Maharashtra Breaking News Live : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. याच अधिवेशनात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी मतदान होणार असल्यामुळे विधानसभेत मतांची जुळवाजुळव करण्याची लगबग सुरू आहे. शिवसेना उबाटा गटाने मिलिंद नार्वेकर यांच्या रुपाने बारावा उमेदवार दिल्यामुळे निवडणुकीची चुरस वाढली आहे. तसेच अजित पवार गटाने अधिवेशनाबाबत घेतलेल्या बैठकीत आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यामुळे महायुतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत. विधानसभेच्या एका मतासाठी आता नवाब मलिक यांचा पाठिंबा घेणार का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE | महाराष्ट्र पावसाळी अधिवेशन लाईव्ह अपडेट्स
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देण्यात जे सरकारी कर्मचारी अडचण निर्माण करतील, त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर केले आहे.
वर्धा : भेंडी, शेंगा, वांगे, कोहळे अशा नियमित भाज्या खाऊन कंटाळा आलाय ? मग चला तर पौष्टिकतेने परिपूर्ण रानभाजी खायला. आर्वी परिसर हा जंगलाने वेढलेला. तसेच सर्वत्र माळरान पसरलेले. त्यात विविधतेने बाहरलेली झाडे. रानमेवा तर पावलोपावली. तसेच मंदसा नैसर्गिक दरवळ असलेल्या रान भाज्यांचा तर सुकाळच.
जे.जे. रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून बेमुदत आंदोलन सुरू केले असून या आंदोलनामुळे बाह्यरुग्ण सेवेवर फारसा परिणाम झाला नाही. सविस्तर वाचा…
महाराष्ट्र ओनरशिप ॲफ फ्लॅट कायदा (मोफा) हा यापुढे स्थावर संपदा प्राधिकरणात (रेरा) नोंद नसलेल्या प्रकल्पांनाच लागू होणार आहे. तसे दुरुस्ती विधेयक सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आणले जाणार आहे. सविस्तर वाचा…
७६ लाख रूपये किंमतीच्या कामाची निविदा मागे घ्यावी किंवा ११ लाखांची खंडणी द्यावी म्हणून महापालिका कार्यालयातच एका ठेकेदाराला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे वादग्रस्त जिल्हाप्रमुख मनीष काळजे व त्यांच्या मोटारचालकाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा…
अजित पवार गटाच्या बैठकीला नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यामुळे महायुतीत काही आलबेल नसल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यावर जोरदार टीका केली. नवाब मालिकांच्या मतांची गरज आहे, म्हणून कदाचित त्यांना बैठकीला बोलावले असणार, असा संशय व्यक्त करत वडेट्टीवार म्हणाले की, नवाब मलिक सोबत आहेत की नाहीत याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी करावा.
नागपूर : मोसमी पावसाने ताडोबाच्या जंगलात सर्वदूर हिरवळ पसरली आहे आणि त्यावर ताडोबाची सम्राज्ञी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या “कुवानी” या वाघिणीचे बछडे निसर्गाचा निर्विवाद आनंद लुटत आहेत. वन्यजीव छायाचित्रकार प्रियदर्शन गजभिये यांनी हा क्षण त्यांच्या कॅमेऱ्यात अलगदपणे टिपला आहे.
कल्याण – भिवंडी तालुक्यातील पडघा ग्रामंचायतीमध्ये सदस्यांकडून गैरकारभार सुरू आहे. या गैरकारभाराची चौकशी शासनस्तरावरून करून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पडघा येथील ग्रामविकास सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.
मागील वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आंदोलन सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अंतरवाली सराटी आणि जरांगे पाटील यांचे राहते गाव मातुरी येथे ड्रोनद्वारे टेहळणी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे. सरकारने लवकरात लवकर जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत आज छत्रपती संभाजी नगर शहरातील केंब्रिज चौक येथे मराठा बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
पुणे : बचत गटाच्या थकीत पैशाची मागणी करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर पाळीव श्वान सोडण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. श्वानाच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघावर दावा सांगतांना चंद्रपूर, बल्लारपूर किंवा चिमूर पैकी किमान एक विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी पदाचा राजीनामा देतील असा इशारा दिला आहे.
मुंबई : प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी कामगार संयुक्त कृती समितीची एसटी महामंडळ प्रशासनासोबत मंगळवारी बैठक पार पडली. राज्य सरकारसमोर तातडीने हा विषय मांडून, सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. मात्र आंदोलनाची भूमिका मागे घ्या, अशी चर्चा बैठकीत झाली. मात्र ठोस निर्णय जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत ९ ऑगस्टच्या आंदोलनाचा निर्णय मागे घेणार नसल्याचे ठाम भूमिका संघटनांनी घेतली आहे.
सातारा: शिरवळ येथे आयटी हब उभारणीसाठी निर्णय घेतला जाईल. यासाठी आरक्षण केले आहे. सातारा-पुसेगाव रस्त्यालगत औद्योगिक वसाहत मंजूर आहे. जिल्ह्यात एमआयडीसी विकसित करण्यात येत असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.
ठाणे : काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने पालकमंत्री शंभुराज देसाई यांना शोधा आणि गावठी कोंंबडा आणि वळगणीचे मासे (पहिल्या पावसातील माळरानावरील मासे) मिळवा, असे फलक मुरबाड शहरात लावल्याने खळबळ उडाली आहे.
वसई- आरती यादव हत्या प्रकरण ताजे असतानाच विरारमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. विरार रेल्वे स्थानकाच्या पादचारी पूलावर २७ वर्षीय महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला तिच्या पतीने केला असून प्रवाशांच्या मदतीने त्याला पकडण्यात आले आहे. सध्या महिलेवर विरारच्या संजीवनी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणाऱ्या मावळातील पवना धरण परिसरात अद्यापही पावसाचा जोर वाढला नाही. जून महिना कोरडाच गेला. धरण परिसरात केवळ २९४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणात १८ टक्के पाणीसाठा आहे.
ठाणे : प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठाणे रेल्वे स्थानकात फलाटांवर लावण्यात आलेल्या १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी ३४ कॅमेरे गेले अनेक आठवडे बंद असल्याची बाब उघडकीस आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या भागात कोणतीही दुर्घटना, अपघात वा गैरप्रकार झाल्यास याचे चित्रीकरण मिळवण्यात पोलिसांना अडचणी येण्याची शक्यता आहे.
पिंपरी- चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. पिंपरी- चिंचवड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे त्यांच्या इतर काही सहकाऱ्यांसह शरद पवार गटात जाण्याच्या हालचाली सुरू आहेत. नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं समोर आलेले आहे. परंतु, याबाबत शरद पवार हेच निर्णय घेतील, मी केवळ त्यांची भेट घडवून आणली असं मत शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी व्यक्त केलं आहे.
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १४ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचे पद भरले गेले नाही. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर सहयोगी प्राध्यापकाकडे वैद्यकीय अधीक्षकांची अतिरिक्त जबाबदारी देऊन वेळ काढला जात आहे. परंतु, सध्या ही जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नसतानाच शासनाने स्वत: या पदाचे आदेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.
कोल्हापूर : एकीकडे कागलमध्ये महायुतीतील दोन बड्या नेत्यांतील विधानसभेचा संघर्ष तापू लागला असताना याच तालुक्यातील बिद्री साखर कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पाच्या कारवाईचे पडसाद शेजारच्या राधानगरी – भुदरगड मतदारसंघाच्या राजकारणावर उमटू लागले आहेत.
मुंबई : उपनगरीय लोकलमध्ये २००६ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील दोषसिद्ध आरोपींच्या अपिलावर लवकरच सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे उच्च न्यायालयाने मंगळवारी आश्वासित केले. आरोपींनी दाखल केलेले अपील बरीच वर्षे प्रलंबित असल्याचे नमूद करून न्यायालयाने हे आश्वासन दिले.
मुंबई: दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही बंडखोर गटाचे नेते व आमदारांबरोबर सलोख्याचे संबध कायम राखणारे शिवसेना ठाकरे गटाचे सचिव व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर हे विधानपरिषदेच्या निवडणुकीत ‘खेळ’ करणार अशी चर्चा आहे.
नाशिक – बाजार समितीतील कांदा खरेदी आणि सरकारकडून नाफेड तसेच राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघामार्फत (एनसीसीएफ) केंद्रात केली जाणारी खरेदी यातील फरक, सरकारी खरेदीतील त्रुटी, सुधारणा करण्यासाठीचे उपाय अशा अनेक मुद्यांवर केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या समितीने लासलगाव येथे शेतकरी, बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी अशा विविध घटकांशी चर्चा केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल देवगिरी निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला नवाब मलिक यांनीही हजेरी लावली. या हजेरीवरून आता महायुतीमध्ये पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. याआधी नागपूर अधिवेशनात नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती.