Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. याच अधिवेशनात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार असल्यामुळे विधानसभेत मतांची जुळवाजुळव करण्याची लगबग सुरू आहे. शिवसेना उबाटा गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या रुपाने बारावा उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. तसेच अजित पवार गटाने अधिवेशनाबाबत घेतलेल्या बैठकीत आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यामुळे महायुतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. विधानसभेच्या एका मतासाठी आता नवाब मलिक यांचा पाठिंबा घेणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE | महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन लाईव्ह अपडेट्स
श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील दिंडीचे प्रमुख रामनाथ महाराज शिलापूरकर (७८) यांचे बुधवारी पहाटे पाच वाजता हृदयविकाराने निधन झाले.
येत्या १६ जुलै रोजी पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी येणा-या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा मोर्चातून देण्यात आला.
नाशिक - पोषण आहार, गरोदर मातांचा अमृत आहारासह अन्य सामान घरफोडीत चोरण्यात आल्याचे वणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील घटनेत उघडकीस आले. याशिवाय अन्य ठिकाणी झालेल्या घरफोडीत लाखोंचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील अंगणवाडीच्या खोलीत ठेवलेले सिलिंडर, जुना कुकर, स्टीलच्या ताटल्या, काचेचे तुकडे, चमचे, ध्वनीक्षेपक, लहान मुलांचा खेळण्यांचा संच, मुलांसाठी असलेल्या पूरक पोषण आहाराची पोती, ५० किलो वजनाच्या तांदळाची गोणी, मसूर, मटार, साखर, तेल, गरोदर मातांसाठी देण्यात येणारा अमृत आहार, मठाची दाळ, शेंगदाणे असा १६हजार २०५ रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. वणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत मालेगाव येथे तन्वीर खान (४१) यांच्या राहत्या घरी गच्चीच्या लोखंडी दरवाजाचा कडी कोयंडा तोडत चोरांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे रिंग, सोन्याचे पदक, हार, बांगड्या, पाच हजार रुपये रोख, असा एक लाख, ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
कळवण तालुक्यातील निवाणे येथेही घरफोडी झाली. अनिल आहेर (४०) यांचे श्री गणेश इलेक्ट्रिक ॲण्ड मोटार रिवायडिंग दुकान आहे. दुकानाचे कुलूप तोडून एक लाख, ३९ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत हिसवळ येथे निर्मला सोपनार (३७) यांचे बंद घर फोडत सोन्याचे ३० हजार रुपयांचे दागिने चोरण्यात आले. या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोल्हापूर : प्रीपेड मीटर्स रद्द करावीत या मागणीसाठी समाजवादी पक्षाच्या वतीने इचलकरंजी महावितरण समोर निदर्शने करण्यात आली. महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. महावितरण कंपनीने आणि राज्य सरकारने प्रीपेड मीटर्स लावण्याची योजना रद्द करावी. ३०० युनिटच्या आतील वीजवापर असणाऱ्या २ कोटी ग्राहकांचे मीटर्स बदलू नयेत, प्रीपेड मीटर च्या खर्चाचा कोणताही भार लावू नये, या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली.
प्रीपेड मीटर्स हटाव, प्रीपेड योजना रद्द करा, प्रीपेड मीटर्स घेणार नाही अशा विविध घोषणा देण्यात आल्या. शहर अध्यक्ष जाविद मोमीन, महिला आघाडीच्या अध्यक्षा उषा कांबळे, बाबासाहेब नदाफ, मुकुंद माळी यांची भाषणे झाली. प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रीपेड मीटर्स योजनेच्या संदर्भामध्ये तपशीलवार माहिती देऊन योजना रद्द का करावी याचे विवेचन केले.
अमेरिका, ब्रिटन, युरोपीय देशांसह जगभरातील ५० देशांना राज्यातून ३ लाख २४ हजार ४४१ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.
पिंपरीतील पवार आणि निगडीतील जाधव टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
संग्रामपूर तालुक्यातील समाजमन सुन्न झाले असून नराधम विकृत आरोपीविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी, अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढवण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्देश काल दिले होते. मात्र आता त्यानंतरही ही नोंदणी सुरू राहणार असल्याचे राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी आज सांगितले. सविस्तर बातमी वाचा
भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी विधान परिषदेत या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधून काही उपाय सूचविले.
'खबरदार हिंदू धर्माला नाव ठेवाल तर समुद्रात फेकून देईल - स्वामी विवेकानंद' अशा आशयाचे फ्लेक्स भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शहरातील अनेक ठिकाणी लावले आहेत.
कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी चौकात शिंदे शिवसेनेने बुधवारी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन केले. त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विधिमंडळाच्या परंपरेला गालबोट लावून सार्वभौम सभागृहात शिवीगाळ करण्याचा प्रकार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून घडला होता. त्यावरून त्यांना विधिमंडळ सभागृहातून निलंबित करण्यात आले आहे.या कृत्याच्या निषेधार्थ शिंदे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रतिकात्मक प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी दानवे यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यांची आमदारकी रद्द करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशा मागण्याही यावेळी करण्यात आली. जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, माजी नगरसेवक अमोल माने आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतर्फे रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.
यंदा या आजाराचे राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये ८ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागामध्ये चिंता व्यक्त होत आहे.
पंधरा दिवसांपूर्वी महापालिकेच्या पॅनलवरील अभियंत्यांनी सुरक्षित फलकाचा अहवाल दिला होता.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील पाटकर रस्त्यावरील डिलक्स दारू विक्री दुकानासमोरच ग्राहक दारू पिऊन धिंगाणा घालत होते. सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार अनेक वर्ष सुरू होता. महिला वर्गाला या रस्त्यावरून जाताना त्रास होत होता. सविस्तर वाचा…
रेणावी (ता.खानापूर) येथे एका शेतात छापा टाकून विटा पोलीसांनी सुमारे १० लाख रूपये मूल्याची २४० गांजाची झाडे जप्त केली. आज मध्यरात्री पोलीसांनी केलेल्या कारवाईमध्ये १०० किलो गांजा जप्त करून शेतमालकाला ताब्यात घेतले आहे. सविस्तर वाचा…
ही टोळी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमचा म्होरक्या सलीम डोळा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
नागपूर - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कळंब तालुक्यातील चापर्डानजिक सोमवारी पहाटे भरधाव कार ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला.
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळीतील ८४२ पात्र रहिवाशांना मंगळवारी पुनर्वसित इमारतींमधील घरांची हमी देण्यात आली. म्हाडाच्या मुंबई मंडळाने मंगळवारी पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी संगणकीय पद्धतीने सोडत काढून रहिवाशांना हमी दिली.
नागपूर : मद्याच्या नशेत भरधाव कार चालवून दोन तरुणांना चिरडणाऱ्या रीतिका ऊर्फ रितू मालूला तहसील पोलिसांनी मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालनाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पोलीस कोठडीची विनंती फेटाळून लावली आणि रितूला जामीन मंजूर केला. या प्रकरणात वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर तहसील पोलीस वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे.
भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य शासनाकडून अंत्योदय रेशन कार्ड असणाऱ्या लाभार्थ्यांना एक साडी भेट देण्याचा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर साडी वाटपास ब्रेक लागला होता. आता आचारसंहिता शिथिल झाल्यामुळे साडी वाटप सुरू करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
वाशीम : ‘लाडकी बहीण’ योजना लागू होताच तलाठी कार्यालयात उत्पन्न दाखला घेण्यासाठी महिलांची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्न दाखल्याची अट शिथिल करण्यात आली. परंतु याबाबत पाहिजे त्या प्रमाणात जनजागृतीच न झाल्याने महिला वर्गात प्रचंड संभ्रम आहे.
महाराष्ट्र सरकारने १ जुलै पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ मुस्लीम समाजातील महिलांना देऊ नये, अशी मागणी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे. मुस्लीम समाजातील ज्या महिलांना दोन पेक्षा अधिक मुलं आहेत. तसेच ज्या मुस्लीम पुरुषाला एकापेक्षा अधिक पत्नी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ देऊ नये, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांना सभागृहातच शिवीगाळ केली होती. त्यानंतर दानवे यांचे निलंबन करावे, यासाठी लाड आंदोलन करत होते. विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी दानवे यांचे पाच दिवसांचे निलंबन करण्याचे आदेश दिल्यानंतर आता अंबादास दानवे यांनी दिलगिरीचे पत्र उपसभापतींना दिले आहे.
सातारा: किसन वीर खंडाळा साखर कारखान्यांना एनसीडीसीकडुन ५०० कोटी रूपये मंजुर झाले आहेत. किसन वीरसाठी ३५० तर किसन वीर-खंडाळ्यासाठी १५० कोटी रूपयांचे कर्ज मंजुर झालेले आहे. सविस्तर वाचा…
मुंबई : पावसाळा सुरू झाला की साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. जूनमध्ये पावसाला सुरुवात झाल्याने मुंबईमध्ये विविध साथीच्या आजारांचे तब्बल १,३९५ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये गस्ट्रो आणि हिवतापाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या बृहत्सूचीतील घरांच्या सोडतीत गैरप्रकार झाल्याचा आरोप असून या आरोपाच्या अनुषंगाने जानेवारीपासून चौकशी सुरू आहे. या चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप म्हाडा उपाध्यक्षांकडे सादर झालेला नाही.
महाराष्ट्र ओनरशिप ॲफ फ्लॅट कायदा (मोफा) हा यापुढे स्थावर संपदा प्राधिकरणात (रेरा) नोंद नसलेल्या प्रकल्पांनाच लागू होणार आहे. तसे दुरुस्ती विधेयक सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आणले जाणार आहे. सविस्तर वाचा
७६ लाख रूपये किंमतीच्या कामाची निविदा मागे घ्यावी किंवा ११ लाखांची खंडणी द्यावी म्हणून महापालिका कार्यालयातच एका ठेकेदाराला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे वादग्रस्त जिल्हाप्रमुख मनीष काळजे व त्यांच्या मोटारचालकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा
अमरावती : चिखलदरा येथील भीमकुंड धबधबा या प्रेक्षणीय स्थळी माकडांनी उच्छाद मांडल्याने वनविभागाने १ आणि २ जुलै रोजी या धबधबा परिसरात पर्यटकांना प्रवेशबंदी केली होती. वनविभागाने या उपद्रवी माकडांना पिंजऱ्यात बंदिस्त करून बुधवारी सकाळी जंगलात सोडून दिले.