Maharashtra Legislative Assembly Session : राज्य विधिमंडळ अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्प मांडल्यानंतर त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा होताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर अधिवेशनात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पुणे पोर्श अपघात प्रकरण, ड्रग्ज प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
त्यासंदर्भात विधानभवनाच्या बाहेरही राज्याच्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत असल्याचं दिसून येत आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!
मुंबई : इंडियन ओव्हरसीज बँकेशी संबंधित १८० कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याच्या प्रकरणात मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने फरारी आर्थिक गुन्हेगार उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या नावे अजामीनपात्र वॉरंट बजावले.
यवतमाळ : राज्य सरकारने मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली. सोमवारी, १ जुलैपासून ही योजना अंमलात आली मात्र पहिल्याच दिवशी तहसील कार्यालय आणि सेतूंवर उत्पन्नाचा दाखला व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी बहिणींनी तोबा गर्दी केल्याने प्रशासनाचे सर्व नियोजन कोलमडले.
नागपूर : विद्यमान खासदार असूनही केवळ भाजपने विरोध केल्यामुळे लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या कृपाल तुमाने (रामटेक) आणि भावना गवळी (यवतमाळ-वाशीम) या माजी खासदारांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय शिंदे गटाने घेतला आहे.
मुंबई : मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या दंगलीतील संशयीत आरोपीला ३१ वर्षांनंतर पुन्हा अटक करण्यात रफी अहमद किडावाई (आरएके) मार्ग पोलिसांना यश आले. आरोपीला शिवडी येथून अटक करण्यात आली.
वर्धा : सोमवारपासून तीन ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार झाले. त्याऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे अंमलात येणार. यापुढे सर्व फौजदारी गुन्हे नोंदविण्यापासून ते त्यांचा तपास व न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितानुसार राबविल्या जाईल. नव्या कायद्यात तीन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण न्यायप्रक्रिया पूर्ण करण्याची तरतूद आहे. ३० जूनच्या मध्यरात्री बारानंतर घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याची नोंद नवीन कायद्यानुसार करावी, असे आदेश आलेत.
अमरावती : राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना अशी ओळख असलेली ‘जलयुक्त शिवार योजना’ निधीसाठी पूर्णतः परावलंबी झाली असल्याचे वास्तव आहे. या योजनेचे भवितव्य आता केवळ अभिसरण निधीवरच अवलंबून राहिले असल्याचे चित्र असून, या योजनेला आता निधीचे सिंचन आवश्यक मानले जात आहे.
पनवेल : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला जमीन दिलेल्या शेतक-यांनी सोमवारी मंत्रालयावर पायी मोर्चाचे आयोजन केले होते. पनवेल शहर पोलीसांनी मोर्चेकरींना करंजाडे पुलावर रोखून धरले. या दरम्यान पोलीसांच्या मध्यस्थीने मंत्रालयात मंत्री शंभुराजे देसाई यांनी आंदोलकांना बैठकीचे आश्वासन दिल्यावर आंदोलन सोमवारी रात्री ८ वाजता स्थगित करण्यात आले.
अध्यक्ष महोदय.. तुमच्या डोक्यावर सत्यमेव जयते लिहिलंय. दादा भुसेंनी फक्त सत्य सांगावं. अध्यक्षांच्या किंवा दादा भुसेंच्या चालकाला जो पगार मिळतो, तो एसटी महामंडळाच्या चालकाला का मिळत नाही. तुमचे चालक एसीमधून फिरतात. पण एसटीचा चालक भर उन्हाच एसटीत बसलं की चौफेर घाम येतो. त्याचे कष्टही जास्त आहेत. पण त्याला पगार कमी आहे. शिवाजी महाराजांनी फक्त अन्यायासाठी अफजलखान फाडला होता. तुम्ही अन्याय का करत आहात? किमान वेतन कायदा सांगतो की किमान १४ हजाराच्या वर आपण वेतन दिलं पाहिजे. शासनच जर कायदा मोडत असेल, तर थोबाडीत कुणाच्या मारायचं? काय सत्य आहे, काय असत्य आहे हे सांगा ना तुम्ही? तुम्हाला राग काय येत नाही? याची लाज वाटली पाहिजे थोडी. एका चालकाला तुम्ही २५ ते ३० हजार पगार देता आणि जो सगळ्यांची सेवा करतो, त्याला तुम्ही १२ हजार पगार देता? याची तुम्हाला लाज वाटत नाही का? – बच्चू कडू
ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सातारा : महाबळेश्वर-तापोळा मुख्य रस्त्यावर महाबळेश्वरपासून नऊ कि.मी. अंतरावर चिखली शेड परिसरात सोमवारी पहाटे दरड कोसळली. डोंगरावरून राडारोडा आणि मोठे दगड खाली आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये बजरंग सोनवनेंकडून पराभूत झाल्यानंतर आता पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेतेमंडळी व पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून सोमवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे. यावर आज भाजपाचे नेते पुन्हा एकदा विधान परिषदेत आक्रमक झाले. यानंतर विधान परिषदेचे कामकाज एका तासासाठी स्थगित करण्यात आले.
लोणावळा : पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या लोणावळ्यात गेल्या २४ तासात १३६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याआधी १२ जून ला यावर्षीचा सर्वाधिक पाऊस कोसळला होता.
ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर वन परिक्षेत्रातील काही हॉटेल आणि ढाब्यांमध्ये शनिवारी रात्री क्रिकेट सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. हॉटेलमध्ये मोठा गोंधळ घातला जात होता. संतप्त झालेल्या नागरिकांनी येऊर येथील उपवन प्रवेशद्वारावर आंदोलन केल्यानंतर उशीराने जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने येथील सात ढाबे आणि हॉटेलवर कारवाई केली. ‘गारवा’ या हॉटेलच्या मालकाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मुंबई : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मुंबईमधील म्हाडाच्या घरांच्या सोडतपूर्व प्रक्रियेला सुरुवात करण्याचा मुंबई मंडळाचा प्रयत्न असून मुंबई मंडळ आता सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याची तयारी करीत आहे.
भाजपानं कुणाला कायदे शिकवायची गरज नाही. ज्या पक्षानं १५० खासदारांना निलंबित केलं होतं, त्यांनी संसदीय कायदे, भाषा शिकवण्याची गरज नाही. त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मागणी करून काय फायदा? त्यांनी सभापतींकडे मागणी करावी. त्यांना जे करायचं ते करू द्या, आता त्यांना नियम, कायदे, संविधान आठवायला लागले आहेत. मी शिवसैनिक आहे, शिवसेनेच्या बाण्याने मी बोललो आहे – अंबादास दानवे</p>
नाशिक – विविध कारणांनी गाजलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी सकाळपर्यंत चाललेल्या मतमोजणीत अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजय मिळवला.
मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षणाची शिफारस करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करायचे की नाही, यावरून याचिकाकर्त्यांतील मतभेद सोमवारी उच्च न्यायालयात उघड झाले.
विधान परिषदेत सोमवारी (१ जुलै) सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावर संजय राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या हातात जेव्हापासून राज्याची सूत्र गेली तेव्हापासून त्यांनी ज्या भारतीय जनता पक्षाची झालर टाकून टोळ्या बनवल्या आहेत. त्या टोळ्यांना त्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते जरुर आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेत्याचे सर्व शिष्टाचार पाळले आहेत. पण आमच्या अंगावर कोणी येत असेल तर शिवसैनिक म्हणून आम्हाला त्यांच्यावर त्या पद्धतीने चाल करावी लागेल”, असं संजय राऊत यांनी म्हटंल.
मुंबई : राज्यात १ जुलैपासून लागू झालेल्या नवीन कायद्यांअंतर्गत राज्यभरात रात्री उशिरापर्यंत २४४ गुन्हे दाखल झाले.
अंबादास दानवेंनी सोमवारी विधानपरिषदेत केलेल्या विधानांसाठी माफी मागावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील आमदार व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानावर प्रसाद लाड यांनी तीव्र आक्षेप घेतला असून त्याचा विरोध करण्यासाठी त्यांनी आज सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE: राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा