Maharashtra Legislative Assembly Session : राज्यातील विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस. चौथ्या दिवशी कोणत्या मुद्द्यांवर सभागृहात खडाजंगी होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आर्थिक पाहणी अहवालात राज्य सरकारने अनेक घोषणांची खैरात केली आहे. त्यामुळे यावरूनही चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढतंय. आत्महत्या रोखून त्यांना तत्काळ कर्जमुक्ती व्हावी यासाठी विरोधकांकडून मागणी केली जाण्याची शक्यता आहे. तसंच, आज विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तर, दुसरीकडे राज्यात लहरी हवामान निर्माण झालं आहे. अतिमुसळधार पावसाचा इशारा देऊनही पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे, राज्यातील राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी आणि पावसाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करत राहा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

15:09 (IST) 1 Jul 2024
वरळीत झाड पडून एकजण गंभीर जखमी

मुंबई : वरळीमधील बीडीडी चाळ क्रमांक – ८९ येथे जांबोरी मैदानानजिकच्या चौकात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एक झाड पडले. या दुर्घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झाड पडल्याचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका, संबंधित पालिका विभाग कार्यालयातील कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावरून प्रवास करताना अमित जगताप (४५) यांच्या अंगावर संबंधित झाड पडले. झाडाचे वजन अधिक असल्याने जगताप गंभीर जखमी झाले. अग्निशामकांनी त्यांना बाहेर काढले. तसेच, उपचारासाठी तत्काळ नजीकच्या ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जगताप यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

15:03 (IST) 1 Jul 2024
दीक्षाभूमी भूमिगत पार्किंगला स्थगिती, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

नागपूरमधील दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

14:35 (IST) 1 Jul 2024
कल्याण-डोंबिवलीत उघड्यावरील दारूच्या दुकानांनी रहिवासी हैराण

हे नागरिक मद्य पिऊन धुंद झाले की या दारू अड्ड्याच्या भागात ओरडा करत, एकमेकांशी भांडण करत बसतात.

सविस्तर वाचा…

14:27 (IST) 1 Jul 2024
रिक्षा अपघातात शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यु; चालकासह पाच प्रवासी आणि दुचाकीस्वार जखमी

शाळकरी विद्यार्थिनी आणि प्रवाश्यांना घेऊन सुर्यानगर येथे निघालेल्या रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात एका १४ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यु झाला.

सविस्तर वाचा…

14:26 (IST) 1 Jul 2024
मुंबई: प्रेमसंबंधातील वादातून तरूणीचा खून, आरोपीला अटक

प्रेमसंबंधातून तरूणीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी अंधेरी पूर्व येथे घडली.

सविस्तर वाचा…

13:32 (IST) 1 Jul 2024
“एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातच विधानसभा निवडणूक लढवणार”, शिंदे गटाच्या नेत्यांचं वक्तव्य

अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचे दावेदार असतील हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. पण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्त्वाखाली ही निवडणूक होईल, असं देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाने सांगितलं आहे – संजय गायकवाड

13:10 (IST) 1 Jul 2024
निविदा मंजुरीसाठी भ्रष्टाचाराला खतपाणी! पूर्व प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निवडीसाठी मागितली लाच

नागपूर : बार्टी, सारथी, महाज्योती आणि ‘टीआरटीआय’च्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी आठ संस्थांची निवड केली जात आहे. त्यांच्या निविदा मंजुरीसाठी ‘टीआरटीआय’चे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या नावाने याच संस्थेतील एक अधिकारी लाच मागत असल्याची गंभीर तक्रार राज्य सरकारकडे झाली आहे.

सविस्तर वाचा….

13:09 (IST) 1 Jul 2024
विश्वचषक जिंकणाऱ्या भारताच्या संघाला सेवाग्रामच्या डॉक्टरांचे योगदान, जाणून घ्या सविस्तर

वर्धा : अत्यंत चूरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करीत टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद पटकवले. त्यामुळे भारताची २०१३ पासूनची आयसीसी जेतेपदाची प्रतिक्षा संपली.

सविस्तर वाचा….

13:08 (IST) 1 Jul 2024
विजयानंतर जल्लोश करणाऱ्या नागरिकांना धमकावणारा तोतया पोलीस अटकेत

पुणे : भारताने टी-२० विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवल्यानंतर जल्लोश करणाऱ्या नागरिकांना धमकाविणाऱ्या तोतया पोलिसाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून महाराष्ट्र पोलिसांचे बनावट ओळखपत्र, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे ओळखपत्र, तसेच पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा….

13:08 (IST) 1 Jul 2024
डोंबिवली, भिवंडीत गुटखा विक्री, हुक्का पार्लर चालविणाऱ्या मालकांवर गुन्हे

हुक्का पार्लर चालवून नागरिकांच्या आरोग्यास, मालमत्तेस हानीकारक ठरणाऱ्या दोन विक्रेते, चालकांवर विष्णुनगर, कोन पोलिसांंनी गुन्हे दाखल केले आहेत.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 1 Jul 2024
मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूरजवळील कोंडीमुळे निवृत्त मुख्य सचिव, जिल्हाधिकाऱ्यांचा लोकलने प्रवास

डाॅ. करीर यांच्या निरोपाचा कार्यक्रम सनदी अधिकाऱ्यांनी आयोजित केला होता. रविवारी दुपारी कोणत्याही परिस्थितीत मंत्रालयात पोहचणे डाॅ. करीर यांना आवश्यक होते.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 1 Jul 2024
यवतमाळ : भरधाव कारची ट्रकला धडक; भीषण अपघातात चार जण ठार, एक गंभीर

यवतमाळ : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या अपघतात चार जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सोमवारी पहाटे ५ वाजताच्या दरम्यान कळंब – यवतमाळ मार्गावर चापर्डा आणि घोटी गावाच्या दरम्यान झाला.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 1 Jul 2024
विधानसभेची रणनीती ठरिवण्यासाठी उद्धव ठाकरे रविवारी संभाजीनगरमध्ये

छत्रपती संभाजीनगर उद्धव ठाकरे यांच्या गटाचे एकमेव आमदार आहेत.

सविस्तर वाचा…

13:07 (IST) 1 Jul 2024
वर्धा : मुले हिरमुसली! शाळेच्या पहिल्या दिवशी नवा गणवेश मिळालाच नाही, योजनेचा फज्जा

वर्धा : शाळेच्या पहिल्या दिवशी आज पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांच्या किलबिलाटास बहर आला. मात्र वर्गातील मुलं हिरमुसली होती. कारण दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणारा कोरा करकरीत गणवेश त्यांच्या हाती पडलाच नाही. त्यामुळे आता जुनाच ड्रेस घालून शाळेत जावे लागणार काय, असे प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्याचे चित्र होते.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 1 Jul 2024
खानापूर- आटपाडी मतदारसंघात आमदारकीसाठी चुरस

या मतदार संघामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर हेही आमदारकीसाठी नशिब अजमावण्याचा प्रयत्न करत असले तरी विटा परिसरातून अपेक्षित प्रतिसाद मिळेलच असे नाही.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 1 Jul 2024
सावधान! विदर्भात वादळी तर राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

नागपूर : मोसमी पावसाने आता राज्यात जोर धरला असून सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान खात्याने आज विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 1 Jul 2024
पुणे: कात्रज – कोंढवा रस्त्यावर टेम्पो उलटून २० वारकरी जखमी

अपघातात २० वारकऱ्यांना दुखापत झाली असून, याप्रकरणी टेम्पोचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

सविस्तर वाचा…

13:06 (IST) 1 Jul 2024
पेपरफुटीचा कायदा याच अधिवेशनात आणणार का? रोहित पवारांच्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीसांचे थेट उत्तर; म्हणाले…

मागील काही दिवसांत राज्यातील विविध भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचं पुढे आलं असून अनेक परीक्षांचे पेपरही फुटले आहेत. त्यामुळे या परीक्षा रद्द करून पुन्हा घ्याव्या लागल्या. या घटनानंतर आता राज्यात पेपरफुटीविरोधात कायदा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी पेपर फुटीविरोधातील कायदा सरकार याच अधिवेशनात आणणार का? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला. रोहित पवारांच्या प्रश्नाला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही थेट उत्तर दिले आहे.

सविस्तर वाचा –

13:03 (IST) 1 Jul 2024
भास्कर जाधवांनी सभागृहात वाचून दाखवला व्हॉट्सअप मेसेज; फेक नरेटिव्हचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, “मी आता…”

देशभरात पेपर फुटीचं प्रकरण गाजतंय. नीट आणि नेट पेपरफुटीवरून संसदेतही गोंधळ सुरू झाला आहे. तर, राज्यातील मृद व जलसंधारण विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या अधिकारी गट ब आणि अराजपत्रित पदाच्या भरतीप्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा दावा करण्यता येतोय. त्यामुळे या विषयावर आज प्रामुख्याने विधानसभेत चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान, फेक नरेटिव्ह (खोट्या बातम्या पेरणाऱ्यांविरोधात) सेट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

सविस्तर वृत्त वाचा

11:45 (IST) 1 Jul 2024
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल करणार, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

मुलांमध्ये अनरेस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न, १ लाख लोकांना रोजगार दिले आहेत. फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार.

11:41 (IST) 1 Jul 2024

अभिमन्यू पवार यांच्याबरोबर जे शिष्टमंडळ आलं होतं, त्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं होतं की कायदा आणू. याच अधिवेशनात आपण कायदा आणणार आहोत – देवेंद्र फडणवीस

11:39 (IST) 1 Jul 2024
Maharashtra Assembly Monsoon Session 2024 LIVE : पेपरफुटीप्रकऱणी कायदा होणार का? रोहित पवारांचा सवाल

पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का? रोहित पवारांचा सवाल

सर्व कायदे असतानाहीसुद्धा गुन्हे घडत असतात, त्या कायद्यात सुधार करायचा असतो, व्यवस्था बदलण्याकरता कायद्यात सुधार करायचा असतो. राज्यातील युवकांच्या मनात गैरविश्वास निर्माण करणं, फेक नरेटिव्ह करणं, या साठी संघटित गुन्हेगारी काम करणं अशी शंका आहे. असा गैरविश्वास निर्माण करण्याऱ्यांची चौकशी करणार का? – आशिष शेलार</p>

11:27 (IST) 1 Jul 2024

गट क ची परीक्षा एमपीएससीतर्फे घेणार – फडणवीस

अडीच वर्षाच्या काळात एक लाखापेक्षा अधिक भरती केली – फडणवीस

परीक्षा शुल्क कमी करण्याचा विचार करू – फडणवीस

11:19 (IST) 1 Jul 2024

विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचे घोषणाबाजी करत आंदोलन

10:35 (IST) 1 Jul 2024
Vidhan Parishad Election Result Live Updates : पदवीधर, शिक्षक मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात; निरंजन डावखरे, अनिल परबांची प्रतिष्ठा पणाला!

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर व शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पसंती क्रमानुसार मतदान असल्याने मतमोजणीला विलंब लागू शकतो. पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघांमध्ये आधी सर्व मतपत्रिकांची छाननी केली जाते. त्यातील बाद मते बाजूला केल्यावर एकूण वैध मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतांचा कोटा निश्चित केला जातो.

भाजपाचे निरंजन डावखरे, ठाकरे गटाचे अनिल परब यांसारख्या अनेकांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.