Maharashtra Legislative Assembly Session : राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस. चौथ्या दिवशी कोणत्या मुद्द्यांवर सभागृहात खडाजंगी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आर्थिक पाहणी अहवालात राज्य सरकारने अनेक घोषणांची खैरात केली आहे. त्यामुळे यावरूनही चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. आत्महत्या रोखून त्यांना तत्काळ कर्जमुक्ती व्हावी यासाठी विरोधकांकडून मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तसंच, आज विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तर, दुसरीकडे राज्यात लहरी हवामान निर्माण झालं आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा देऊनही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे, राज्यातील राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी आणि पावसाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

19:34 (IST) 1 Jul 2024
वसई: पोलीस भरती चाचणीत उत्तेजक पदार्थाचे सेवन, ३ उमेदवारांविरोधात गुन्हे दाखल

पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान मैदानी चाचणीच्या वेळी ३ उमेदवारांकडे उत्तेजक पदार्थांचे साहित्य आढळले आहे.

सविस्तर वाचा…

19:24 (IST) 1 Jul 2024
नवी मुंबई विमानतळ प्रकल्प बाधितांचे आंदोलन रस्त्यावर रोखले

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पबाधितांचे पायी चालून आंदोलन करणा-यांना पोलीसांनी सोमवारी सकाळी रस्त्यावर रोखले.

सविस्तर वाचा…

19:20 (IST) 1 Jul 2024
पनवेल: करंजाडे, उलवेवासियांसाठी शासनाची वैद्यकीय सेवा कधी?

सिडको महामंडळ पनवेलच्या ग्रामीण भागात शहरे निर्माण केल्याने लोकवस्ती झपाट्याने वाढत चालली आहे.

सविस्तर वाचा…

19:15 (IST) 1 Jul 2024
जलसंकट कायम, धरणे तहानलेलीच; पाणीटंचाई बुलढाणेकरांच्या मानगुटीला

जिल्ह्यात आजअखेर पडलेला सरासरी पाऊस २०० मिलिमीटरच्या घरात असून अनेक तालुक्यात पावसाने द्विशतक पार केले आहे.

सविस्तर वाचा…

18:47 (IST) 1 Jul 2024
नाशिक: नवीन कायद्यांविरोधात आंदोलन

नव्या कायद्यांविरोधात सोमवारी संविधान सन्मान वकील समितीच्या वतीने जिल्हा न्यायालय प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा…

18:40 (IST) 1 Jul 2024
नवीन कायद्यांनुसार पहिल्याच दिवशी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद

नवरा दारू पिऊन त्रास देतो शिवीगाळ तसेच मारहाण करतो अशी तक्रार पिडीत विवाहितेने नव्या कायद्याचा आधार घेत पंचवटी पोलीस ठाण्यात केली.

सविस्तर वाचा…

18:32 (IST) 1 Jul 2024
सदाभाऊ खोत यांचे राजकीय पुनर्वसन

शेतकरी कुटुंबातील चळवळीतील कार्यकर्ते असलेले सदाभाऊ खोत यांना भाजपमधून पुन्हा एकदा विधानपरिषदेचे आमदार पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा…

18:24 (IST) 1 Jul 2024
नागपूर : आंबेडकर अनुयायी आक्रमक अन् अवघ्या तासाभरात विधानभवनातून स्थगिती…दीक्षाभूमीच्या भूमिगत वाहनतळविरोधात आंदोलन

दीक्षाभूमी एकात्मिक विकास प्रकल्पाअंतर्गंत भूमिगत वाहनतळाला नागपुरातील आंबेडकरी अनुयायांचा विरोध असून त्याविरोधात आज, सोमवारी आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा…

18:15 (IST) 1 Jul 2024
काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर

काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी

18:09 (IST) 1 Jul 2024
ओबीसी मतपेढीवर लक्ष ठेवूनच पंकजा मुंडे यांना आमदारकी ?

लोकसभा निवडणुकामध्ये भाजपला सपाटून मार खावा लागल्याने ‘माधव’ मतपेढी हातीची जाऊ नये म्हणून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा राजकीय पटावर होताना दिसत आहे.

सविस्तर वाचा…

17:56 (IST) 1 Jul 2024
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मातृशोक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्री प्रभावती कृष्णराव बावनकुळे यांचे आज सोमवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. स्थानिक खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्यामागे पती कृष्णराव, चार मुले, सूना, नातवंडं आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. दिवंगत प्रभावती बावनकुळे यांची अंत्ययात्रा उद्या मंगळवारी ( दि. २ जुलै) सकाळी १० वाजता त्यांच्या कोराडी येथील निवासस्थानावरून निघून कोलार घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

17:55 (IST) 1 Jul 2024
मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनिल परब यांचा विजय

मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२४ मध्ये शिवसेना-महाविकास-इंडिया आघाडीचे अधिकृत उमेद्वार ॲड.अनिल परब विजयी.

17:55 (IST) 1 Jul 2024
परदेशात नोकरीच्या आमिषाने ६० बेरोजगार तरूणांना ३६ लाखांचा गंडा

परदेशात भरपूर पगाराच्या  नोक-या मिळवून आमीष दाखवून एका टोळीने बेरोजगार तरूणांना आर्थिक गंडा घालण्याचा चालविलेला उद्योग उजेडात आला आहे. यात ६० तरूणांची फसवणूक झाली असून आर्थिक फसवणुकीची रक्कम ३६ लाख एवढी आहे.

सविस्तर वाचा…

17:54 (IST) 1 Jul 2024
सिद्धनाथ मंदिरात चांदीच्या मूर्तींची चोरी, सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्याला अटक

खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथील सिध्दनाथ मंदिरातील चांदीच्या दोन मुर्ती चोरीला जाण्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. परिसराती सीसीठीव्हीच्या माध्यमातून या चोरीची उकल करून पोलीसांनी या प्रकरणी अनिल सोरटे या संशयिताला अटक केली आहे. सविस्तर वाचा…

17:50 (IST) 1 Jul 2024
सांगलीच्या कडेगावमध्ये गॅस्ट्रोची साथ, ३६ जणांना गॅस्ट्रोची लागण, रुग्णालयात उपचार सुरु

कडेगांव येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून ३६ रूग्ण बाधित झाले असून काही रुग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी रूग्णालयास भेट देउन रूग्णांची विचारपूस केली.

सविस्तर वाचा…

17:49 (IST) 1 Jul 2024
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्मार्ट मीटरच्या बाजूने.. विरोध करणारी समिती म्हणते…

स्मार्ट प्रीपेड मीटरला सर्वसामान्य नागरिकांचा विरोध आहे. दिवसेंदिवस या मीटरविरोधात राज्याच्या वेगवेगळ्या भागात आंदोलन होत आहे. परंतु केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी मात्र स्मार्ट प्रीपेड मीटरच्या बाजूने आहेत .

सविस्तर वाचा…

17:48 (IST) 1 Jul 2024
पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण; बार व्यवस्थापकाला अटक

अंधेरी पश्चिम येथील बारमध्ये हुक्का तपासणीसाठी गेलेल्या पोलीस शिपायाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

17:47 (IST) 1 Jul 2024
“राहुल गांधींनी हिंदूंची माफी मागावी आणि…”, संसदेतील गदारोळावर देवेंद्र फडणवीसांची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपूर्ण देशातील हिंदू समाजाचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध आहे. हा केवळ हिंदू समाजाचाच अपमान नाही, तर संपूर्ण भारतीय संस्कृतीचाही अपमान आहे. राहुल गांधींनी ताबडतोब हिंदूंची आणि देशाची माफी मागावी आणि भारताचा गौरवशाली इतिहास नव्याने जाणून घ्यावा – देवेंद्र फडणवीस</p>

17:45 (IST) 1 Jul 2024
नागपूर : कागदावर ९० टक्के वृक्षारोपण, प्रत्यक्षात मात्र शून्य…’एनएचएआय’चा अजब कारभार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात महामार्गावर वृक्षारोपण केले असून त्यापैकी ९० टक्के वृक्षे जगली असल्याचा दावा केला.

सविस्तर वाचा…

17:33 (IST) 1 Jul 2024
नाशिक: बाइक टॅक्सी, इलेक्ट्रिक रिक्षांना विरोध – रिक्षाचालकांचा मोर्चा

केंद्रीय मोटार वाहन नियमान्वये वाहन योग्यता प्रमाणपत्राच्या नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिदिन ५० रुपयांची शुल्काची तरतूद आहे.

सविस्तर वाचा…

16:53 (IST) 1 Jul 2024
शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना चिखलातून काढावी लागली वाट, उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातील विद्यार्थ्यांची व्यथा

नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या शहरानजिक असलेल्या खामगाव रोड येथील ज्ञान विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेतील पहिल्याच दिवसाची वाट बिकट ठरली. शाळेच्या पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यांना चक्क चिखलातून जावे लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला. त्यामुळे शाळा प्रवेशाच्या दिवशी एकीकडे विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत तर दुसरीकडे असा बिकट प्रवास असे चित्र पहिल्याच दिवशी पाहायला मिळाले.

सविस्तर वाचा…

16:42 (IST) 1 Jul 2024
‘एमपीएससी’कडून सरळसेवा भरती, फडणवीसांच्या घोषणेमुळे समाधान, मात्र ही निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन…

नागपूर : सोमवारी पावसाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘क’ गटाच्या परीक्षाही ‘एमपीएससी’मार्फत होणार अशी घोषणा केली. शिवाय सरळसेवा भरतीच्या परीक्षा टप्प्याटप्याने एमपीएससीकडे दिल्या जातील असेही ते म्हणाले.

सविस्तर वाचा…

16:30 (IST) 1 Jul 2024
अल्पवयीन मुलाला जामीन मंजुरीच्या विरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात, कल्याणीनगर अपघात प्रकरण

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलाची नुकतीच जामिनावर मुक्तता केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या विरोधात पुणे पोलीस सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. याबाबत राज्याच्या विधी आणि न्याय विभागाने पुणे पोलिसांना परवानगी दिली आहे.

सविस्तर वाचा…

16:27 (IST) 1 Jul 2024
‘एमपीएससी’ची ‘टंकलेखन’ परीक्षा तांत्रिक गोंधळामुळे रद्द; उमेदवारांमध्ये संतापाची लाट…

नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३, मधील लिपिक टंकलेखक व करसहायक या संवर्गाची ‘टंकलेखन कौशल्य चाचणी’ परीक्षेत पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ उडाल्याने १ ते ३ जुलैपर्यंतची परीक्षा रद्द करण्यात आली.

सविस्तर वाचा…

16:20 (IST) 1 Jul 2024
मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण; राज्य शासनाच्या निर्णयाचे कोल्हापूर भाजपकडून जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सर्व मुलींना चालू शैक्षणिक वर्षापासून मोफत उच्च शिक्षण देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आज कोल्हापूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला. भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी विवेकानंद कॉलेज, नागाळा पार्क याठिकाणी एकत्र येत सर्वांनी नाम.चंद्रकांतदादा पाटील यांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. जिल्हाध्यक्ष विजय जाधव प्रदेश सचिव महेश जाधव यांनी शैक्षणिक क्षेत्रातील या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल दादांचे मनस्वी अभिनंदन केले. या शैक्षणिक निर्णयासाठी शासनाच्यावतीने २००० कोटी रुपयांची तरतूद केली असून सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलींच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर झाल्याचे मत याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी व्यक्त केले.

15:55 (IST) 1 Jul 2024
बुलढाणा: भक्तिमार्गाविरोधात काँग्रेसचा ‘आत्मक्लेष’

बुलढाणा: जिजाऊंचे माहेर सिंदखेडराजा ते विदर्भपंढरी दरम्यानच्या प्रस्तावित भक्तिमार्ग विरोधात आता जिल्हा काँग्रेस देखील मैदानात उतरली आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राहुल बोन्द्रे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आत्मक्लेश’ आंदोलन करून शासन व जिल्हा प्रशासन यांचे लक्ष वेधण्यात आले.

सविस्तर वाचा….

15:46 (IST) 1 Jul 2024
सातारा: पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जितेंद्र डूडी; जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पाहणी

संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत.

सविस्तर वाचा…

15:37 (IST) 1 Jul 2024
‘स्वाभिमानी’च्या वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनास सुरुवात

सरकारने शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी ही मागणी घेऊन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलनाला सुरुवात झाली.

सविस्तर वाचा…

15:31 (IST) 1 Jul 2024
“बळजबरीने जमिनी घ्याल तर रक्ताचे पाट वाहतील,” भक्ती मार्गावरून रविकांत तुपकर आक्रमक; म्हणाले…

बुलढाणा : मातृतीर्थ सिंदखेडराजा ते विदर्भ पंढरी शेगाव दरम्यानच्या प्रस्तावित भक्ती महामार्गाच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

सविस्तर वाचा….

15:19 (IST) 1 Jul 2024
मोठी बातमी! पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार, भाजपाकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याची मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. आता विधान परिषदेसाठी भाजपाने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.