Maharashtra Legislative Assembly Session : राज्य विधिमंडळ अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पुणे पोर्श अपघात प्रकरण, ड्रग्ज प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
त्यासंदर्भात विधानभवनाच्या बाहेरही राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत असल्याचं दिसून येत आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!
पोलीस कोठडीत असताना त्याने मागील वर्षात आणखी पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली.
दोन वर्षांपूर्वी एटापल्ली येथील तत्कालीन वादग्रस्त उपविभागीय दंडाधिकारी शुभम गुप्ता हे कंत्राटदारांना कारवाईची धमकी देत लाखो रुपयांच्या लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार डॉ. देवराव होळी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. दोन वर्षानंतर जागे झालेल्या प्रशासनाने अखेर चौकशीचे आदेश दिले आहे. सविस्तर वाचा…
शिवाजीनगर जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकातील सरकत्या जिन्यावरुन पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली.
राज्य सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १५ जुलैपर्यंतच असल्याने, महिलांनी पहिल्या दिवसापासूनच गर्दी केली आहे, पण या योजनेच्या नावाखाली अर्जदारांची लूट सुरू असल्याच्या घटना समोर आली आहे . सविस्तर वाचा…
बारा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या कीक बॉक्सिंग प्रशिक्षकाला मंगळवारी भायखळा पोलिसांनी अटक केली.
पुणे: 'स्वतःला हिंदू म्हणविणारे हिंसा करीत आहेत', अशा प्रकारचे विधान काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना केले होते. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध व्यक्त केला असून त्याचे पडसाद पुण्यात देखील उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील शनिपार चौकात पतित पावन संघटनेचे पुणे शहराध्यक्ष स्वप्निल नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा,अशा घोषणा देत, राहुल गांधी यांच्या छायाचित्राचे दहन देखील करण्यात आले.
शहरातील गंगापूर रस्त्यावरील प्राचीन वटवृक्ष वाचविण्यासाठी जमलेल्या पर्यावरणप्रेमींना मंगळवारी सुनावणीसाठी जमलेल्या एका गटाने मारहाण केली.
कोल्हापूर: नवोदिता घाटगे यांच्या २० लाखांच्या फसवणूक प्रकरणाला अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने आज आणखी पुढे नेत भाजप नेते समरजीतसिंह घाटगे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष शितल फराकटे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय महिलांच्या शिष्टमंडळाने सायबर क्राईम विभागाला निवेदन दिले. घाटगे यांनी आपल्याला हिप्नोटाईज केल्याच्या आठवड्यापूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले आहे.
तीन आठवड्यापूर्वी गुन्हा नोंद होऊनही आरोपींच्या मुसक्या का आवळल्या जात नाहीत? आरोपी जेरबंद होऊन कायदेशीर कारवाई न झाल्यास आम्हाला मोर्चा काढावा लागेल, असा इशाराही निवेदनात दिला आहे. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, रेखा आवळे, शाहीन महात, मीरा मोरे, श्रीमती कांबळे, पद्मजा भालबर, शीतल शिंदे, स्वाती मोरे आदी प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
तलाठी कार्यालयात महिलांची झुंबड उडाली असून याचा फायदा घेउन मोठ्या प्रमाणावर दलालाकडून सामान्य महिलांची लुबाडणूक सुरू आहे.
बई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने सहा महिन्यांपूर्वी ताबा देण्यास सुरुवात केलेल्या नव्या इमारतीतील घरांमध्ये गळती होत असून या प्रकाराची मुंबई मंडळाने गंभीर दखल घेतली आहे. एकीकडे इमारतींच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली आहे, तर दुसरीकडे ताबा देण्यात आलेल्या २०७ पैकी ९६ घरांमध्ये अंतर्गत बदल करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई : सागरी किनारा रस्ता प्रकल्पाच्या कामासाठी गेल्या किमान चार वर्षांपासून बंद असलेला मरिन ड्राइव्ह येथील पदपथ पर्यटकांसाठी नव्याने खुला करण्यात आला. मात्र, या पदपथावर पूर्वीसारखी वृक्षलागवड करण्यात आलेली नाही. नव्याने बांधलेल्या पदपथाखाली समुद्राचा भाग असल्यामुळे त्याठिकाणी वृक्षरोपांची लागवड करता येणार नाही. त्यामुळे सुमारे किलोमीटर अंतराचा पदपथ उजाड राहण्याची चिन्हे आहेत.
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १४ पारपत्र अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत १२ गुन्हे दाखल केले होत. याप्रकरणी सीबीआयने गेले दोन दिवस एका दलालाच्या घरी व कार्यालयात शोध मोहीम राबवली. त्यात रोख एक कोटी ५९ लाख रुपये, पाच डायऱ्या व डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
भाईंदर : पत्नीचे असलेले अनैतिक संबंध आणि ती दोन्ही मुलांना घेऊन निघून गेल्याने निराश झालेल्या व्यापार्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीतून याचा उलगडा झाला आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी मयताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आला आहे.
उरण : मंगळवारी सुटलेल्या सोसाट्याचा वारा अतिवृष्टी व खराब हवामान यामुळे भारतीय हवामान विभागाने समुद्रात धोक्याचा इशारा दिल्याने उरण मधील मोरा मुंबई जलसेवा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी व चाकरमानी यांना रस्ते मार्गाने लांबचा प्रवास करावा लागत आहे. ही सेवा शुक्रवारी सुरू होण्याची शक्यता बंदर विभागाने व्यक्त केली आहे.
कल्याण : कल्याण पूर्वेत जिम्मीबाग भागात राहत असलेल्या एका ४७ वर्षाच्या महिलेसह इतर तीन जणांची दोन भामट्यांनी आम्ही तुम्हाला मंत्रालयात शिपाई म्हणून नोकरीला लावतो, असे सांगून त्यांच्याकडून गेल्या चार वर्षाच्या काळात चाळीस लाख रूपये उकळले. पैसे देऊन चार वर्ष झाले तरी नोकरी नाहीच, पण दिलेले पैसेही परत मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या नागरिकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अटल सेतूला नव्हे, त्याच्या अॅप्रोच रोडला तडे पडले होते काही ठिकाणी. नाना पटोले अटल सेतूची पाहणी करायला चालले होते. मी म्हटलं जाऊन या, बघून या. पाण्यासारखा रस्ता बांधला आहे आम्ही - एकनाथ शिंदे</p>
"मला सांगा राहुल गांधी काय चुकीचं बोलले? त्यांनी कुठे हिंदुत्वाचा अपमान केला? त्यांना भगवान शंकराचा फोटोही दाखवण्याची परवानगी दिली नाही. हे हिंदुत्व आहे का? आपणही खुलेपणाने जय श्री रामच्या घोषणा देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी खुलेपणाने प्रचारसभांमधून जय श्रीरामच्या घोषणा देतात. पण जर भाजपाव्यतिरिक्त दुसरं कुणी तसं काही बोललं, तर लगेच तो गुन्हा ठरतो?" अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील एका कार्यक्रमात बोलताना छायाचित्रकारांविषयी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करीत येथील छायाचित्रकारांनी मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन निषेध नोंदविला.
पनवेल : पनवेलमध्ये दोन ठिकाणी घरफोडी झाली असून बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. या दोन्ही चो-यांमध्ये साडेपाच पाच लाख रुपयांचे दागीने चोरट्यांनी लंपास केले आहेत.
चोरीची पहिली घटना शनिवारी मध्यरात्री पनवेलमधील भिंगारी येथील टाटा पॉवर वसाहतीमध्ये घडली असून चोरट्यांनी शाम जाधव यांच्या घऱातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा ३ लाख २७ हजार रुपयांची चोरी केली. जाधव हे गावी गेले होते. त्यांचे घर बंद असताना ही चोरी केली.
दुसऱ्या घटनेत पनवेलमधील कोप्रोली या गावात कमांडर रेनाईसन्स सोसायटीतील रसिना अलिकोया यांच्या घरात चोरट्यांनी दोन लाख ३६ हजार रुपयांचे सोन्याचे दागीने चोरले. रसिना या रविवारी माहेरी तळोजा येथे गेल्यावर त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी घराचे दार व घरातील कपाटाचा दरवाजा तोडून ही चोरी केली.
शहरी भागातील रहिवाशांना ३०० युनिट पर्यंत मोफत वीज द्यावी या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नवी मुंबई तर्फे महावितरणला निवेदन देण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने वारंवार महानिर्मितीच्या कोराडी आणि खापरखेडा या दोन्ही वीज निर्मिती केंद्रांना कोळशापातून तयार होणाऱ्या राखेची योग्य विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले आहे. परंतु त्याकडे आजही दुर्लक्ष होत आहे. सविस्तर वाचा…
एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र सोमवारी दुपारी साडेचार वाजता दुचाकीवरील चोरट्याने खेचून चोरटा पसार झाला.
डोंबिवली : गृहप्रकल्पांची उभारणी करताना प्रकल्पाच्या ठिकाणी जलजन्य आजार, मलेरिया, डेंग्यु डासांची निर्मिती होणार नाही, अशा प्रतिबंधक उपाययोजना करण्यास टाळाटाळ करणाऱ्या डोंबिवलीतील ११ विकासकांना घनकचरा विभागाचे डोंबिवली विभागाचे मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर यांनी नोटिसा बजावल्या आहेत.
वर्धा : लोकसभा निवडणूक आटोपली. लगेच कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणाला आघाडी याची आकडेवारी घेत सर्वपक्षीय इच्छुक कामाला लागल्याचे चित्र आहे. नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होण्याचा अंदाज ठेवत हे संभाव्य उमेदवार चाचपणी करू लागले आहे.
पनवेल : पावसाळ्याचा पहिला महिना संपला तरी पनवेल महापालिका क्षेत्रात काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या आणि वाहतूक नियमनासाठी नेमलेल्या सुरक्षा वार्डनला रेनकोट न मिळाल्याने भीजत किंवा हातामध्ये छत्री घेऊन कर्तव्य बजावताना जवान पनवेलमध्ये दिसत आहेत. याबाबत पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारले असता पावसाळी रेनकोट देण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची असल्याचे सांगण्यात आले.
अलिबाग : पावसाळ्यात समुद्राला मोठी उधाणं (भरती) येतात. या उधाणाचा किनारपट्टीवरील भागांना तडाखा बसतो. शेतात आणि गावांत पाणी समुद्राचे आणि खआडीचे पाणी शिरल्याने पूरसदृश्य परिस्थिती उद्भवते. ज्यामुळे पिकांचे आणि घरांचे नुकसान होते. पण नैसर्गिक आपत्तीत या उधाणांचा समावेश नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहतात.
प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी हल्लेखोर मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. मिश्रा याच्या या प्रकरणातील सहभागाचा दावा संशयास्पद असल्याचे सकृतदर्शनी मतही न्यायायालयाने त्याला जामीन मंजूर करताना व्यक्त केले.
विधानभवनात आज आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकमेकांकडे पाहून स्मितहास्य केलं. त्यांच्या स्मितहास्याची विधानभवन परिसरात चर्चा आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या किनारी सुरू असलेल्या शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पात घाट निर्मितीच्या कामाच्या ठिकाणी एक जुने भव्य पिंपळाचे वृक्ष उन्मळून पडल्याचे समोर आले. येथे सुरू असलेल्या कामामुळे हे वृक्ष उन्मळून पडल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा