Maharashtra Vidhimandal Adhiveshan Updates : महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरू झालं आहे. हे राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारचं शेवटचं अधिवेशन असल्यामुळे सरकार कोणत्या नव्या घोषणा करतंय? राज्यातील आरक्षणाचा तापलेला विषय कशा पद्धतीने मार्गी लावला जातोय? विरोधक सरकारविरोधात कोणते मुद्दे मांडणार? याकडे राज्यातील जनतेचं लक्ष लागलं आहे. अधिवेशनासह राज्यभरात घडणाऱ्या राजकीय तसेच इतर बातम्यांचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

Live Updates

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE Day 1 : विधीमंडळात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा

20:51 (IST) 27 Jun 2024
शिखर बँक गैरव्यवहार प्रकरण : प्रकरण बंद करण्याच्या अहवालाबाबत मुंबई पोलीस- ईडी पुन्हा परस्परविरोधी भूमिकेत

ईडीला अर्ज करण्याचा अधिकार नसल्याचा दावा करून मुंबई पोलिसांनीही गुरूवारी या अर्जाला विरोध करून पुन्हा एकदा विरोधी भूमिका घेतली.

सविस्तर वाचा...

20:34 (IST) 27 Jun 2024
वाढत्या मागणीमुळे जंगलातील सफेद मुसळीच्या प्रमाणात घट

सुमारे १५ वर्षांपूर्वी कवळीची भाजी मुबलक प्रमाणात जंगलात आढळत असे.

सविस्तर वाचा...

20:16 (IST) 27 Jun 2024
महायुतीमध्ये अजित पवार नकोत! शिरूरमधील आढावा बैठकीत भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या मागणीने वाद उघड

शिरूरचे जिल्हा उपाध्यक्ष चौधरी यांनी यावेळी अजित पवार महायुतीत नको, अशी भूमिका घेतली.

सविस्तर वाचा...

19:24 (IST) 27 Jun 2024
मिरा-भाईंदरमधील अनधिकृत बारवरील कारवाईस सुरुवात

भाईंदरर : मिरा-भाईंदरमधील अनधिकृत बार विरोधात कारवाईची मोहीम अखेर महापालिका प्रशासनाने गुरुवारपासून हाती घेतली आहे. पहिल्या टप्प्यात एकूण २२ बारवर ही कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून जाहिर करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर...

19:23 (IST) 27 Jun 2024
सातारा : महिलांसाठी कडक कायदे असूनहीन अन्याय अत्याचाराच्या घटना वाढताहेत-चाकणकर

वाई: महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कडक कायदे असूनही त्यांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. या घटना रोखण्यासाठी महिलांनी पुढे येऊन तक्रार करावी. तक्रारींची राज्य महिला आयोग सोडवणूक करुन पिडीतांचे जीवन सुखमय होण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात 'महिला आयोग आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत महिलांच्या तक्रारींबाबत सुनावणी घेण्यात आली. यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव एन.एन. बेदरकर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे, एकात्मिक ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, जिल्हा संरक्षण अधिकारी चेतन भारती आदी उपस्थित होते.

18:47 (IST) 27 Jun 2024
मेट्रो ३ : आरे ते बीकेसी टप्प्याच्या आरडीएसओ चाचण्या पूर्ण, आता लवकरच सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेला होणार सुरुवात

एमएमआरसीकडून ३३.५ किमी लांबीच्या भुयारी मेट्रो ३ चे काम सुरु आहे. तर ही मार्गिका आता तीन टप्प्यात वाहतूक सेवेत दाखल करण्याचा निर्णय एमएमआरसीने घेतला आहे.

सविस्तर वाचा...

18:46 (IST) 27 Jun 2024
पनवेलमध्ये १ मेट्रीक टन प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त

पनवेल महापालिका मधील पनवेल, कामोठे, कळंबोली व खारघर या परिसरातून १ मेट्रीक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त केला.

सविस्तर वाचा...

18:30 (IST) 27 Jun 2024
“पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी”, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेती दौऱ्यांवरून टोला लगावला होता. "मिंधे अमावस्या-पौर्णिमेला पंचतारांकित शेती करायला जातात", असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. “राज्यातले शेतकरी भीषण परिस्थिती सामना करत आहेत. सरासरी रोज एक शेतकरी एकट्या अमरावती जिल्ह्यात आत्महत्या करतो आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना या खोके सरकारने लवकरात लवकर कर्जमुक्त केलं पाहिजे”, अशी मागणी ठाकरे यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “लंडनमधल्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी की नाही? शेतकऱ्यानं चांगली पंचतारांकित शेती करू नये का? नगदी पिकं घेऊ नयेत का? त्यांच्या डोक्यात अमावस्या-पौर्णिमा चालतात. लिंबू-मिरच्यावाले विचार असतात. मी त्यांना माझ्या शेतातली सगळी फळं पाठवेन”

18:13 (IST) 27 Jun 2024
शक्तीपीठ महामार्गाला शेकडो शेतकऱ्यांच्या हरकती

सांगली : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविण्यासाठी बाधित होणार्‍या गावातील शेकडो शेतकर्‍यांनी गुरूवारी प्रांताधिकार्‍यांकडे हरकती नोंदवल्या.

वाचा सविस्तर...

18:12 (IST) 27 Jun 2024
सांगलीत ४५ लाखाचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त

सांगली : सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील एका शेडवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या विशेष भरारी पथकाने छापा टाकून ४५ लाख २५ हजार रूपये किंमतीचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी गुरुवारु दिली.

वाचा सविस्तर...

17:07 (IST) 27 Jun 2024
चंद्रपूर : धारदार शस्त्राने महिलेचा खून, बाबा आमटेंच्या आनंदवनात पहिल्यांदाच…

चंद्रपूर: अंध वडिलांना घेऊन आई सेवाग्राम येथे उपचारासाठी गेल्याने विवाहित महिला वडिलांच्या घरी एकटी होती. यादरम्यान अज्ञात आरोपीने शस्त्राने वार करून तिचा खून केल्याची घटना बुधवार २६ जूनच्या रात्री घडली. मृत महिलेचे नाव आरती दिगंबर चंद्रवंशी (२४) असे आहे. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथील अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

16:58 (IST) 27 Jun 2024
तरुणीने AI चा वापर करत काढला मुलाचा आवाज, मैत्रिणीची केली फसवणूक

भाईंदर : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याच मैत्रिणीला फसवणाऱ्या एका तरुणीला काशिगाव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणीने मुलाचा आवाज काढून फिर्यादी तरुणीला लाखो रुपये उकळले होते.

वाचा सविस्तर...

16:57 (IST) 27 Jun 2024
शिळफाटा रस्त्यावरील टपऱ्या, गॅरेज, झोपड्यांवर कारवाई

कल्याण : कल्याण शिळफाटा रस्त्यावर दोन महिन्यापासून कल्याण-तळोजा मेट्रोचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे या रस्त्यावर वाहन कोंडी होत आहे. ही कोंडी टाळण्यासाठी शिळफाटा रस्त्यालगतच्या झोपड्या, गॅरेज, टपऱ्या, निवारे पालिकेच्या ई प्रभागाच्या तोडकाम पथकाने जमीनदोस्त केले.

वाचा सविस्तर...

16:47 (IST) 27 Jun 2024
‘एमपीएससी’ देणाऱ्या महिला उमेदवारांना दिलासा, खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ‘नॉन क्रिमिलेअर’ची अट रद्द

नागपूर: महाराष्ट्र लोक सेवा आयोगाने (एमपीएससी) खुल्या प्रवर्गातील दोन महिला उमेदवारांना सधन गटात मोडत (नॉन क्रिमिलेअर) असल्याचे प्रमाणपत्र नसल्यामुळे ‘पशुधन विकास अधिकारी’ पदाच्या गुणवत्ता यादीमधून वगळले होते. यावर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) औरंगाबाद खंडपीठाने शासन निर्णयाला आधार घेत ‘नॉन क्रिमिलेअर’ची अट रद्द करत या दोन्ही उमेदवारांना सहा आठवड्यांच्या आत नियुक्तीचे आदेश दिले आहेत.

सविस्तर वाचा...

15:38 (IST) 27 Jun 2024
नवी मुंबई: सीवूड्स वाहतूक शाखेला १५ वर्षांनंतर हक्काची जागा

सीवूड्स रेल्वेस्थानकातील मॉलमुळे या परिसरात सातत्याने वाहनांची गर्दी असते. त्यामुळे या परिसरात हक्काची जागा वाहतूक विभागाला हवी होती.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 27 Jun 2024
नवी मुंबई: बहुउद्देशीय इमारतीचा तिढा सुटण्याची चिन्हे, दोन वर्षांनंतर भोगवटा प्रमाणपत्र मिळणार

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक फळ बाजारात उभारण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

सविस्तर वाचा...

15:10 (IST) 27 Jun 2024
गडचिरोलीत आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे; उपचाराअभावी ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, रुग्णवाहिका वेळेत…

गडचिरोली : अचानक प्रकृती खालावल्यानंतर वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने उपचाराअभावी ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. आर्यन अंकित तलांडी (४, रा. कोरेली ता. अहेरी) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना २४ जून रोजीची असून तीन दिवसांनंतर उघडकीस आली. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.

सविस्तर वाचा...

15:09 (IST) 27 Jun 2024
महाराष्ट्राची अधोगती; दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत सहाव्या क्रमांकवर घसरण, 'हे' राज्य पहिल्या स्थानी

महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरू झालं आहे. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. त्यानुसार महाराष्ट्राचं २०२३-२४ मध्ये दरडोई उत्पन्न २,७७,६०३ रुपये इतकं अपेक्षित असून २०२२-२३ मध्ये ते २,५२,३८९ रुपये इतकं होतं. तसेच २०२३-२४ मध्ये देशाचं दरडोई उत्पन्न १,८३,२३६ रुपये असून गेल्या वर्षी ते १,६९,४९६ रुपये इतकं होतं. २०२२-२३ मध्ये दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत तेलंगणा राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून त्याखालोखाल कर्नाटक, हरियाणा, तामिळनाडू, गुजरात ही राज्ये असून महाराष्ट्र याबाबतीत सहाव्या क्रमांकावर आहे.

14:59 (IST) 27 Jun 2024
अमरावती : अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; ४ हजार ९७८ विद्यार्थ्‍यांचा गुणवत्‍ता यादीत समावेश

अमरावती : विद्यार्थी आणि पालकांसाठी बहुप्रतीक्षित अकरावी केंद्रीय प्रवेशाची गुणवत्‍ता यादी गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्‍यात आली असून प्रथम गुणवत्‍ता यादीत ४ हजार ९७८ विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्‍यांना १ जुलैपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांमध्‍ये प्रवेश घ्‍यावयाचे आहेत, अशी माहिती केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समन्‍वयक प्रा. अरविंद मंगळे यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा...

14:55 (IST) 27 Jun 2024
खंडणी प्रकरणी कथित पत्रकार आणि त्याच्या महिला साथीदार अटक

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तात्काळ हालचाल करीत दोन्ही आरोपींना अटक केले आहे.

सविस्तर वाचा...

14:47 (IST) 27 Jun 2024
नवी मुंबई : कोपरखैरणे पोलिसांकडून ३१ नागरिकांना मोबाइल सुपूर्द

मोबाइल गहाळ झाल्यावर वा चोरी झाल्यावर तो शोधणे आता सोपे झाले आहे.

सविस्तर वाचा...

14:36 (IST) 27 Jun 2024
कोकण रेल्वे पनवेलपर्यंतच! पुढील एक महिना काही गाड्या एलटीटीऐवजी पनवेलपर्यंतच धावणार

कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंत धावेल आणि पनवेलवरूनच सुटेल.

सविस्तर वाचा...

14:35 (IST) 27 Jun 2024
उरण: जेएनपीए बंदर मार्गावर रसायनाचा टँकर उलटला, बंदराकडे जाणारा रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू

जेएनपीए बंदरात जाणाऱ्या मार्गावरील पीयुबी येथील उड्डाणपूला खाली हा कंटेनर उलटला आहे.

सविस्तर वाचा...

13:24 (IST) 27 Jun 2024
अकरावी प्रवेश प्रक्रिया : पहिली प्रवेश यादी जाहीर

मुंबई : मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावीची केंद्रीय प्रवेशाची पहिली प्रवेश यादी आज (२७ जून) सकाळी १० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईतील नामांकित महाविद्यालयांचे प्रवेश पात्रता गुण हे नव्वदीपार गेले आहेत. पहिल्या प्रवेश यादीअंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जून (सकाळी १० वाजल्यापासून) ते १ जुलै (सायंकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा आहे.

सविस्तर वाचा...

13:18 (IST) 27 Jun 2024
फडणवीसांना भेटल्यानंतर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे दोघेही विधान भवनाच्या पहिल्या मजल्यावर लिफ्टमधून बाहेर पडले आणि दोघेही वेगवेगळ्या दिशेला निघून गेले. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी उद्धव ठाकरे यांनादेखील लिफ्टमध्ये काय बोलणं झालं? असा प्रश्न विचारला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, "लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी त्याचा विचार करावा."

13:12 (IST) 27 Jun 2024
उद्धव ठाकरे, फडणवीस विधान भवनाच्या एकाच लिफ्टमध्ये... काय चर्चा झाली? भुजबळ म्हणाले...

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून (२७ जून) सुरू झालं आहे. या अधिवेशनासाठी सर्वपक्षीय नेते आणि आमदार विधीमंडळात दाखल झाले आहेत. दरम्यान, शिसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख तथा विधान परिषदेतील आमदार उद्धव ठाकरे हेदेखील अधिवेशनासाठी विधान भवनात दाखल झाले. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि भाजपा नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी विधानभवनातील एकाच लिफ्टने प्रवास केला. यावेळी त्यांच्याबरोबर प्रवीण दरेकर, छगन भुजबळ आणि मिलिंद नार्वेकरही लिफ्टमध्ये होते. यावेळी ठाकरे आणि फडणवीस यांच्यात काही बोलणं झालं का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

लिफ्टमधून बाहेर पडल्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी छगन भुजबळांना प्रश्न विचारल्यावर भुजबळ म्हणाले, आम्ही सर्वजण तळमजल्यावरून पहिल्या मजल्यावर गेलो. लिफ्टमध्ये जाणं आणि बाहेर पडण्यात वेळ गेला. त्यामध्य किती भेटणार, किती बोलणार? लिफ्टमध्ये सर्वांनी हस्तांदोलन केलं. कसे आहात वगैरे विचारलं. नेहमीप्रमाणे एखादा ओळखीचा नेता भेटल्यावर करतात ते सोपस्कार केले.

13:10 (IST) 27 Jun 2024
पृथ्वीवरील अस्तित्त्वासाठी नैसर्गिक जलप्रवाह पूररेषेचे अचूक सीमांकन आवश्यक, उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई : पृथ्वीवरील अस्तित्त्व टिकवण्यासाठी नैसर्गिक जलप्रवाहांच्या पूररेषांचे योग्य आणि अचूक सीमांकन करणे अत्यंत आवश्यक आहे. तसे न केल्यास पूररेषांच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागेल, असे उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले.

सविस्तर वाचा...

13:09 (IST) 27 Jun 2024
पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी आता ‘सहकार’, जाणून घ्या केंद्रीय सहकार विभागाचा निर्णय

अकोला : ‘राष्ट्रीय जल जीवन मिशन’अंतर्गत ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कृषी सहकारी पतसंस्थांवर देण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय केंद्रीय सहकार विभागाने घेतला असून राज्यातील हजारो सहकारी पतसंस्थांना याचा लाभ होईल आणि पाणीपुरवठा योजनादेखील सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.

सविस्तर वाचा...

13:08 (IST) 27 Jun 2024
बुलढाणा : भक्ती महामार्गाविरोधात आंदोलन पेटले; ४६ गावातील ग्रामस्थ रस्त्यावर

बुलढाणा: प्रस्तावित सिंदखेडराजा ते शेगाव भक्ती महामार्गाविरोधात आंदोलन पेटले आहे. आज सुमारे शेहचाळीस गावातील शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. विधिमंडळच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक ठिकाणी गावकऱ्यांनी निदर्शने केली.

सविस्तर वाचा...

13:02 (IST) 27 Jun 2024
अजित पवारांकडून महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सादर

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. या अहवालानुसार महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ७.६ टक्क्यांनी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.तर देशाच्या अर्थव्यवस्थेतही ७.६ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही १.९ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.