सोलापूर : रक्तरंजित राजकारणामुळे नेहमीच संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बार्शी विधानसभा निवडणुकीत राजेंद्र राऊत आणि दिलीप सोपल हे प्रमुख प्रतिस्पर्धी गटाच्या समर्थकांमध्ये गोंधळ, आरोपबाजीचा प्रकार घडला. यानंतर दोन्ही गटांनी आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे बार्शीतील वातावरण आतापासूनच तापू लागले आहे.

गेल्या ३०-३५ वर्षांपासून माजी मंत्री दिलीप सोपल आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळतो. त्याची परिणती पुन्हा दिसून आली. आमदार राऊत यांच्या समर्थकांनी सोपल यांच्या घरासमोरून जाताना प्रचंड हुल्लडबाजी केली. या हुल्लडबाजीत आमदार राऊत यांचे पुत्र रणवीर हे स्वतः बुलेटवर उभे राहून आव्हानाची भाषा करीत होते. सोपल यांच्या घराच्या दिशेने पाहून राऊत समर्थक हातांनी दंड थोपटत होते. मोठ्या प्रमाणात झेंडेही नाचविले जात होते. बार्शीजवळील आगळगाव येथे आमदार राऊत यांची जाहीर सभा होती. त्या सभेसाठी त्यांचे समर्थक दुचाकी गाड्या उडवत जात असताना वाटेत दिलीप सोपल यांच्या घरासमोर काही मिनिटे हुल्लडबाजीचा हा प्रकार घडला.

Ajit pawar on Yogi Adityanath
Ajit Pawar on Yogi Adityanath: योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेला अजित पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “बाहेरच्या नेत्यांनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
sharad pawar ncp leader jayant patil slams ladki bahin yojana
लाडकी बहीण’मुळे सरकारची तिजोरी रिकामी – जयंत पाटील
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…
Stone pelted on Prof Laxman Hake vehicle in Nanded news
नांदेडमध्ये प्रा. लक्ष्मण हाकेंचे वाहन फोडले
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा >>> नांदेडमध्ये प्रा. लक्ष्मण हाकेंचे वाहन फोडले

हा प्रकार घडत असताना सोपल यांच्या घरासमोर कोणीही नव्हते. मात्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. याबाबत सोपल यांचे निकटचे अनुयायी नागेश अक्कलकोटे यांनी तीव्र संताप व्यक्त करीत हुल्लडबाजीच्या घटनेचा निषेध नोंदविला. निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनाने निष्पक्ष चौकशी करून हुल्लडबाजी करून दहशत माजविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पराभवाच्या भीतीने राऊत समर्थकांच्या पायाखालील वाळू सरल्यामुळे समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप अक्कलकोटे यांनी केला आहे. तथापि, याउलट आमदार राजेंद्र राऊत यांनी सोपल गटाचा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावताना सोपल यांनी यापूर्वी तीस वर्षांत दहशत माजविली होती. आपल्यावर चारवेळा प्राणघातक हल्ले झाले होते. एकदा आपणास रक्तबंबाळ करण्यात आले होते. सोपल समर्थकांची ती दहशत नव्हती काय, असा सवाल केला आहे. आपला मुलगा रणवीर हा पेशाने वकील आहे. त्याच्यावर दहशत वाजविण्याचा आरोप करणे निव्वळ हास्यास्पद असल्याची प्रतिक्रियाही आमदार राऊत यांनी व्यक्त केली.

Story img Loader