NCP MLA Disqualification Verdict Updates: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि दोन्ही गटांमधील एकही आमदार अपात्र नाही, असा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला आहे. हा निकाल १० जानेवारी रोजी त्यांनी दिलेल्या निकालानुसारच हाही निकाल असल्याचं आता बोललं जात आहे.
जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यामुळे राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार? याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
NCP MLA Disqualification Live Updates, 15 February 2024: मराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा!
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कुठेही आव्हान दिलेलं नाही. शरद पवार गटाने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्याची मागणी केली असती आणि न्यायालयाने स्थगिती दिली असती तर विधानसभा अध्यक्षांकडून वेगळा निकाल आला असता. माझ्या माहितीप्रमाणे शरद पवार गटाने कुठेही याचिका दाखल केलेली नाही – उज्ज्वल निकम
नागपूर : भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, अर्ज करूनही नागपूर विभागातील ३२,५७३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीचे अर्ज अद्याप सादर केलेले नसून १९,७९६ विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालयांनी प्रलंबित ठेवल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाकडून देण्यात आली आहे.
पुणे : देशभरात एप्रिल २०१९ नंतर नवीन वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक पाट्या (हाय सिक्युरिटी नंबर प्लेट) बंधनकारक करण्यात आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने जुन्या वाहनांनाही या क्रमांक पाट्या बंधनकारक केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे आहे.
पुणे : माजी क्रिकेटपटू केदार भावे यांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सारसबाग परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पनवेल : देशातील सर्वात मोठे कामगारांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि पंचतारांकित हॉटेल कळंबोली येथे होत असून त्यासाठी राज्य सरकार १७०० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कळंबोली येथे केले.
यवतमाळ : पंजाबचे व्यापारी नागपूर येथे जात असताना त्यांची भरधाव इनोव्हा कार वर्धा नदीच्या पुलावरून थेट खाली कोसळली. कळंबपासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या यवतमाळ-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील वर्धा नदीजवळ झालेल्या या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी संध्याकाळी घडली.
मुंबई : देशातील सर्व रक्तपेढ्यांना थॅलेसेमियाग्रस्त मुलांना मोफत रक्तपुरवठा करणे बंधनकारक आहे. तरीही अनेक रक्तपेढ्या थॅलेसेमियाग्रस्त मुलांना मोफत रक्तपुरवठा करीत नसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. या तक्रारींची दखल घेऊन राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने यासंदर्भात केंद्र सरकार आणि देशातील सर्व राज्यांमधील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला पत्र पाठवून यासंदर्भात केलेल्या कारवाईची माहिती तातडीने कळविण्याच्या सूचना केली आहे.
वर्धा : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी आरटीई कायद्यात बदल करण्यात आला असून तसे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात नमूद केल्यानुसार आता एक किलोमीटर परिसरात शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास संबंधित परिसरातील विना अनुदानित शाळेत आरटीई अंतर्गत प्रवेश दिले जाणार नाही.
राहाता : ‘जनसंवाद यात्रे’च्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली असून शिर्डी लोकसभा मतदारसंघात त्यांनी दोन दिवसांत तब्बल ६ सभा घेतल्या, मात्र त्यांच्या दौऱ्यावर मतदारसंघातील शिवसेना अंतर्गत गटबाजीची झालर दिसून आली.
कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील कल्याण डोंबिवली पालिकेचा दिवंगत दिलीप कपोते वाहनतळ वाहने उभी करण्यासाठी सज्ज झाला आहे. या वाहनतळावरील वाहनांचे नियोजन करण्यासाठी एक खासगी संस्था नियुक्त केली आहे. हे वाहनतळ दोन दिवसात नागरिकांना वाहने उभी करण्यासाठी खुले करण्यात येत आहे, असे मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांनी सांगितले.
निवडणूक रोख्यांना सुरुवात झाल्यापासून २०१८ ते २०२३ या काळात एकूण रोख्यांपैकी सुमारे ५५ टक्के रोख्यांमधून भाजपला आर्थिक मदत मिळाली असून, काँग्रेसला जेमतेम १० टक्के रक्कम मिळाल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारी दरम्यान मद्यप्राशन करणाऱ्या ५ पर्यटकांना ताडोबा व्यवस्थापनाने प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. एकूण २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
पिंपरी- चिंचवडमधील एक स्टंटबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून हा तरुण स्टंटबाजी करताना व्हिडीओमध्ये दिसतो आहे. या तरुणाचा शोध वाहतूक पोलीस घेत असून त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिली आहे.
नांदेड : काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांनी पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत संसद आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाण यांच्या नावावरही तशी नोंद आता होणार आहे.
मुंबई : महारेरा नोंदणी तसेच क्यूआर कोडशिवाय गृहप्रकल्पाच्या जाहिरात करणाऱ्या विकासकांवर आता महारेराची करडी नजर असणार आहे. अशा जाहिराती आणि संबंधित विकासकांचा शोध घेण्यासाठी महारेराने अॅडव्हर्टायझींग स्टँडर्ड कौन्सिल ऑफ इंडिया या स्वयंविनियामक संस्थेची मदत घेतली आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२-२४ अंतर्गतच्या तुकडीतील पदव्युत्तर विधि शाखेची (दोन वर्षीय अभ्यासक्रम) प्रथम सत्राची पुनर्परीक्षार्थींची (एटीकेटी) परीक्षा अद्यापही घेतली नसल्यामुळे द्वितीय वर्षातील प्रवेश निश्चितीबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
भुजबळ म्हणतात, “मागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका. सगेसोयरेच्या नावाखाली त्याची नको ती व्याप्ती वाढवू नका!”
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मुंबई-आग्रा महामार्गावर इगतपुरीजवळ एका मालवाहतूक वाहनातून बुधवारी पहाटे २१ लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला. मालेगाव शहराचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तेजवीरसिंग संधू यांना एका मालवाहतूक वाहनातून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी अधीक्षक विक्रम देशमाने यांना त्यासंदर्भात कळवल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करुन महामार्गावर सापळा रचला. संशयित मालमोटार मुंबईच्या दिशेने जाताना दिसताच पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता पाठीमागील बाजूस ४० मोठ्या गोण्या आणि सहा लहान गोण्यांमध्ये गुटखा आढळून आला.
गुन्हे शाखेचे मनोज सानप यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यात संशयित अमृत सिंह (रा. हिनोतिया, मध्य प्रदेश), पूनमचंद चौहान (रा. सकारगांव, मध्य प्रदेश) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण ४६,२३, ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पनवेल : खैर लाकडाची अवैध वाहतूक करणा-या ट्रकला पनवेलच्या वन विभागाने जप्त केले आहे. हे खैर लाकूड गुजरात येथून आणले असून ते रत्नागिरी येथील चिपळूनला जात असताना वन विभागाच्या अधिका-यांनी कळंबोली सर्कल येथे बुधवारी मध्यरात्री सापळा लावून हा ट्रक जप्त केला. गुरुवारी सकाळी संबंधित ट्रकमधील अवैध खैराच्या लाकडाचे ओंडके तपासल्यावर हे ५६९ ओंडके असल्याची नोंद वन विभागाच्या दफ्तरी करण्यात आली आहे.
या लाकडाची तोड नेमकी कोणी व कुठे केली याचा शोध वन विभागाचे अधिकारी घेत आहे. या ट्रकसोबत चालक व त्याच्या सहका-याला वन विभागाने ताब्यात घेतले आहे. जप्त केलेल्या ट्रकमधील लाकडाचे बाजारमुल्य तीन लाखांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले. मागील अनेक वर्षात पनवेलच्या वन विभागाची कारवाई थंडावली होती. मात्र अनेक वर्षानंतर झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे.
पुणे : औद्योगिक कामगारांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी राज्य सरकारकडून डॉक्टरांना अधिकृत प्रमाणित शल्यचिकित्सक म्हणून परवाना दिला जातो. सध्या राज्यात केवळ अधिकृत १४० डॉक्टर औद्योगिक कामगारांच्या तपासणीचे काम करीत आहेत. मात्र, असे शंभरहून अधिक प्रस्ताव सध्या राज्य सरकारसमोर प्रलंबित आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी पुण्यातून सहावा अर्ज दाखल झाला आहे. विश्वास जगताप या नावाने हा अर्ज दाखल झाला आहे. अर्जावर दहा सह्या असणं आवश्यक असताना या अर्जाबाबत नेमका काय निर्णय घेण्यात आला आहे, यायची अद्याप खातरजमा होऊ शकलेली नाही.
आपली संसदीय लोकशाही ब्रिटनवरून घेण्यात आली आहे. तिथे सभागृहाचा अध्यक्ष पंचप्रमाणे काम करतो. तिथे सभागृहाचा अध्यक्ष निवडला गेल्यानंतर तो पक्षाचा राजीनामा देऊन पुढे काम पाहतो. आपल्याकडचा अध्यक्ष कुठल्यातरी पक्षाचा सदस्य असतो, त्यामुळे त्याच्याकडून फार न्यायाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यात जर चार-पाच पक्ष बदललेला अध्यक्ष असेल तर त्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवणे आणखी चुकीचे आहे, असे मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केले.
काँग्रेस-राष्ट्रवादीचं राज्य असताना, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना राणे समितीच्या शिफारशीनुसार एक कायदा केला. तो फेटाळला गेला. फडणवीस मुख्यमंत्री असताना गायकवाड कमिशनच्या शिफारशीनुसार आरक्षण देण्यात आलं. पण सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारलं. त्यातल्या त्रुटी कमी करण्यासाठी आयोग नेमण्यात आला. त्यावर वाद वगैरे झाला हे वेगळं. त्या आयोगानं १५-२० दिवसांत अडीच कोटी घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं असं मी ऐकलंय. क्युरेटिव्ह पिटीशनसाठी तीन न्यायमूर्तीही बसले आहेत. मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं दिलं जाईल, यासाठी हे सगळे बसले आहेत. आमचा पाठिंबा त्याला आहेच. जरांगेंना वाटलं असेल की १५ तारखेला येणारच आहे, मराठा आरक्षण मिळणारच आहे. मग आपण १० तारखेलाच उपोषणाला बसावं.जेणेकरून त्याचं श्रेयही मिळवता येईल. त्यांची धारणा चुकीची नाही. पण त्यांचं काम पूर्ण झालं नाही. ते आणखी ५-६ दिवस पुढे गेलंय. आता ते शिव्याच द्यायला लागले आहेत. तेही आईवरून शिव्या देत आहेत. गल्लीवरचे लोक शिव्या देतात तशा शिव्या देत आहेत. तिथे असणाऱ्या एसपी, जिल्हाधिकाऱ्यांना ते तुम्ही सगळे भाडखाऊ आहात असं म्हटल्याचं चॅनल्सवर दिसलं. त्यांनी असा त्रागा न करता शांत बसावं. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा आम्ही पारित करतो आहोत. शिव्या देऊन किंवा आणखी भानगडी करून काय फायदा आहे? सगेसोयरेच्या माध्यमातून जे तुम्ही कुणबी म्हणत घुसवले आहेत, त्याविरोधात आमचा लढा चालूच असणार आहे – छगन भुजबळ
काही लोकांच्या घरासमोर रात्री ३ – ३ वाजेपर्यंत वेडंवाकडं बोलून त्रास दिला गेला. हे झाल्यानंतर पुन्हा उपोषण करण्याचं कारण काय? मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. मागच्या दाराने त्यांना कुणबी म्हणून घुसवू नका. सगेसोयरेच्या नावाखाली त्याची नको ती व्याप्ती वाढवू नका – छगन भुजबळ
शेतमालाला किमान हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश तसेच अन्य राज्यांतील शेतकरी दिल्लीकडे निघाले आहेत. मात्र या शेतकरी आंदोलकांना दिल्लीत येण्यापासून रोखले जात आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर हजारो पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तसेच आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभे करण्यात आले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या याच भूमिकेवर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्दबातल ठरवली आहे. निवडणूक रोखे योजना घटनाबाह्य असून त्यामुळे नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे हनन होते, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. पाच सदस्यीय घटनापीठाने हा निर्णय दिला असून या घटनापीठाच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड होते. घटनापीठातील पाचही सदस्यांनी एकमताने हा निर्णय दिला आहे. वाचा सविस्तर
निवडणूक रोखे योजनेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निनावी निवडणूक रोख्यांमुळे संविधानातील अनुच्छेद १९ (१) (अ) अंतर्गत असलेल्या माहितीच्या अधिकाराचे हनन होत आहे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रद्दबातल ठरवली आहे. निवडणूक रोखे योजना असंवैधानिक असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. वाचा सविस्तर
नवी मुंबई : ठाणे बेलापूर मार्गावर कोपरखैरणे स्टेशन नजीक रिलायन्स कंपनी समोरील मार्गावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक आडवा झाला. ऐन गर्दीच्या वेळी अपघात झाल्याने पनवेल देशाला जाणारी वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी प्रयत्नांची शर्त करून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत ट्रक बाजूला काढला.
ठाणे बेलापूर मार्गावर बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर आज सकाळी साडे नऊ पावणे दहाच्या सुमारास रिलायन्स कंपनी समोर एक ट्रक अपघात झाला. या अपघातात कोणी जखमी झाले नाही. ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात झाला. अगोदरच या मार्गावर अनेक ठिकाणी काम सुरु असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करत वाहन चालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे. त्यात ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने काही मिनिटात सुमारे तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पुणे : पोलीस दलातील बेशिस्तीला चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पावले उचलली आहेत. अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्विकारल्यानंतर शहरातील गुंडांची झाडाझडती घेतली. पोलीस दलातील बेशिस्तांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांनी सूचना दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदारही पात्र ठरणार ? (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
NCP MLA Disqualification Live Updates, 15 February 2024: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर!