NCP MLA Disqualification Verdict Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दोन्ही गटांमधील एकही आमदार अपात्र नाही, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. हा निकाल १० जानेवारी रोजी त्यांनी दिलेल्या निकालानुसारच हाही निकाल असल्याचं आता बोललं जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यामुळे राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
NCP MLA Disqualification Live Updates, 15 February 2024: मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा!
अशा निकालाची अपेक्षा होतीच. निवडणूक आयोगानंही अजित पवार गटावरच शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळे आधीच आमचं काम सोपं झालं होतं. कुणाला अपात्र करा अशी आमची मागणी नाहीये. आम्हाला अपात्र करू नका एवढीच आमची मागणी होती – छगन भुजबळ
मला निकालाबाबत कोणतीही माहिती नाही. मी त्याबाबत माहिती घेऊन बोलेन – अजित पवार

तीन जुलैला अजित पवार म्हणाले होते की त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच आहेत. मग हे सगळं असताना जर तुम्हाला ते दिसत नसेल तर तुम्ही काय धृतराष्ट्राच्या भूमिकेत गेला आहात का? – जितेंद्र आव्हाड

आयाराम गयाराम पद्धत रोखण्यासाठी दहावं परिशिष्ट आणण्यात आलं. आधी ५० टक्के सदस्यही बाहेर पडू शकत होते. नंतर हे प्रमाण दोन तृतीयांश केलं. हे सगळं असताना अध्यक्ष म्हणतात हे माझ्या अधिकारक्षेत्रातच नाही. मग दोन वर्षं काय अंडी उबवत होता का? – जितेंद्र आव्हाड

कायद्याची पायमल्ली कशी करायची, याची ट्युशन राहुल नार्वेकर घेऊ शकतात. निवडणूक आयोग म्हणतंय की २०१९ पासून पक्षांतर्गत वाद सुरू झाला. पण अध्यक्ष म्हणतात की २९ जून २०२३ पर्यंत कुठला वाद नव्हताच – जितेंद्र आव्हाड

एकतर अध्यक्षांनी म्हटलं की विधिमंडळात ज्यांचे आमदार जास्त तो पक्ष खरा. याचा दुसरा अर्थ असा होतो की पक्ष स्थापन करणं, त्याला वाढवणं, त्यातून तिकीट वाटप करणं, माणसं निवडून आणणं हे सगळं केल्यानंतर पक्षाला बाजूला सारून विधिमंडळाला पक्ष मानायचं याचे वेगळे परिणाम देश पातळीवर दिसू शकतात – एकनाथ खडसे

निवडणूक आयोगानं वेगळा निकाल दिला होता. आज अध्यक्षांनी दिलेला निकाल खरे पुरावे समोर ठेवून घेतला आहे. त्यामुळे दोन्ही निकालांची तुलना करता येणार नाही. दहाव्या परिशिष्टाचा वापर करता येत नाही. कदाचित जितेंद्र आव्हाडांनी दहाव्या परिशिष्टाचा पुरेसा अभ्यास केलेला दिसत नाही – अनिल पाटील, अजित पवार गटाचे आमदार
हा या शतकातला सगळ्यात किरकोळ निकाल आहे. याला ना ऐतिहासिक महत्त्व आहे. ना त्यात काही अभ्यास आहे. समोर लोकशाहीचा, एका पक्षाचा खून होताना दिसतंय. पण न्यायासनावर बसलेली व्यक्ती त्या खून्याला निर्दोष सोडतेय. याला काय निकाल म्हणतात का? चुलीत घाला तो निकाल. विधानसभा अध्यक्ष रामशास्त्री नव्हे, दामशास्त्री आहेत – संजय राऊत

हा निकाल हास्यास्पद आहे. सरकारने राज्यघटनेतून दहावं परिशिष्ट काढून टाकावं आणि सगळ्याचंच कौतुक करावं. तुम्ही पक्षांतरालाच एकप्रकारे वैध ठरवत आहात. त्यावर काय बोलणार? – जितेंद्र आव्हाड

विधानसभा अध्यक्षांनी स्टँड अप कॉमेडी करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण ज्या घटनात्मक तत्वांना शरोधार्य मानतो, त्यांच्यावर मोठा विनोद करण्यात विधानसभा अध्यक्षांचा हातखंडा असल्याचं दिसतंय – आदित्य ठाकरे

The speaker, in role of the tribunal should try stand up comedy.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) February 15, 2024
He seems to be great at making a big joke of the democracy and constitutional values we uphold. https://t.co/q1sAxSZVpE
शरद पवार गटाचे आमदारही अपात्र नाहीत – राहुल नार्वेकरांनी दिला निकाल
शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या अपात्रतेसाठी दाखल केलेल्या तिन्ही याचिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या.
Speaker
— Live Law (@LiveLawIndia) February 15, 2024
No party leadership can use the 10th Schedule to stifle dissent. In a given case when a tussle for leadership arises, the common party workers cannot remain onlookers and they are compelled to choose sides.
The speakers office cannot be used to quell opposition.
याचिकाकर्त्यांनी दहाव्या परिशिष्टाचा वापर अजित पवार गटातील सदस्यांवर दबाव टाकण्यााठी करू नये. ते कायदाविरोधी कृत्य ठरेल – राहुल नार्वेकर

The judge has observed that dissent is not defection.
The present petitions do not attract action under the 10th schedule.
शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळल्या. अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निर्णयाचा आधार घेत शरद पवार गटाकडून सादर केलेल्या अपात्रता याचिका फेटाळल्या.
Speaker – Therefore I hold that preliminary issue that which is the real political party is discernable from the legislative majority when the rival factions emerged.

अजित पवार गटाला ५३ आमदारांपैकी ४१ आमदारांचा पाठिंबा आहे. शरद पवार गटानं या दाव्याला कुठेही आव्हान दिलेलं नाही. त्यामुळे दोन्ही गटांचं संख्याबळ इथे स्पष्ट होत आहे. त्यानुसार अजित पवार गटाकडे विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. अजित पवार गटाकडे मतांचा असलेला पाठिंबाही जास्त असल्याच्या स्थितीला शरद पवार गटाकडून आव्हान देण्यात आलेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटाला विधिमंडळ पक्षाचा पाठिंबा आहे. नेतृत्व संरचना किंवा पक्ष संघटनेवरून कोणता गट पक्ष आहे हे निश्चित होत नाही. त्यामुळे विधिमंडळ पक्षाच्या संख्याबळानुसार अजित पवार गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याच्या निष्कर्षावर मी आलो आहे – राहुल नार्वेकर
Speaker – The Ajit Pawar faction had an overwhelming majority when the rival factions emerged. #NCP #SharadPawarvsAjitPawar

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत २८ सदस्य आहेत. पण पक्षघटनेनुसार २५ सदस्यच असू शकतात. राष्ट्रीय कार्यकारिणीत शरद पवार गटाला बहुमताचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला होता. पण त्यासाठी कोणतीही कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे हा दावा मान्य करता येणार नाही – राहुल नार्वेकर

AJIT PAWAR FACTION IS THE REAL NCP POLITICAL PARTY for the purposes of deciding these disqualification petitions.
दोन्ही बाजूंनी सादर केलेल्या युक्तिवादानंतर पक्षाध्यक्ष कोण आहे, यासंदर्भात मी कोणत्याही निश्चित अशा निर्णयापर्यंत येऊ शकलो नाही – राहुल नार्वेकर
वाद झाला तेव्हा (३० जून २०२३) दोन व्यक्ती पक्षाध्यक्ष असल्याचा दावा करत असल्याचं समोर आलं आहे. २९ जूनपर्यंत शरद पवारांच्या नेतृत्वावर कोणताही वाद नव्हता – राहुल नार्वेकर
वादाच्या वेळी अध्यक्ष कोण होतं? एवढाच माझा निर्णय घेण्याचा भाग आहे. त्या अध्यक्षाची निवड योग्य पद्धतीने झाली होती की नाही, यावर मी निर्णय देणं अपेक्षित आहे – राहुल नार्वेकर
२०२२ मध्ये पक्षात झालेल्या अंतर्गत निवडणुकीबाबत पीतांबरम व प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे माहिती दिली होती. या कागदपत्रांच्या आधारे पक्षात वैध नेतृत्व होतं असा दावा शरद पवार गटाकडून दाखल याचिकांमध्ये केला आहे – राहुल नार्वेकर
पक्षाध्यक्ष व कार्यकारिणी समिती यांच्याकडे पक्षाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पक्षघटनेनुसार देण्यात आले आहेत – राहुल नार्वेकर
राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वोच्च संघटना ही कार्यकारिणी समिती आहे. पक्षघटनेच्या कलम २१ मध्ये कार्यकारिणी समितीला पक्षानं ठरवलेल्या दिशेनुसार धोरणांची अंमलबजावणी करण्याचे सर्व अधिकार आहेत. पक्षघटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना सर्वाधिकार देण्यात आले आहेत – राहुल नार्वेकर
सध्याची पक्षघटनाच नेतृत्व संरचना लक्षात घेण्यासाठी ग्राह्य धरली जाईल – राहुल नार्वेकर
३० जून रोजी अजित पवारांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शरद पवार गटाने या प्रक्रियेला विरोध केला. त्यातून राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याचं ३० जून रोजूच स्पष्ट झालं – राहुल नार्वेकर
सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निकषांवरून पक्षाची राज्यघटना, पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचा विधिमंडळ गट यावरून यासंदर्भातला निर्णय घेतला गेला – राहुल नार्वेकर
शरद पवार गटाकडून ३ याचिका तर अजित पवार गटाकडून दोन याचिका सादर
निवडणूक आयोगाप्रमाणेच राहुल नार्वेकरही अजित पवार गटाच्या बाजूनेच निकाल देतील – धर्मराव बाबा अत्राम
आमदार अपात्र ठरले तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ – सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केली शरद पवार गटाची पुढची दिशा!
नागपूर : शरद पवार गटाकडे कार्यकर्ते, पदाधिकारी व आमदारांची संख्या कमी झाली आहे आणि आता ते थकले आहेत. त्यामुळे त्यांनी आपला गट अजित पवार गटात विलीन करावा आणि महायुतीची ताकद वाढवावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव आत्राम यांनी व्यक्त केले.
NCP MLA Disqualification Live Updates, 15 February 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!