Maharashtra Breaking News : राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिवेशनात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, मराठा आरक्षण, ओबीसींच्या मागण्या, कापूस, सोयाबीनचे दर, दूधाच्या दरासह आदी महत्वाच्या प्रश्नांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. याचबरोबर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवरील फेरविचार करण्यासंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण अंबादास दानवे यांनी या संदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी दर्शिविली होती. त्यामुळे दानवे यांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Live Updates

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE

13:53 (IST) 4 Jul 2024
डोंबिवली जीमखाना रस्त्यावरील वस्तीमध्ये तीव्र पाणी टंचाई, रहिवाशांचे डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन

डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसीतील सागर्ली-जीमखाना रस्त्यावरील आरई मालिकेतील बंगले, सोसायट्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून एमआयडीसीकडून पाणी पुरवठा होत नाही. एमआयडीसी अधिकारी या पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याच्या निषेधार्थ एमआयडीसीतील रहिवाशांनी गुरुवारी सकाळी एमआयडीसीच्या डोंबिवली कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.

सविस्तर वाचा…

13:41 (IST) 4 Jul 2024
ठाण्यातील कंपनीत महिला अधिकाऱ्याचा कर्मचाऱ्याकडून विनयभंग

डोंबिवली : ठाण्यातील कासारवडवली भागातील एका खासगी कंपनीत एका ४२ वर्षाच्या महिला अधिकाऱ्याचा याच कंपनीतील एका ३२ वर्षाच्या कर्मचाऱ्याने विनयभंग केला आहे. ही महिला डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात राहत असल्याने कासारवडवली पोलिसांनी हा गुन्हा मानपाडा पोलीस ठाण्यात अधिक चौकशीसाठी वर्ग केला आहे.

वाचा सविस्तर…

13:40 (IST) 4 Jul 2024
राज्यात बेकायदेशीरपणे शस्त्र विक्री, तिघांना अटक; ८ पिस्तुल आणि १३८ काडतुसे जप्त

मुंबई : राज्यात बेकायदेशीरपणे आधुनिक शस्त्र विकणाऱ्या एका मोठ्या विक्रेऱ्यांसह तिघांना अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. आरोपीकडून आठ पिस्तुल आणि १३८ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

वाचा सविस्तर…

13:39 (IST) 4 Jul 2024
सज्जनगड रस्त्यावर दरड कोसळली वाहतूक ठप्प

सातारा: सज्जनगडावर जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली.त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली. दरड हटवण्याचे काम सुरू झाले आहे.सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार सुरु आहे. सज्जनगड रोडवर दरड कोसळल्याने परिसरातील दळणवळण बंद झाले आहे. दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

13:35 (IST) 4 Jul 2024
अंबादास दानवेंवरील निलंबनाचा कालावधी पाच दिवसांऐवजी तीन दिवस

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईवरील फेरविचार करण्यासंदर्भात आज निर्णय झाला आहे. अंबादास दानवे यांनी या संदर्भात डॉ.नीलम गोऱ्हे यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली होती. यानंतर अंबादास दानवे यांचं निलंबन पाच दिवसांऐवजी तीन दिवस करण्यात आलं आहे. याबाबतचा ठराव आज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. हा ठराव विधान परिषदेत संमत करण्यात आला.

13:23 (IST) 4 Jul 2024
मोफा कायद्यातील प्रस्तावित दुरुस्ती अनावश्यक! मुंबई ग्राहक पंचायतीची भूमिका  

महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाकडे (महारेरा) ज्या गृहप्रकल्पांची नोंदणी झाली नसेल, त्या गृहप्रकल्पांना महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट कायदा (मोफा) लागू असेल, या राज्य सरकारमार्फत मोफा कायद्यात करण्यात आलेल्या प्रस्तावित दुरुस्तीला मुंबई ग्राहक पंचायतीनेही विरोध केला आहे. सविस्तर वाचा…

13:05 (IST) 4 Jul 2024
सातारा : झाडाणी जमीन खरेदीप्रकरणी सुनावणी लांबणीवर

कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन करत कोयना खोऱ्यातील झाडाणी येथे करण्यात आलेल्या जमीन खरेदी प्रकरणाची सुनावणी ११ जुलैपर्यंत लांबणीवर गेली आहे. अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे शासकीय कामासाठी मुंबईला गेल्याने ही सुनावणी लांबणीवर पडल्याचे सांगण्यात आले. सविस्तर वाचा…

13:04 (IST) 4 Jul 2024
मुंबई : फॉरेक्स ट्रेडिंग ॲप फसवणूक प्रकरण ईडीकडून कलाकारांची चौकशी

बेकायदेशीर ऑनलाईन फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गुंतवणुकदारांची सुमारे ५०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी छोट्या पडद्यावरील मालिकांमधील कलाकार क्रिस्टल डिसूझा आणि अभिनेता करण वाही यांचे जबाब नोंदवले. सविस्तर वाचा…

12:40 (IST) 4 Jul 2024
“ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झालाय”; रवींद्र धंगेकरांचा गंभीर आरोप

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधानसभेत पुण्यातील ससून रुग्णालयातील विविध प्रश्नांवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातील भ्रष्ट्राचाराच्या मुद्यांवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी सरकारला धारेवर धरले. “ससून रुग्णालय गुन्हेगारांचा अड्डा झालाय”, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर देत ससून रुग्णालय कशा पद्धतीने चांगलं आहे, याबाबत सांगितलं.

12:38 (IST) 4 Jul 2024
अस्वस्थ गणेश नाईकांचे थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान

नवी मुंबई : राज्यात सत्ता असूनही नवी मुंबईतील घरच्या मैदानातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झुंजावे लागत असल्याची भावना तीव्र होऊ लागल्याने भाजपचे ठाणे जिल्ह्यातील प्रभावी नेते गणेश नाईक यांनी सिडको आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधल्याचे बुधवारी विधीमंडळात पहायला मिळाले.

सविस्तर वाचा…

12:31 (IST) 4 Jul 2024
छोटा राजनच्या नावाने धमकी प्रकरणात विशाल अगरवालला पोलीस कोठडी

कोंढवा भागातील जमीन व्यवहारात मुंबईतील गुंड छोटा राजनचे नाव सांगून एक कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याला लष्कर न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. सविस्तर वाचा

12:17 (IST) 4 Jul 2024
कांदा खरेदीची ईडी, सीबीआयतर्फे चौकशी गरजेची – उत्पादक संघटनेचे केंद्रीय समितीला पत्र

दर स्थिरीकरण योजनेंतर्गत या वर्षी पाच लाख टन कांद्याचा राखीव साठा करण्यासाठी नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) या दोन संस्थांकडून खरेदी करण्यात येत आहे. सविस्तर वाचा…

12:15 (IST) 4 Jul 2024
अमृतधाम परिसर विजेच्या लपंडावामुळे त्रस्त – रोजच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये रोष

दमदार पावसाला सुरूवात झाली नसतानाही महावितरणची वीज वितरण प्रणाली शहराच्या विविध भागात कोलमडत आहे. त्यात पंचवटीतील अमृतधाम परिसराचाही समावेश आहे.

सविस्तर वाचा

12:14 (IST) 4 Jul 2024
पंढरपूरमध्ये राज्यभरातील सायकलपटूंचा रिंगण सोहळा; नाशिक-पंढरपूर सायकलवारीत ३०० जणांचा सहभाग

आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्टस् फाऊंडेशनच्यावतीने पाच ते सात जुलै या कालावधीत नाशिक ते पंढरपूर या ३५० किलोमीटर सायकल वारीचे आयोजन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा…

12:12 (IST) 4 Jul 2024
बुलढाणा : पवित्र नात्याला कलंक! अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार, न्यायालयाने सुनावली ‘ही’ कठोर शिक्षा

बुलढाणा : अल्पवयीन बालिकेला पोटदुखीच्या उपचारासाठी आईने रुग्णालयात नेले असता अतिशय धक्कादायक व घृणास्पद प्रकार उघडकीस आला. सदर बालिका चार महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आले. यावर कळस म्हणजे तिच्या बापानेच हे पाप केल्याचे तपासात उघड झाले. यामुळे आईसह, डॉक्टर, पोलिसही चक्रावले.

सविस्तर वाचा….

12:10 (IST) 4 Jul 2024
रायगडसाठी यंदा ६ हजार ६०० कोटींच्या पतपुरवठ्याचे उद्दीष्ट

अलिबाग- रायगड जिल्ह्याला प्राथमिकता क्षेत्रासाठी सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी बँकाना ६ हजार ६०० कोटींच्या पतपुरवठ्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा पतपुरवठा उद्दीष्टात १ हजार कोटींची भर पडली आहे. बंकांनी पतपुरवठ्यावर भर द्यावा असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बँक प्रतिनिधींच्या बैठकीत दिले आहेत. रायगड जिल्ह्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी वार्षिक पतपुरवठ्याचे उद्दिष्ट ५ हजार ६५० कोटी रुपयांचे देण्यात आले होते, त्या तुलनेत गेल्या वर्षभरात ८ हजार ५०० कोटींचा पतपुरवठा करण्यात आला. उद्दीष्टाच्या तुलनेत १५० टक्के पतपुरवठा करण्यात आला. कृषी क्षेत्रासाठी १ हजार ३०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट होते. त्यातुलनेत १ हजार ६९५ कोटी पतपुरवठा करण्यात आला. लघू व मध्यम उद्योगासाठी २ हजार ७५० कोटी उद्दीष्ट असतांना, ४ हजार ८३७ कोटींचा कर्ज पुरवठा करण्यात आला. पीक कर्जासाठी ४५० कोटी रुपयांचे उद्दिष्ट जिल्ह्याला देण्यात आले असताना बँकानी ३८१ कोटी वितरण करण्यात आले, मुद्रा योजने अंतर्गत जिल्ह्यामध्ये ६१४ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रासाठी एकूण १ हजार ७५० कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. यात ४५० कोटींच्या पिक कर्जाचा तर १ हजार ३०० कोटींच्या मुदत कर्जांचा समावेश असणार आहे. या शिवाय लघु मध्यम उद्योग ३ हजार २०० कोटी, तर इतर प्राथमिक क्षेत्रासाठी १ हजार ६५० कोटी कर्ज पुरवठा करायचा आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत जास्तीत जास्त कर्ज पुरवठ्याची उद्दीष्ट पुर्ती करावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी बँक प्रतिनिधींना दिले आहे. कर्ज पुरवठा करतांना कर्जदारांची अडवणूक करू नका अशा सुचनाही त्यांनी दिल्या. बँकांनी व शासकीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून नागरिकांना नियमित आणि चांगल्या पद्धतीने सेवा द्याव्यात असे आदेश त्यांनी बँक प्रतिनिधींना दिलेत.

11:58 (IST) 4 Jul 2024
एमआयडीसीवरून रोहित पवारांचं राम शिंदेंना खुलं आव्हान

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार राम शिंदे यांना खुलं आव्हान दिलं आहे. “राम शिंदे यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी एमआयडीसीचे कागदपत्र दाखवावे”, असं रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

11:36 (IST) 4 Jul 2024
चोरीचे वाहन नोंदणी प्रकरण : कारवाई झालेल्या ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांची संख्या सहावर

नागपूर : परराज्यातील चोरीच्या जड वाहनांची नोंदणी प्रकरणात विदर्भातील विविध आरटीओ कार्यालयातील काम काढलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची संख्या आता सहावर पोहोचल्याची सूत्रांची माहिती आहे. दुसरीकडे नियमबाह्य कारवाई असल्याचे सांगत संतापलेल्या अधिकाऱ्यांची संघटनेकडून आंदोलनाची चाचपणी सुरू केली आहे.

सविस्तर वाचा….

11:12 (IST) 4 Jul 2024
‘वसंत मोरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करतील’, संजय राऊत यांची माहिती

वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. मात्र, आता वसंत मोरे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, ‘वसंत मोरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत’.

10:52 (IST) 4 Jul 2024
लाडकी बहीण योजनेवरुन खासदार सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राज्य सरकारने अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये लाडकी बहीण योजनेचीही घोषणा केली आहे. आता राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर राष्ट्रावादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सरकार जुमल्यांचा पाऊस पाडत आहे, असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते वसंत मोरे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती. मात्र, आता वसंत मोरे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वसंत मोरे