Maharashtra Breaking News : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिवेशनात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, मराठा आरक्षण, ओबीसींच्या मागण्या, कापूस, सोयाबीनचे दर, दूधाच्या दरासह आदी महत्वाच्या प्रश्नांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. याचबरोबर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवरील फेरविचार करण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण अंबादास दानवे यांनी या संदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शिविली होती. त्यामुळे दानवे यांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE
पिंपरी : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आषाढीवारीसाठी प्रस्थान झाल्यानंतर पुन्हा तीर्थक्षेत्र देहू, आळंदीतून वाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीतील पाण्यावर तवंग (फेस) आला आहे.
अमरावती : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निवडण्यात आलेली प्रस्तावित जागा शहरापासून १० किलोमीटर दूर असल्याने जिल्ह्यातील रुग्णांसाठी ती गैरसोयीची ठरणार आहे, त्यामुळे महाविद्यालयाची जागा बदलविण्यात यावी, अशी मागणी आमदार सुलभा खोडके यांनी आज विधानसभेत केली. या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या जागेवरून आमदार सुलभा खोडके आणि रवी राणा यांच्यातील मतभेद पुन्हा उघड झाले आहे.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवरील फेरविचार करण्यासंदर्भात आज निर्णय झाला आहे. अंबादास दानवे यांनी या संदर्भात डॉ.नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. यानंतर अंबादास दानवे यांचं निलंबन पाच दिवसांऐवजी तीन दिवस करण्यात आलं आहे. यावर आता अंबादास दानवे प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “निलंबन मागे घेण्यास उशीर झाला आहे”, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने ‘टी – २०’ विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाचा गौरव करण्यासाठी आणि हा विजय साजरा करण्यासाठी मरिन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमदरम्यान विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे.
मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याचे सांगून ७६ वर्षीय वृद्धाची सव्वादोन कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.
विधान परिषदेवर असणारे १५ सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये कपिल पाटील, विलास पोतनीस, मनीषा कायंदे, भाई गिरकर, बाबाजानी दुर्राणी, रमेश पाटील, नीलय नाईक, महादेव जानकर, रामराव पाटील आणि वजाहत मिर्झा हे निवृत्त होत आहेत. यामध्ये निरंजन डावखरे, अनिल परब, किशोर दराडे हे पुन्हा पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामधून विधानपरिषदेत आले आहेत. तर प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. १२ जुलै रोजी रोजी विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे.
नागपूर : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरणासाठी आता राज्यातील प्रत्येक आगारात (डेपो) दर सोमवारी व शुक्रवारी ‘प्रवासी राजा दिन’ आयोजित केला जाईल. त्यानुसार एसटीच्या विभाग नियंत्रकांना एका आगारात जाऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सुचना ऐकून घ्याव्या लागणार आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग राबवला जाणार आहे.
Heavy Rain Warning In Maharashtra : वेळेआधीच दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या उत्तरार्धात राज्यातून दडी मारली होती, पण आता पुन्हा हा पाऊस परतला आहे. राज्याच्या अनेक भागात पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज, गुरुवारी राज्यातील काही भागात आणि विशेषकरुन विदर्भ आणि कोकणात मूसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या चौकशीवर अंतरिम स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिल्यावर राज्यपाल रमेश बैस यांनी गुरुवारी डॉ. चौधरी यांना त्यांचे म्हणणे ऐकूण घेण्यासाठी बोलावले होते. यावेळी डॉ. चौधरींनी आपले लेखी उत्तर सादर केले असून दोन दिवसांची वैद्यकीय रजा मागितली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर राज्यपाल काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यानंतर गुरुवारी कुलगुरूंचे निलंबन करण्यात आले आहे.
नागपूर: अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विविध देयके अदा करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. या सर्व देयकांचा तातडीने निपटारा केला, जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली.
वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर वसंत मोरे यांनी ठाकरे गटात पक्ष प्रवेश करण्याची तारीख सांगितली आहे. वसंत मोरे म्हणाले, “लोकसभेच्या निवडणुकीत मी वंचित बहुजन आघाडीत गेलो. मात्र, मतदारांनी मला स्वीकारलं नाही. जो मताचा टक्का होता तो मिळाला नाही. त्यामुळे मी ९ जुलैला मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. मी खडकवासला आणि हडपसर विधानसभेसाठी इच्छुक आहे”, असं वसंत मोरे माध्यमांशी बोलताना म्हणाले.
नागपूर : महाराष्ट्र आणि तेलंगाना राज्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवरील मेडीगट्टा धरण प्रकल्पामुळे शेतजमिनीचे नुकसान होत आहे. धरणामुळे पूरस्थिती निर्माण होत शेतपिके वाहून जात आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यात वारकऱ्यांचा स्वयंपाक सुरू असताना अचानक घरगुती सिलिंडरने पेट घेतल्याची घटना घडली. पालखी सोहळ्यात बंदोबस्तावर तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. सविस्तर वाचा…
नागपूर : आधीच राज्यात कर्करोग तज्ज्ञ कमी आहेत. त्यात पुन्हा विकिरणोपचार व कर्करोगशास्त्र विषयातील पदव्युत्तरच्या जागा वाढत नसल्याचे चित्र आहे. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (मेडिकल) या विषयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) यंदा थांबवले आहेत. त्यामुळे राज्यातील २९ पैकी पाच जागा कमी होण्याची शक्यता आहे.
गोंदिया : रेल्वे मार्गाच्या तिप्पटीकरणामुळे गाड्यांना वेग मिळेल, प्रवासी गाड्यांचा वक्तशीरपणा वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल. या उद्देशाने राजनांदगाव-नागपूर रेल्वे मार्गावरील तिसरी लाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, यातील १८० कि.मी.चे काम लवकरच पूर्ण होणार आहे. याचा मुंबई – हावडा रेल्वे मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल कारण गाड्यांचा वेग वाढेल आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होईल.
ठाणे : भिवंडीतील ब्राह्मणआळी भागात असलेल्या एका सराफाच्या दुकानात बुरखा घातलेल्या दोन महिला दागीने पाहण्याच्या बहाण्याने आल्या आणि त्यांनी दुकानातील कर्मचाऱ्याची दिशाभूल करत आठ लाख रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रपूर : शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात अंधेवार यांच्या पाठीला गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.
पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अगरवाल पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची चर्चा पिंपरी चिंचवड शहरात रंगली होती. अखेर यावरील मौन पिंपरी- चिंचवड पोलिसांनी सोडलं आहे.
‘जीवनसाथी डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून भेटण्याच्या बहाण्याने तरुणीच्या घरी येऊन बलात्कार करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वाचा…
राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असून राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांना पिकविमा मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत होता. यासंदर्भात आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “पिकविमा देण्यास नकार दिल्यास कारवाई करणार”, असा इशारा धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी सहा ते सात महिन्यांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. या प्रकरणात पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे निलंबन केले होते. मात्र, चौकशीत दोषी आढळून आल्याने दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहेत.
ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर भागात श्वानावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
डोंंबिवली – डोंबिवली एमआयडीसीत जीमखाना रस्त्यावर मागील दोन महिन्यांपूर्वी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ठेकेदाराकडून तयार केलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर तडे पडले आहेत. हे काम निकृष्ट पद्धतीने ठेकेदाराकडून करण्यात आल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी या कामाला आक्षेप घेतला. हे काम नव्याने करण्याचे आदेश ठेकेदाराला दिले आहेत.
नागपूर : महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राख कन्हान नदीच्या पाण्यात मिसळल्याचे पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) पथक महानिर्मितीच्या खापरखेडा केंद्रात धडकले. पथकाने कन्हान नदीतील पाण्याचे नमुनेही गोळा केले आहे. या प्रकरणात आता कारवाईची शक्यता आहे.
चंद्रपूर : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरू केली. मात्र, पोंभूर्णा येथील काँग्रेस कार्यकर्त्याने नावाचा दुरुपयोग करून काँग्रेस खासदार ‘प्रतिभा धानोरकर लाडकी बहीण योजना’ या नावाची खोटी योजना तयार करून सोशल मीडियाद्वारे प्रसारीत करून एक प्रकारे जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या दुरुस्तीचा निर्णय घेण्यापासून सुरू महापालिका प्रशासनाच्या मागे लागलेला ससेमिरा संपलेला नाही. बांधकामातील त्रुटींमुळे टीकेला सामोरे जावे लागणाऱ्या पालिका प्रशासनाला आता पुलावर फिरणाऱ्या गायींनी हतबल केले आहे.
नागपूर : परराज्यातील चोरीच्या जड वाहनांची नोंदणी प्रकरणात विदर्भातील विविध आरटीओ कार्यालयातील काम काढलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची संख्या आता सहावर पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे नियमबाह्य कारवाई असल्याचे सांगत संतापलेल्या अधिकाऱ्यांची संघटनेकडून आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे.
नवी मुंबई : राज्यात सत्ता असूनही नवी मुंबईतील घरच्या मैदानातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झुंजावे लागत असल्याची भावना तीव्र होऊ लागल्याने भाजपचे ठाणे जिल्ह्यातील प्रभावी नेते गणेश नाईक यांनी सिडको आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्याचे बुधवारी विधीमंडळात पहायला मिळाले.
वर्धा : लोकसभेवर निवडून गेल्यानंतर नवनिर्वाचित व प्रथमच निवडून आलेल्या खासदारांना हवे असते नवी दिल्लीत हक्काचे घर. नवे प्रशस्त फ्लॅट नव्या खासदारांना दिल्या जातात, अशी माहिती आहे. ज्येष्ठतेनुसार निवास वाटल्या जाते. पण कसेही असो दिल्लीत निवास केव्हा मिळणार, अशी प्रतिक्षा या नव्या खासदारांना लागून राहिली असल्याचे सांगितल्या जाते. तुर्तास निवास वाटप न झाल्यामुळे या नव्या खासदारांचे सध्या महाराष्ट्र सदनात वास्तव्य आहे.
नागपूर : देशात लोकसभा निवडणुका संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. मात्र विधानसभा निवडणूक लढविण्याची माजी मंत्री सुनील केदार यांची इच्छा सध्यातरी पूर्ण होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
<a href="https://www.loksatta.com/nagpur/former-minister-sunil-kedar-will-not-be-able-to-contest-the-assembly-refusal-of-high-court-to-grant-relief-tpd-96-ssb-93-4462624/:~:text=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95%20%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80,%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87%20%E0%A4%B9%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AF%20%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE.”>सविस्तर वाचा…
वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. मात्र, आता वसंत मोरे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.