गटाचे आणखी एक माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत

ठाकरे गटातील माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचे सत्र अजून सुरुच असून सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी आणखी काही माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश झाले.

सविस्तर वाचा…

10:15 (IST) 27 Feb 2024
गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान, पंचनामा करण्याचा आदेश- देवेंद्र फडणवीस

अचानक बऱ्याच भागांत मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे. यात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावेत असा आदेश दिला आहे. लवकरत लवकर मदत कशी करता येईल, त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. धानाच्या बोनससंदर्भात निर्णय करून तेही पैसे शेतकऱ्यांना देण्यात येतील.

10:08 (IST) 27 Feb 2024
शिंदे गटाची १८ जागांची मागणी भाजप मान्य करणार का ?

शिंदे गटाकडे सध्या १३ खासदार असले तरी तेवढ्या जागाही सोडण्याची भाजपची तयारी नसल्यानेच शिंदे गटाने दबावतंत्र सुरू केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

सविस्तर वाचा…

10:08 (IST) 27 Feb 2024
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे सरकाविरोधात आंदोलन

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे आज विधिमंडळात राज्यासाठी लेखानुदान सादर करणार आहेत. याआधी विरोधक आक्रमक झाले आहेत. विरोधकांकडून सरकारविरोधात खोट्या बंदुका घेऊन घोषणाबाजी करण्यात आली. ‘गेली ती शिवशाही, आली ती गुंडशाही’ अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दावने, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, भाई जगताप, बाळासाहेब थोरात आदी नेते यावेळी उपस्थित होते.

10:04 (IST) 27 Feb 2024
श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघात मनसेचे समर्थन कुणाला ? राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे संभ्रम वाढला

कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पोलीस ठाण्यातील शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड गोळीबारासंबंधी विचारले असता राज यांनी घेतलेली भूमीका सध्या चर्चेत आली आहे.

सविस्तर वाचा…

10:01 (IST) 27 Feb 2024
बीडमध्ये पंकजा मुंडे उमेदवार ?

‘आता आपण उमेदवार पाडायचे’, असे राजकीय भाषण करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता पवित्रा बदलला असल्याचे पहावयास मिळत आहे.

सविस्तर वाचा…

10:01 (IST) 27 Feb 2024
राहुल गांधी वायनाडमधून निवडणूक लढवणार नाहीत? चर्चेला उधाण!

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे कोणता नेता कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार, याची चर्चा रंगली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्याबाबत आता नवे वृत्त येत आहे. ते यावेळी केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता नाही. वाचा सविस्तर

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ लाइव्ह