Maharashtra Breaking News : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे. आज विधानभवनात ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार सर्वजण बनले आहेत. कारण, विश्वविजेते भारतीय खेळाडू आज विधानभवनात दाखल झाले. त्यांच्यासाठी विधानभवनाच्या सभागृहात खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल हे खेळाडू आज विधानभवनात आले. या खेळाडूंचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसंच, त्याआधी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानीही ते दाखल झाले होते.

तर, दुसरीकडे राज्यातील तामपानात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघ काल ४ जुलै रोजी मुंबईत आले होते. त्यांच्या स्वागतासाठी अवघी मुंबापुरी मरीन ड्राईव्हवर जमली होती. पंरतु, या रोड शोला गुजरातहून बस मागवण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील राजकारण या प्रकरणामुळे तापण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी, राजकीय अपडेट्स जाणून घेऊयात.

Live Updates

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : राज्यातील घडामोडी जाणून घ्या

19:25 (IST) 5 Jul 2024
कोल्हापुरात पाणी पातळीत किंचित घट; जांबरे प्रकल्प काठोकाठ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा किंचित कमी झाला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळीत काहीशी ओसरली आहे. साळगाव या बंधाऱ्यावरील पाणीही कमी झाले आहे. तर जाम्भरे प्रकल्प शुक्रवारी पहाटेपासून ओसंडून वाहू लागला आहे.

वाचा सविस्तर…

19:24 (IST) 5 Jul 2024
खंडणीसाठी वारकऱ्यास धमकी देणे निंदनीय, संत निवृत्तीनाथ संस्थानकडून निषेध

नाशिक : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीतील ज्येष्ठ वारकरी तथा नाशिकचे माजी विश्वस्त पुंडलिकराव थेटे यांना एक लाखाच्या खंडणीसाठी एका राजकीय पक्षाचे नाव घेऊन धमकी देणे हा प्रकार अत्यंत निंदनीय असून यामागे कोणत्या छुप्या शक्ती कार्यरत आहेत याचा पोलिसांनी शोध घ्यावा, अशी मागणी संत निवृत्तीनाथ संस्थानचे सचिव तथा विश्वस्त अमर ठोंबरे यांनी केली आहे.

वाचा सविस्तर…

19:23 (IST) 5 Jul 2024
‘गोकुळ’चा मुंबई, पुण्यातील ग्राहकांना फटका; दूध महागले

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाने दूध विक्रीत प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई, पुणे या महानगरातील ग्राहकांच्या खिशाला झळ बसणार आहे.

वाचा सविस्तर…

17:38 (IST) 5 Jul 2024
विधानभवनात रोहित शर्माचं मराठीतून भाषण; म्हणाला, “असा कार्यक्रम…”

“सगळ्यांना मोठा नमस्कार माझा. मुख्यमंत्री खूप धन्यवाद. बरं वाटलं सर्वांना पाहून. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असा कार्यक्रम कधी झाला नाहीय. असं बघून आम्हालाही आनंद झाला. असा कार्यक्रम आमच्यासाठी ठेवलाय. त्यामुळे भरपूर आनंद झाला. काल आम्ही जे पाहिलं मुंबईत ते आमच्यासाठी सर्व स्वप्नवत होतं. वर्ल्डकप इंडियात आणण्याचं आमचं स्वप्न होतं. ११ वर्षे आम्ही थांबलो होतो – रोहित शर्मा</p>

16:16 (IST) 5 Jul 2024
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जैस्वाल यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

16:14 (IST) 5 Jul 2024
पर्यावरणस्नेही सायकल वारीचे पंढरपूरकडे प्रस्थान

संपूर्ण राज्यातील सायकलपटू सात जुलै रोजी पंढरपूरमध्ये एकत्र येणार असून त्यांचा सायकल रिंगण सोहळा होणार आहे.

सविस्तर वाचा…

16:09 (IST) 5 Jul 2024
विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर दाखल, एकनाथ शिंदेंकडून जाहीर सत्कार!

16:02 (IST) 5 Jul 2024
लेखनिकाशिवाय अंध विद्यार्थ्यांचे आता स्वलेखन, ॲपच्या मदतीने प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी राज्यात १६०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

राज्यात अंध विद्यार्थ्यांसाठी ५० हून अधिक विद्यालये आहेत. यामध्ये १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिकत आहेत.

सविस्तर वाचा…

14:58 (IST) 5 Jul 2024
वायू प्रदूषण निवारणासाठी तरुणांचा पुढाकार, वातावरण फाउंडेशनच्या अहवालातून उघड

मुंबईमधील हवेची गुणवत्ता सुधारावी यादृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत असून त्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेतला आहे.

सविस्तर वाचा…

14:37 (IST) 5 Jul 2024
मंत्रालयातील नोकरी घोटाळा : आरोपींना उच्च न्यायालयाकडून जामीन

बेरोजगारांना मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी अनेक तरूणांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सविस्तर वाचा…

13:54 (IST) 5 Jul 2024
“महाराष्ट्राच्या वांगी उत्पादक ताईंना…”, लाडकी बहीण योजनेवर टीका केल्याने भाजपाचा सुळेंवर पलटवार

13:42 (IST) 5 Jul 2024
नवी मुंबई: कांदा बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा- बटाटा बाजारातील सिडको निर्मित इमारती वर्षनुवर्षं धोकादायक जाहीर होत आहेत.

सविस्तर वाचा…

13:30 (IST) 5 Jul 2024
पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, बूट, चप्पलचा खच; दोन डंपर, पाच जीप भरून कचरा संकलन, मरिन ड्राईव्ह परिसरात मुंबई महानगरपालिकेची रात्रभर स्वच्छता मोहीम

मरिन ड्राईव्ह परिसरात गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लाखोंच्या संख्येने क्रिकेटप्रेमी उपस्थित होते. स्वागत सोहळा आटोपल्यानंतर रात्री उशीरा गर्दी ओसरली.

सविस्तर वाचा…

13:09 (IST) 5 Jul 2024
महाराणी येसूबाईंची कर्तृत्वगाथा इतिहासात आजही उपेक्षित : राजेंद्र घाडगे

येसूबाईंच्या कर्तृत्व गाथेवर इतिहासाने म्हणावा तसा प्रकाश टाकला नाही अशी खंत ज्येष्ठ इतिहास संशोधक राजेंद्र घाडगे यांनी व्यक्त केली .

सविस्तर वाचा…

12:48 (IST) 5 Jul 2024
दिल्ली-मुंबई १२ तासांचे स्वप्न भंगणार, बडोदा-मुंबई महामार्गाचे काम सरासरी ४५ टक्के पुर्ण परंतू विरार अलिबागचे भूसंपादन अवघे २२ टक्केच

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी या दोन्ही शहरांचे प्रवास अंतर १२ तासांवर आणण्यासाठी बडोदा मुंबई महामार्गाचे बांधकाम सरासरी ४५ टक्के पुर्ण झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:35 (IST) 5 Jul 2024
“प्यार करोगे तो…”, शेरोशायरीतून अजित पवारांचा विरोधकांना इशारा

प्यार करोगे तो प्यार करेंगे, हात मिलाओंगे तो हात भई मिलाएंगे, गले मिलाए तो गले भी मिलाएंगे, सीतम करोगे तो सीतम करेंगे, हम आदमी है तुम्हारे जैसे, जो तुम करोंगे वैसे हम भी करेंगे, असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते विधानसभेत बोलत होते.

12:32 (IST) 5 Jul 2024
कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू, प्रवेशासाठी १७ हजार ९२६ जागा उपलब्ध

२०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये कृषीच्या नऊ अभ्यासक्रमांसाठी राज्यामध्ये २०३ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ९२६ जागा आहेत.

सविस्तर वाचा…

12:22 (IST) 5 Jul 2024
मुंबई: क्षय रुग्णसेवेत पालिकेचाच खोडा, २४ सक्षम क्षयरोग साथींना काम सोडण्याचे आदेश

रुग्णांच्या समुपदेशनात खंड पडण्याची शक्यात निर्माण झाली असून हे २४ जण बेरोजगार झाले आहेत.

सविस्तर वाचा…

11:57 (IST) 5 Jul 2024
पुणे: हडपसर भागात पुन्हा कोयता गँगची दहशत; वाहनांची तोडफोड

गेल्या काही महिन्यांपासून हडपसर भागात टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहे.

सविस्तर वाचा…

11:56 (IST) 5 Jul 2024
सीईटी कक्षाकडून प्रवेशाच्या संभाव्य तारखा जाहीर

सीईटी कक्षाकडून अन्य अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या.

सविस्तर वाचा…

11:55 (IST) 5 Jul 2024
शेतावर गेल्यानंतर मनाचा बकालपणा दूर होतो – नाना पाटेकर; ‘सागरिका म्युझिक’ कंपनीला २५ वर्षे पूर्ण, नाना पाटेकर यांचे कवी आणि गीतकार म्हणून पदार्पण

मनातले कागदावर उतरवत असताना तुमची घुसमट कागदावर उमटते. शहराच्या भिंतींमध्ये सातत्याने राहायला जमत नाही, असे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा…

11:54 (IST) 5 Jul 2024
ठाणे: पर्यटन अर्थार्जनावर पाणी, जिल्ह्यातील प्रमुख निसर्गस्थळांवर जाण्यास पर्यटकांना यावर्षीही मज्जाव

अंबरनाथ, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी आणि ठाणे तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी खाडी किनारा, धबधबे, तलाव आणि धरणांवर झुंबड उडते.

सविस्तर वाचा…

11:54 (IST) 5 Jul 2024
ठाणे: अनैतिक संबंधातून तरुणीची हत्या

मुंब्रा येथे एका विवाहित व्यक्तीने त्याच्या प्रेयसीची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

11:05 (IST) 5 Jul 2024
टीम इंडियाच्या स्वागताला गुजरातहून मागवली बस; संजय राऊत म्हणतात, “एका रात्रीत…”

पंतप्रधानांच्या संवदेनशीलतेवर सतत प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. जिथे उत्सव, आनंद असतो, जिथं जय असतो तिथे पंतप्रधान जातात. आपल्या निवासस्थानी सर्वांना बोलावतात. जसं काय ती ट्रॉफी त्यांनीच जिंकली आहे, असा त्यांचा वावर आहे. पण जिथं संकट आहे, समस्या आहे, लोक त्रासले आहेत. हाथरस, मणिपूरसारख्या ठिकाणी पंतप्रधान कधीच जात नाहीत. भारतीय क्रिकेट टीमला भेटायला मोदींकडे वेळ आहे. त्यांना भेटलंच पाहिजे. त्यांनी भेटू नये असं मी म्हणत नाही. त्यांना आशीर्वाद दिले पाहिजेत. पण ज्या राज्यातून लोकसभेतून निवडून आले आहात त्या राज्यातील सर्वांत मोठा अपघात घडला आहे. तिथं तुम्ही जात नाहीत. मणिपूरलाही तुम्ही गेला नाहीत. मग काय करू शकता?

त्यांच्या स्वागतासाठी गुजरातमधून बस आणावी लागली याचा अर्थ काय? आपल्या ताफ्यात अशा बसेस आहेत. नसती तर एका रात्रीत बनवून घेतली असते एवढी मुंबईची क्षमता आहे. गुजरात आहे म्हणून देश आहे असं दाखवून देताय का – संजय राऊत</p>

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : राज्यातील घडामोडी जाणून घ्या